पालघर : जिल्हा विकास नियोजनाची बैठक उद्या (दि. ११) पालकमंत्री विष्णू सावरा यांच्या अध्यक्षतेखाली होत आहे. यावेळी सुमारे सहाशे कोटी रुपयांचे नियोजन करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, नेमक्या कोणत्या विकास कामांना प्राधान्य दिले जाते, याकडे लक्ष लागले आहे.पालघर जिल्ह्याच्या निर्मितीनंतर प्रथमच ही बैठक होत आहे. यात सामान्य विकासासाठी १११ कोटी ३३ लाख, आदिवासी विकासासाठी ४३७ कोटी, समाज कल्याण १३ लाख ९ हजार असे एकूण ६०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. बैठकीत लोकप्रतिनिधी कोणती विकासकामे सुचवितात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. खासदार चिंतामण वनगा यांच्यासह आमदार, जिल्हाधिकारी उपस्थित राहणार आहे. (प्रतिनिधी)
जिल्ह्याच्या विकासासाठी होणार ६०० कोटींचे नियोजन
By admin | Updated: May 11, 2015 01:16 IST