शहरं
Join us  
Trending Stories
1
'तरुणी हव्या आहेत, घसघशीत कमिशन मिळेल'; युपी-बिहार सोडून केरळमध्ये रचला जातोय भारताविरोधात मोठा कट
2
निसर्ग कोपला! एका दिवसात ११ ठिकाणी ढगफुटी, पूर आणि भूस्खलन; हिमाचल प्रदेशात हाहाकार
3
गाझापट्टीत ६० दिवस युद्धविराम; अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांचा आणखी एक मोठा दावा
4
FD-RD विसरून जा, हा आहे LIC चा ‘अमृत’ प्लान; आयुष्यभर पडेल पैशांचा पाऊस, टेन्शन संपेल
5
गोगावलेंवर भाजप आमदार भडकले; विधानभवनात परिसरात झाली शाब्दिक चकमक
6
"माझी डॉक्टर पत्नी पाकिस्तानची गुप्तहेर..."; व्यावसायिक पतीचा खळबळजनक दावा, तपास यंत्रणेकडे तक्रार
7
तीन महिन्यांत ७६७ शेतकरी आत्महत्या; मदत व पुनर्वसन मंत्र्यांची विधान परिषदेत कबुली
8
नाना पटोले अध्यक्षांकडे धावले; राजदंडाला हात लावला, निलंबित
9
Navi Mumbai: धक्कादायक! नवजात बाळाला प्रवाशांकडे सोडून जन्मदात्री गेली पळून, गुन्हा दाखल
10
२० हून अधिक गर्लफ्रेंड, १० जणींसोबत शारीरिक संबंध; पोलिसांच्या जाळ्यात अडकला 'बोगस पोलीस'
11
पंचतारांकित हॉटेलमध्ये नेऊन विद्यार्थ्याचं लैंगिक शोषण, प्रतिष्ठित शाळेतील शिक्षिका अटकेत  
12
आजचे राशीभविष्य- २ जुलै २०२५: 'या' राशीतील लोकांनी अवैध कृत्यांपासून दूर राहा, वाणीवर संयम ठेवा
13
मुलींचे लैंगिक शोषण; नराधमांना सोडणार नाही; बीड कोचिंग क्लास प्रकरणात एसआयटी
14
"मी ना तिचा बाप आहे ना बॉयफ्रेंड", 'त्या' अभिनेत्रीसोबतच्या नात्यावर आमिर खानची प्रतिक्रिया
15
"ब्लड टेस्ट करायला गेल्यावर १० मिनिटांनी.."; अंशुमन विचारेच्या पत्नीने सांगितला धक्कादायक अनुभव, काय घडलं?
16
शेतकऱ्यांना फसविले, विमा कंपन्या होणार ब्लॅक लिस्ट; कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंची माहिती
17
‘ठाकरे ब्रँड’चे शनिवारी मेळाव्यानिमित्त शक्तिप्रदर्शन; राज-उद्धव वरळी डोममध्ये एकाच व्यासपीठावर
18
शालार्थ आयडी, ३ महिन्यांत होणार एसआयटी चौकशी, शिक्षणमंत्री दादा भुसेंची माहिती
19
कोण खरे बोलते आहे? आणि कोणाचे दावे झूठ आहेत?
20
कुंडमळा पुलाच्या बांधकामात दिरंगाई झाली; सार्वजनिक बांधकाममंत्री भोसले यांची कबुली

पटेल आंदोलनाचा प.रे.ला फटका

By admin | Updated: August 26, 2015 23:58 IST

गुजरात राज्यात पटेल समाजाच्या आरक्षणाच्या मुद्यावरून जनजीवन विस्कळीत झाल्याने मुंबईकडे येणाऱ्या पश्चिम रेल्वेच्या लांब पल्ल्यांच्या गाड्या तीन ते सात तास उशिराने धावत आहेत.

पालघर : गुजरात राज्यात पटेल समाजाच्या आरक्षणाच्या मुद्यावरून जनजीवन विस्कळीत झाल्याने मुंबईकडे येणाऱ्या पश्चिम रेल्वेच्या लांब पल्ल्यांच्या गाड्या तीन ते सात तास उशिराने धावत आहेत. याचा मोठा फटका पालघर जिल्ह्यातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना बसला असून त्यांना बुधवारी झालेल्या परीक्षेला बसता आले नाही. शिवाय, मासे, फळे, फुले, भाजीपाल्याचेही नुकसान होत अनेक चाकरमान्यांना घराकडे वळावे लागले.पालघर जिल्ह्यातील डहाणू, तलासरी, पालघर या तालुक्यांतील नोकरदार, महाविद्यालयीन विद्यार्थी, बागायतदार, मच्छीमार व्यवसाय व नोकरीच्या निमित्ताने रोज मुंबईकडे जात असतो. परंतु, गुजरात राज्यातील नेते हार्दिक पटेल यांनी पटेल, पाटीदार समाजाला आरक्षण द्यावे, या मागणीसाठी आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाने हिंसक वळण घेतल्याने जाळपोळ होत काही ठिकाणी रेल्वे ट्रॅकही आंदोलनकर्त्यांनी उखडले आहेत. या आंदोलनाचा मोठा फटका मुंबईकडे येणाऱ्या रेल्वे ट्रेन्स्ला बसला असून पालघर रेल्वे स्टेशनमध्ये पहाटे ३.४५ वाजता येणारी सौराष्ट्र जनता एक्स्प्रेस सकाळी ७.२० वाजता, सकाळी ४ वाजता येणारी लोकशक्ती एक्स्प्रेस ७.५० वा., सकाळी ५ वाजता येणारी सौराष्ट्र मेल दुपारी १२ वाजता तर सकाळी ७.३० वाजता येणारी रणकपूर एक्स्प्रेस १०.३० वाजता आल्या. मेमू शटल न सोडल्याने प्रवाशांचे हाल सफाळे येथील अनेक विद्यार्थ्यांचा बुधवारी एफ.वाय.बी.ए.च्या वर्गाचा पॉलिटिकल सायन्स विषयाचा पेपर असल्याने त्यांना पहाटे ४:०८ वा. सुटणारी लोकशक्ती एक्स्प्रेस पकडायची होती. मात्र, ही गाडी तब्बल ३ तास ५० मि. उशिराने आल्याने परीक्षेला मुकावे लागले. तर, भाजीपाला, फळे, दूध, मासे घेऊन मुंबईला जाणाऱ्या व्यावसायिकांना मुंबईमध्ये वेळेवर पोहोचता आले नसल्याने त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. दरम्यान, प. रेल्वेने डहाणू ते विरारदरम्यान साडेतीन ते साडेपाचदरम्यान एकही जादा लोकल अथवा मेमू शटल न सोडल्याने प्रवाशांचे मोठे हाल झाले.