शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
6
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
7
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
8
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
9
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
10
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
11
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
12
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
13
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
14
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
17
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
18
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
19
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
Daily Top 2Weekly Top 5

केंद्रीय राज्यमंत्र्यांसोबत ‘किसान गोष्टी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2019 00:27 IST

‘किसान गोष्टी’तून शेतकऱ्यांशी संवाद आणि वृक्षारोपण हा अविस्मरणीय क्षण असल्याचे प्रतिपादन केंद्रीय राज्यमंत्री (कृषी व किसान कल्याण विभाग) पुरुषोत्तम रुपाला यांनी कोसबाड हिल येथे केले.

डहाणू/बोर्डी : पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्रातील पहिल्या कृषी विज्ञान केंद्रात आयोजित कार्यक्रमात ‘किसान गोष्टी’तून शेतकऱ्यांशी संवाद आणि वृक्षारोपण हा अविस्मरणीय क्षण असल्याचे प्रतिपादन केंद्रीय राज्यमंत्री (कृषी व किसान कल्याण विभाग) पुरुषोत्तम रुपाला यांनी कोसबाड हिल येथे केले. यावेळी त्यांनी पंतप्रधानांच्या सहवासातील आठवणींना उजाळा आणि केंद्र शासनाच्या विविध योजनांची माहिती दिली.या कृषी विज्ञान केंद्रातील विविध उपक्रमाविषयी माहिती, प्रयोगशाळेची पाहणी, औषधी वनस्पतींचे रोपण तसेच सरस्वती पूजनानंतर कार्यक्र माला प्रारंभ झाला. यावेळी शेतकरी, कृषी शास्त्रज्ञ आणि मान्यवरांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाढदिवसाच्या सामूहिक शुभेच्छा दिल्या. ते या दिवशी पुष्पगुच्छही न स्वीकारता आईचा आशीर्वाद घेऊन थेट कामाला सुरुवात करतात, या त्यांच्या कार्यपद्धतीची त्यांनी माहिती दिली. आपल्या विद्यार्थी दशेतील अनुभव कथन करताना रुपाला म्हणाले की, त्यावेळी अन्नधान्य दुष्काळाचा सामना करावा लागला होता. सर्वांची ही गरज पूर्ण व्हावी म्हणून देशभर प्रत्येक सोमवारी उपवास केला पाहिजे, असे आवाहन तत्कालीन पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांनी केले होते, आणि त्याला देशवासियांनी सकारात्मक प्रतिसाद दिला होता. त्याचप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत आणि वृक्षारोपण कार्यक्रमालाही संपूर्ण देशातून प्रतिसाद मिळत असल्याचे ते म्हणाले. या जिल्ह्यात चिकू बागायती संकटात असल्याचे निवेदन उत्पादकांनी दिले असून हा प्रश्न प्राधान्याने सोडविणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले.प्रत्येकाने रोपे लागवड करताना ते टॅग करावे हे सांगताना वृक्षारोपणाचे महत्त्व त्यांनी विशद केले. केंद्र सरकारच्या तिजोरीतून शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणे ही खूपच मोठी गोष्ट असून महाराष्ट्र सरकारही हे काम उत्तमरीत्या करीत आहे. देशात २५ लक्ष ग्रामपंचायती असून त्यांना २ लाख करोडचा निधी केंद्र शासनाकडून दिला जातो. तर गावातील प्रति लाभार्थ्यांच्या बँक खात्यात प्रतिवर्षी ४८८ रु पये जमा होतात. वीज, पाणी, गॅस हे शेवटच्या घटकापर्यंत मिळाले पाहिजे, यासाठी मोदी प्रयत्नशील असल्याचे ते म्हणाले.दरम्यान प्रमुख शास्त्रज्ञ प्रा.विलास जाधव यांनी या कार्यक्र माच्या प्रास्ताविकात कोसबाड कृषी विज्ञान केंद्राच्या कार्याची माहिती दिली. पाड्यावरच्या आदिवासी बांधवांनी चितारलेली वारली पेंटिंग देऊन केंद्रीय राज्यमंत्र्यांचे स्वागत करण्यात आले. शेतकरी प्रतिनिधी नारायण पटलारी, उत्कृष्ट महिला शेळीपालक यांना सन्मानित करण्यासह उपस्थित शेतकºयांना विविध प्रकारची फळांची कलमे भेट देण्यात आली.