शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
3
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
4
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
5
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
6
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
7
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
8
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
9
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
10
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
11
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
12
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
13
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
14
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
15
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
16
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
17
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
18
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
19
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
20
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण

करोडो रुपये खर्चूनही जनता तहानलेलीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2019 23:35 IST

शहरात टंचाई तशीच : ५ वर्षात तब्बल ८२१ कोटी ५२ लाख ६० हजार रु पये खर्च

नालासोपारा : वसई तालुक्यातील नालासोपारा वसई, विरार आणि नायगाव या शहरांना तीन धरणांतून पाणीपुरवठा होत असून महानगरपालिकेने या पाणी पुरवठ्यासाठी पाच वर्षात तब्बल ८२१ कोटी ५२ लाख ६० हजार रुपये खर्च केले आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणात खर्च करूनही शहरात पाणी टंचाई असून टँकर लॉबी सक्रीय झाली असून त्यांच्यामार्फत पाणीपुरवठा होत असल्याचा गंभीर आरोप माजी नगरसेवक राजकुमार चोरघे यांनी केला आहे.

वसई - विरार शहर महानगरपालिका हद्दीतील शहरे तसेच गावांना सूर्या धरणातून २३० एमएलडी, उसगाव धरणातून २० एमएलडी आणि पेल्हार धरणातून १० एमएलडी पाणीपुरवठा होतो. पाणी पुरवठ्यासाठी गेल्या ५ वर्षांमध्ये ८२१ कोटी ५२ लाख ६० हजार रुपये खर्च करण्यात आला आहे. तरीही शहरांमध्ये भीषण पाणी टंचाई असून विशेषत: नालासोपारा शहरात पूर्वेकडे दररोज २०० टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे. एकूण खर्चाचा तपशील चोरघे यांनी महानगरपालिकेच्या २०१९-२०२० च्या अर्थसंकल्पावरून काढला आहे. यात महानगरपालिकेने पाणी पुरवठ्यावर ८२१ कोटी खर्च केल्याचा दावा केला असल्याचे सांगितले आहे. मात्र, वसई तालुक्याला जर २६० एमएलडी पाणीपुरवठा होत असेल तर अर्धी जनता तहानलेली का आहे, असा सवाल नागरिक करत आहेत.नालासोपाऱ्यातील वाढती लोकसंख्या लक्षात घेता महानगरपालिकेने सर्वच ठिकाणी सर्व्हे करून पाणी पुरवठा सुरळीत किंवा पाईपलाईन लागतील तर टाकल्या पाहिजेत. काही सोसायट्यांना महानगरपालिकेकडून कमी पाणीपुरवठा होत असून त्यामुळे पिण्यासाठी पाणी मिळत नसून पैसे खर्च करून बिसलेरी विकत आणून पाणी प्यावे लागत आहे. यामुळे नागरिकांमध्ये संताप आहे.विरार पूर्वेकडी परिसरात २४ तास पाणी पुरवठाच्विरार पूर्वेकडील फुलपाडा, कारगील नगर, मनवेलपाडा, नाना नानी पार्क या परिसरामधील चाळी, अनधिकृत इमारतींना महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागाकडून २४ तास पाण्याचा पुरवठा होत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे. कोणत्या तरी धरणाचे पाणी याठिकाणी पाईप लाईनद्वारे या परिसरात पुरवले जात असल्याचे सूत्रांकडून कळते.च्प्रभागात पाणी पुरवठा करण्यासाठी महानगरपालिकेने व्हॉल्व्हमॅन ठेवले आहेत. काही व्हॉल्व्हमॅन इमारतीकडून पैसे घेऊन जास्त पाणी सोडत आहे तर जी इमारत पैसे देत नाही तिथे कमी पाणी सोडले जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.कोणकोणत्या वर्षी कितीखर्च करण्यात आला?२०१५-१६ १४७ कोटी ७ लाख ९९ हजार२०१६-१७ ९३ कोटी ४८ लाख ४१ हजार२०१७-१८ ८८ कोटी ४९ लाख ७८ हजार२०१८-१९ १७३ कोटी ६ लाख ७५ हजार२०१९-२० ३१९ कोटी ३९ लाख ६७ हजारबविआला आगामी नालासोपारा विधानसभेत फटका बसणारगेल्या २५ वर्षांपासून वसई तालुक्यात पाण्याच्याच प्रश्नावरून बहुजन विकास आघाडी सत्ता भोगत आहे. पण गेल्या २ महिन्यापासून अनियमित पाणीपुरवठा तसेच गढूळ पाणी यामुळे अनेक परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहेत. नालासोपारा हा बविआचा गड असूनही लोकसभा निवडणुकीत येथून शिवसेनेला बविआपेक्षा २७ हजारांचा लीड मिळाला होता. यामुळे वेळीच बविआ अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांनी येथे लक्ष दिले नाही तर आगामी विधानसभेत बविआला फटका बसून युतीचा उमेदवार निवडून येईल अशी चर्चा दबक्या आवाजात नागरिकांमध्ये सुरू आहे.टँकर लॉबीचा धंदा तेजीतनालासोपारामध्ये अंदाजे २०० ते ३०० टँकर आहेत. हे टँकर बांधकामांना पाणी पुरवतात. आता लोकांना मनपाचा पाणी पुरवठा सुरळित होत नसल्याने अव्वाच्या सव्वा पैसे घेऊन लोकांना टँकर पुरवला जात आहे. ८०० ते १००० रु पयांच्या टँकरसाठी आता ते १८०० ते २००० रूपये घेत आहे. त्यामुळे या टँकर लॉबीचा धंदा तेजीत आहे.ही आकडेवारी कुठून आली त्याबद्दल मला माहित नसून त्याच्याबद्दल बोलणार नाही. २६९ कोटींची शासन योजना मंजूर झाली असून ती पूर्ण केली आहे. अतिरिक्त १०० दशलक्ष पाणी वर्षापूर्वीच शहरात आले आहे. काही भागात पाणी मिळत नाही याचे कारण पाईपलाईन सगळीकडे पोहोचलेली नाही. नव्याने विकसित झालेल्या भागामध्ये पाईपलाईन टाकण्याचे काम जोरात सुरू आहे. - महादेव जवादे (शहर अभियंता, पाणी पुरवठा विभाग.)

टॅग्स :Vasai Virarवसई विरार