शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजय देवरकोंडा याच्या कारला अपघात, दुसऱ्या कारने मागून दिली धडक
2
NDA, MGB अन् JSP मध्ये थेट सामना, बाकीचे रेसमध्येही नाहीत! बिहार निवडणुकीच्या घोषणेनंतर, काय म्हणाले प्रशांत किशोर?
3
सरन्यायाधीशांवर बूट फेकणाऱ्या वकिलाचं पुढे काय होणार? गवईंनी घेतला मोठा निर्णय 
4
बाकी सगळं मान्य, पण शस्त्र टाकणार नाही..; हमास कुणाचंच ऐकेना, इजिप्तमध्ये बैठकीत काय होणार?
5
भारताविरूद्ध 'अतिआगाऊपणा' पाकिस्तानच्या महिला फलंदाजाला पडला महागात, ICCने सुनावली शिक्षा
6
सरकारचा मोठा निर्णय! राज्यातील सार्वजनिक विद्यापीठात अध्यापकांच्या भरती प्रक्रियेस मान्यता
7
बिहार निवडणुकीपूर्वीच समोर आला धक्कादायक सर्व्हे! महाआघाडीला मोठा झटका, NDA ला किती जागा मिळणार? जाणून थक्क व्हाल!
8
वनडेत ५६४ धावा! प्रतिस्पर्धी संघाला ८७ धावांवर All Out करत या संघानं ४७७ धावांनी जिंकली मॅच
9
Bihar Election 2025 Date: बिहारमध्ये निवडणुकीचा बिगुल! विधानसभेच्या २४३ जागांसाठी दोन टप्प्यांत मतदान; बालदिनी निकाल
10
ब्रेस्ट सर्जरी केली, ९ महिने खेळापासून दूर राहिली...; आता पाहा कशी दिसते 'ही' टेनिसस्टार!
11
बिहारामधील मागच्या ४ निवडणुकांत दिसलाय असा कल, नितीश कुमार ज्या बाजूला तोच विजेता 
12
“भाजपाने तारखा दिल्या, ज्ञानेश कुमारांनी वाचून दाखवल्या”; बिहार निवडणुकीवरून विरोधकांची टीका
13
बिहारसह ‘या’ ७ ठिकाणी होणार पोटनिवडणुका, निवडणूक आयोगाकडून मतदान, निकालाची तारीख जाहीर
14
VIDEO: पिल्लासाठी काहीपण... 'बेबी जिराफ'ची आई सिंहिणीला भिडली, जवळ येताच लाथ मारली अन्...
15
महिला वनडे वर्ल्ड कपच्या इतिहासात दुसऱ्यांदा असं घडलं; न्यूझीलंडसह सुझीच्या नावे लाजिरवाणा विक्रम
16
आता एका क्लिकवर मिळेल उमेदवारांची संपत्ती आणि गुन्हेगारी रेकॉर्ड; 'हे' ४ ॲप्स लॉन्च!
17
या वर्षीच्या वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्काराची घोषणा, अमेरिकेच्या 2 तर जपानच्या एका संशोधकाचा संयुक्त सन्मान
18
सरन्यायाधीश गवईंवर बूट फेकण्याचा प्रयत्न करणारा वकील कोण? कशामुळे हे घडलं?
19
मोठी बातमी! राज्यातील २४७ नगरपालिका, १४७ नगरपंचायतींसाठी आरक्षण जाहीर; कोण मिळवणार सत्तेची खुर्ची?
20
'तुम्ही इतके दिवस कुठे होतात'; मुलांसह लेणीत राहणाऱ्या रशियन महिलेच्या पतीला सर्वोच्च न्यायालयाने झापले

लोकप्रतिनिधींना प्रवास फुकट

By admin | Updated: October 7, 2016 04:34 IST

तोट्यात असल्याचे कारण पुढे करीत सरकारचा कोट्यवधी रुपयांचा कर थकवणाऱ्या आणि सर्वसामान्य प्रवाशांवर दरवाढीचा बोजा टाकणाऱ्या वसई विरार पालिकेच्या परिवहन समितीने

शशी करपे /वसर्ईतोट्यात असल्याचे कारण पुढे करीत सरकारचा कोट्यवधी रुपयांचा कर थकवणाऱ्या आणि सर्वसामान्य प्रवाशांवर दरवाढीचा बोजा टाकणाऱ्या वसई विरार पालिकेच्या परिवहन समितीने आजी माजी खासदार, आमदारांसह विद्यमान नगरसेवकांना बसमधून मोफत प्रवास सवलत जाहीर केली आहे. सतत वादग्रस्त ठरत असतानाही,नवनव्या सुविधांचे गाजर दाखवून प्रवाशांना आकर्षित करु पाहणाऱ्या परिवहन सेवेच्या बसेसमधून प्रवास करण्याची खासदार-आमदारांसह नगरसेवकांना आवश्यकता असल्याचा जावई शोध वसई-विरार महापालिकेच्या परिवहन समितीने लावला आहे.महापालिकेच्या परिवहन सेवेला नुकतीच चार वर्षे पूर्ण झाली आहेत. या चार वर्षात अपघात, काळा विषारी धूर सोडणाऱ्या बसेस, उर्मट चालक-वाहक,प्रवाशांना डावलून दुचाकी वाहनाची केलेली वाहतूक,कालबाह्य बसेस, ७० वर्षांचा म्हातारा ड्रायव्हर अशा अनेक कारणास्तव महापालिकेची परिवहन सेवा वादग्रस्त ठरत गेली. परिवहन खाते आणि ट्रॅफीक पोलिसांनी परिवहनच्या बसेसवर दंडात्मक कारवाया केल्या आहेत. तसेच परिवहन खात्याने सेवा सुधारण्यासंबंधीच्या अनेक नोटीसा बस सेवा चालवणाऱ्या ठेकेदाराला बजावल्या आहेत. त्यामुळे सेवेची प्रतिमा चांगली करण्यासाठी परिवहन समितीद्वारे अनेक महामार्गावर बसेस सुरु करण्याबरोबरच सवलतीच्या घोषणा केल्या आहेत. पाचव्या वर्षात पर्दापण करीत असलेल्या परिवहन सेवेने आजी माजी खासदार, आमदार आणि विद्यमान नगरसेवकांसह परिवहन समिती सदस्यांना मोफत प्रवास सुविधा जाहीर केली आहे. डायलिसीसच्या रुग्णांना राखीव सीट,पुढच्या दाराने प्रवेश आणि तिकीटाच्या दरात सवलत देण्यात येणार आहे.सर्व प्रवाशांना मोफत वायफाय सेवा,दोन महिन्यांच्या पासावर तीन महिने प्रवास करण्याची सुविधा दिली जाणार आहे. या सुविधा सोमवारपासून लागू करण्यात आल्या आहेत. माजी खासदार, आजी-माजी आमदार आणि नगरसेवकांना दिलेल्या मोफत प्रवासाच्या सुविधेमुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. यातील मोजक्या नगरसेवकांना वगळता जवळपास सर्वांकडे स्वत:च्या आलीशान गाड्या आहेत. तसेच अनेक जण आपल्या लवाजम्यासह फिरत असतात. त्यांना या सुविधेची कोणतीही आवश्यकता नाही. उलट परिवहन सेवा तोट्यात असल्याने ठेकेदाराने कर भरला नसल्याचे लेखी पत्र पालिकेच्या उपायुक्तांनी दिले आहे. विशेष म्हणजे पालघर जिल्ह्यात सध्या कुपोषणाने डोके वर काढले आहे. त्याच जिल्ह्यातील मोठी आणि श्रीमंत असलेल्या वसई विरार पालिकेचा परिवहन सेवेचा ठेकेदार बाल पोषण आहार अधिभाराची लाखो रुपयांची रक्कम सरकारी तिजोरीत भरण्याऐवजी स्वत: वापरत असल्याकडे सरकारी यंत्रणाही दुर्लक्ष करीत असल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येते.बाल पोषण आहार अधिभाराचे ५० लाख भरलेच नाहीच्तोट्यात चालत असल्याचे कारण पुढे करीत परिवहन सेवेच्या तिकीट दरात काही महिन्यांपूर्वीच वाढ करून सर्वसामान्य प्रवाशांवर बोजा टाकला होता. धक्कादायक बाब म्हणजे ठेकेदाराने प्रवाशांकडून वसूल केलेला सरकारचा कोट्यवधीचा कर तोटा असल्याने थकवल्याची कबुली खुद्द महापालिकेने माहिती अधिकारात दिली आहे. ठेकेदाराने प्रवाशांकडून सरकारी तिजोर ीत भरणा करावयाचा जानेवारी २०१४ ते जून २०१६ पर्यंत वसूल केलेला २ कोटी ७१ लाख ५० हजार रुपयांचा प्रवासी कर थकवला आहे. च्त्याचबरोबर बाल पोषण आहार अधिभारापोटी ठेकेदाराने प्रवाशांकडून वसूल केलेले एप्रिल २०१४ ते जून २०१६ पर्यंत ५० लाख ७९ हजार ९४८ रुपये अद्याप सरकारी तिजोरीत न भरता स्वत:कडे ठेवले आहेत. ठेकेदाराने या रकमेसह सप्टेंबर महिन्याअखेरपर्यंत वसूल केलेली रक्कम सरकारच्या तिजोरीत अद्याप जमा केलेली नाही.