शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

वसई परिसरात वानराची दहशत; विद्यार्थी, नागरिकांमध्ये भीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2020 22:59 IST

वनविभागाकडून विशेष पथकाची नियुक्ती

पारोळ : वसई तालुक्यातील पूर्व भागाला लाभलेल्या डोंगरी भागातील खानिवडे व परिसरातील नवसई, शिवणसई, शिरसाड, खराटतारा आदी भागात मागील चार-पाच दिवसांपासून एका जंगली वानराचा मुक्त संचार सुरू असून त्याच्या दहशतीमुळे भागातील महिला व विद्यार्थी एकट्याने घराबाहेर पडण्यात घाबरत आहे.

अजूनपर्यंत वनराने कुणावरही हल्ला केला नसला तरी या परिसरातील विद्यार्थी तसेच महिला वर्गात भीतीचे वातावरण आहे. हे वानरशिरसाडच्या जगद्गुरू नरेंद्राचार्य मठात, गावातील घरादाराच्या ओट्यावर व अंगणात असलेल्या दुचाक्यांवर बिनधास्त बसत असल्याचेदिसून आले आहे. त्याच्या मुक्त संचाराने या भागातील नागरिकांत त्याच्या दहशतीची छाया पसरली असून वनखात्याला याची वर्दीदिल्याप्रमाणे वनकर्मचारी व डहाणू येथील विशेष पथक वानराला जेरबंद करण्यासाठी प्रयत्न करताना दिसत आहे. मात्र शनिवारीही त्यांच्या जाळ्यात हे वानर सापडले नाही. साधारण चार ते पाच फूट उंची, त्याहीपेक्षा जास्त लांबीची शेपटी, आयाळीसह अंगभर सफेद केस आणि काळ्या तोंडाचे नर जातीचे हे वानर आहे. दिवसभरात हे वानर सकाळी प्रतिभा विद्यामंदिर शाळेतील मुलांच्या घोळक्याकडे धावून आले होते. तर दोन सत्रांत शाळा सुटण्याच्या व भरण्याच्या वेळेस हे वानर विद्यार्थ्यांबरोबर येत असल्याचे दिसताच बेसावधविद्यार्थ्यांची त्रेधातिरपीट उडाली होती. सदर वानर हे तुंगारेश्वर अभयारण्यातून आले असावे असा अंदाज व्यक्त केला जात आहे. तसेच खानिवडे येथील जंगलात अशी अनेक वानरे असल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे. या वानराला जेरबंद करण्याचा प्रयत्न करणाऱ्या विशेष पथकाच्या गाडीवर सुद्धा हे वानर बसले होते. मात्र तरीही ते हातातून निसटल्याचे पथकाकडून सांगण्यातआले.

या भागातील जंगलांत माणसांनी केलेल्या अतिक्रमणामुळे जंगली प्राणी मनुष्य वस्त्यांमध्ये घुसत असल्याचे जाणकार सांगत असूनलवकरच हे वानर जेरबंद करू असे वनकर्मचाऱ्याने सांगितले.