शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

बोगस बियाणांनी भातशेतीचे नुकसान

By admin | Updated: September 12, 2015 23:08 IST

तालुक्यातील शेतकऱ्यांनी ज्योतिका (अंकुर) व इतर कंपन्यांनी तयार केलेली संकरीत भात बियाणे खरेदी केली होती. ही बियाणे बोगस असल्याने भात पिकात गेसल (भेल) निघाली

वाडा : तालुक्यातील शेतकऱ्यांनी ज्योतिका (अंकुर) व इतर कंपन्यांनी तयार केलेली संकरीत भात बियाणे खरेदी केली होती. ही बियाणे बोगस असल्याने भात पिकात गेसल (भेल) निघाली तर काही भात पिकाना रोगांची लागण झाल्याने ही बियाणे बनविणाऱ्या कंपन्यांच्या विरोधात शेतकऱ्यांनी तक्रारी केल्या होत्या. त्याची दखल घेवून कृषी अधिकाऱ्यांनी कुडूस, खैरा या गावांना भेटी देवून येथील शेतकऱ्यांच्या भातशेतीची पाहणी केली.कुडूस येथील शेतकरी इरफान सुसे यांनी या कंपनी विरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी वाड्याचे पोलीस निरीक्षक संजय हजारे यांच्याकडे केली आहे.कृषी अधिकाऱ्यांच्या पथकाने काल कुडूस येथील तक्रारदार शेतकरी इरफान सुसे, शरद चौधरी व खैरे येथील पुंडलीक देशमुख या शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन संपूर्ण भातशेतीची पाहणी केली. यावेळी काही प्रमाणात भेळ, तर जास्त कालावधीच्या भातात लवकर भात आल्याचे दिसले काही ठिकाणी करपा व पाने गुंडाळणारी आळी (बगळ्या) रोगाची लागण झाल्याचे कृषी अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले.यावर्षी भाताची लागवड करताना भात रोपांचे वय जास्त झाले होते. शिवाय कालावधीच्या अगोदर पिके तयार होत आहेत. भात पिकासाठी आवश्यक असणारा जोराचा पाऊस झालाच नाही व वातावरणातील बदलामुळे भातपीके रोगांची शिकार बनत असल्याचे कृषी अधिकाऱ्यांनी सांगितले. भात पिकांवरील सर्व प्रकारची औषधे पंचायत समितीच्या कृषी विभागाकडे उपलब्ध झाली असून शेतकऱ्यांनी ती ५० टक्के अनुदानावर खरेदी करून भातशेती रोगमुक्त करावी असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे. तालुक्यातील ज्या ज्या शेतकऱ्यांच्या भातशेतीत रोगाची लागण झाली आहे अशा भातशेतीची पाहणी कृषी शास्त्रज्ञांकडून केली जाईल असे यावेळी सांगण्यात आले.