शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

पार्टीतील वादातून मित्राला कारने टक्कर देऊन चिरडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2018 00:35 IST

मैत्रिणीच्या वाढदिवसाच्या पार्टीमध्ये मित्रांमध्ये झालेल्या वादाचे पर्यावसन एकाच्या मृत्यूमध्ये झाल्याची घटना तालुक्यातील आच्छाड येथे मंगळवारी पहाटे घडली

तलासरी : मैत्रिणीच्या वाढदिवसाच्या पार्टीमध्ये मित्रांमध्ये झालेल्या वादाचे पर्यावसन एकाच्या मृत्यूमध्ये झाल्याची घटना तालुक्यातील आच्छाड येथे मंगळवारी पहाटे घडली. या प्रकरणी आरोपी निमेश तन्हा हा फरारी असून तलासरी पोलिसात या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.पूजा जाधव हिच्या वाढिदवसानिमित्त तालुक्यातील आच्छाड येथे सोमवारी पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. तीमध्ये वापीहुन आलेले निमेश तन्हा व परमजीत सिंग यांच्यात झालेल्या वादाचे पर्यावसन हाणामारीत झाले होते. मात्र, मित्रांनी मध्यस्थी करुन तो सोडविला. मात्र, पहाटे पर्यंत चाललेल्या या पार्टीतून परत चाललेल्या मित्रांनी निमेशला सोबत घेतले नव्हते. या रागातून त्याने मित्र चाललेल्या कारला आपल्या गाडीने टक्कर दिली. त्याचा जाब विचारण्यासाठी उतरलेल्या प्रतीक कांतिभाई पटेल (रा. वापी) याला त्याने जोराची धडक दिली. त्यात तो चिरडून मृत्यूमुखी पडला. मंगळवारी पहाटे हा प्रकार घडल्यानंतर आरोपी फरार झाला असल्याचे तलासरी पोलिसांनी सांगितले. दरम्यान, रात्रभर सुरू असलेल्या हॉटेलमध्ये पार्ट्या व त्यानंतर हत्या झाल्याने रात्रभर सुरू असलेल्या हॉटेलचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.