शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

बांधावरील तूर लागवड शेतकऱ्यांसाठी ठरते वरदान

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2020 00:24 IST

शेतकऱ्यांकडून भात हे मुख्य पीक घेतले जात असले तरी या वर्षीच्या खरीप हंगामात येथील शेतक-यांकडून तुरीची मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात आली आहे.

राहुल वाडेकर विक्रमगड : तालुक्यात शेतकऱ्यांकडून भात हे मुख्य पीक घेतले जात असले तरी या वर्षीच्या खरीप हंगामात येथील शेतक-यांकडून तुरीची मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात आली आहे. त्याचे सकारात्मक परिणाम आता दिसू लागले आहेत. दरवर्षी खरीप हंगामात मोठ्या प्रमाणात आंतरपीक म्हणून तुरीचे उत्पादन शेतकरी घेत आहेत. तुरीतील पोषक घटकांमुळे थोड्या प्रमाणात कुपोषणावरही मात करण्यास मदत होत असते.विक्रमगड तालुक्यात पावसाळ्यामध्ये प्रामुख्याने पारंपरिक पद्धतीने भातशेती केली जाते. त्यातून येणारे उत्पन्न अत्यंत मर्यादित स्वरूपात असते. काही शेतकरी अत्याधुनिक पद्धतीने शेती करत असले तरी केवळ भातशेतीवर अवलंबून राहणे त्यांनाही आता कठीण होऊन बसले आहे. त्यात भातशेतीमधे उत्पादन खर्च जास्त तर पैसे कमी मिळतात. त्यामुळे काही शेतकरी बांधावरील तूर लागवड करत आहेत. गेल्या पाच-सहा वर्षापासून शेतक-यांना तूर, कडू वाल, हरभरा, उडीद लागवडीसाठी काही सामाजिक संस्था व शासनाच्या कृषी विभागाकडून प्रोत्साहन देऊन त्यांना उत्पादन वाढवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्याचा फायदा येथील शेतक-यांना होताना दिसू लागला आहे. यामुळे शेतक-यांना तुरीचा लाभ घेण्याबरोबरच अतिरिक्त तुरीची विक्री करून त्यातून आर्थिक फायदा मिळवण्याची संधी उपलब्ध झाली आहे.>कुपोषणावर ठरू शकते पर्यायगेल्या दोन-तीन वर्षात तूर डाळीचे भाव सुमारे अडीचशे ते तीनशे रुपयांपेक्षाही जास्त झाले होते. आजही ही भाववाढ कायम आहे आणि नजीकच्या येणाºयाही काळात वाढण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यामुळे या महागाईच्या काळात शेतक-यांना घरच्या घरी तूर डाळीचे उत्पन्न प्राप्त झाले आहे. तूर डाळीतील पोषक घटकांमुळे या डाळीला मोठी मागणी असून त्यामुळे कुपोषणावर मात करणे शक्य ठरेल असे काहींचे म्हणणे आहे. तालुक्यात आदिवासी शेतकºयांना खरीप, रब्बी हंगामात तूर, हरभरा, कडू वाल, उडीद याच्या बियाण्याचे मोफत वाटप करून ही पिके घेण्यास प्रोत्साहन दिल्यास भात पिकाला उत्तम पर्याय ठरून मोठ्या प्रमाणात पोषक घटक असलेल्या डाळी शेतक-यांना घरच्या घरी उपलब्ध होतील व अधिकचे तूर, हरभरा, वाल, उडीदचे उत्पन्न विकून रोजगारही मिळेल. त्यामुळे अनेक वर्ष गाजत असलेल्या कुपोषण कमी करण्यास थोड्या फार प्रमाणात मदत होऊ शकते, असे जाणकार शेतक-यांचे मत आहे.>आंतरपीक म्हणून ठरते फायद्याचेतूर लागवडीसाठी मोठी विस्तृत जागा लागत नाही. शेताच्या बांधावर, माळरानावर या पिकाची लागवड करून भात शेती करणारे शेतकरी तुरीचे आंतर पीक घेऊ शकतात. हे पीक ओसाड माळरान, बांधावर, खाचरावर घेतल्यामुळे मोठ्या प्रमाणात जागेची बचत होते. त्याचप्रमाणे या पिकावर जास्त प्रमाणात किड-रोग येत नाहीत. खताची जास्त आवश्यकता नसते. आंतरपीक म्हणून याची लागवड केल्यामुळे भात पिकाच्या बांधावर वाढणारी तण, गवत यांच्यावर नियंत्रण येऊन किडींचा आणि रोगांचा प्रादुर्भाव रोखला जातो. त्यामुळे भाताचे पिकाचे उत्पन्न बरोबर दुबार पीक घेण्यास मदत होते व शेतक-यांना अधिकचा आर्थिक फायदा होतो.