शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

वसई तालुक्यातील पाली-सत्पाळ्यात ४० जणांची माघार, ३५ उमेदवार रिंगणात 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2021 00:15 IST

१५ जानेवारी रोजी मतदान : १८ जानेवारीला होणार उमेदवारांचा फैसला

सुनील घरतलोकमत न्यूज नेटवर्कपारोळ :  वसई तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचे बिगुल वाजले असून नवीन वर्षातील ही पहिली निवडणूक असल्याने सर्व राजकीय पक्षांनी पाली व सत्पाळा ग्रामपंचायत निवडणुकीत आपले उमेदवार उभे केले आहेत. सोमवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी ४० उमेदवारांनी अर्ज मागे घेतले असून आता ३५ उमेदवार रिंगणात उरले आहेत.  कोरोनाकाळात मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींची निवडणूक जाहीर झाली असून यात पालघर जिल्ह्यात फक्त तीन ग्रामपंचायतींचा समावेश आहे. पालघर तालुक्यातील सांगावे तसेच वसईतील पाली आणि सत्पाळा या ग्रामपंचायतींमध्ये निवडणुका होत आहेत. वसईतील दोन ग्रामपंचायत निवडणुकांसाठी ७५ अर्ज आले होते. माघार घेण्याच्या दिवशी ४० जणांनी आपले अर्ज मागे घेतल्याने आता सत्पाळा ग्रामपंचायतीमध्ये २७ उमेदवार तर  पालीमध्ये आठ उमेदवार रिंगणात आहेत. विधानसभा निवडणुकीनंतर कोरोना महामारीमुळे कोणतीही निवडणूक न झाल्याने वर्षभरातील ही पहिलीच ग्रामपंचायत निवडणूक आहे. त्यामुळे सर्व राजकीय पक्षांतील कार्यकर्ते यांनाही या ग्रामपंचायत निवडणुकीची उत्सुकता आहे. 

सर्वच राजकीय पक्षांचे उमेदवार आजमावताहेत नशीबवसई तालुक्याच्या ग्रामीण भागात होत असलेल्या दोन ग्रामपंचायत निवडणुकीकडे साऱ्यांचेच लक्ष लागले आहे. या निवडणुकीमध्ये सर्वच राजकीय पक्षांचे स्थानिक कार्यकर्ते निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. आधी बहुजन विकास आघाडीची सत्ता असलेल्या या ग्रामपंचायतींमध्ये अन्य पक्षांनीही मोठा जोर लावला आहे. 

उमेदवारांची निवडणुकीतून मोठ्या प्रमाणात माघार प्रत्येक राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्याच्या दृष्टीने ग्रामपंचायत निवडणूक ही राजकारणातील प्रवेशाची पहिली पायरी असते. त्यामुळे या दोन ग्रामपंचायतींच्या केवळ ७ प्रभागांसाठी तब्बल ७५ जणांनी उमेदवारी अर्ज भरले होते. मात्र देण्या-घेण्याचे व्यवहार तसेच अन्य बाबींमधील मतैक्यानंतर ४० जणांनी माघार घेतली आहे. 

वसई तालुक्यातील पाली आणि सत्पाळा या दोन ग्रामपंचायतींच्या होत असलेल्या  निवडणुकीमध्ये उमेदवारांना सोमवारीच निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात आले आहे. १५ जानेवारी रोजी होत असलेल्या मतदानासाठी प्रशासन सज्ज झालेले आहे. परिसरात काही अनुचित घटना घडू नये यासाठी काळजी घेतली जात असून १८ जानेवारी रोजी मतमोजणी होणार आहे. -उज्ज्वला भगत, तहसीलदार, वसई

राजकीय पक्षांसाठी महत्त्वाची लढाई कोरोनानंतर येथील राजकीय पक्षांसाठी ही पहिली निवडणूक असल्याने ती जिंकण्यासाठी मोठे हातपाय मारावे लागणार आहेत. वसई तालुक्यात वर्षभरात वसई-विरार शहर महापालिका तसेच अनेक काही ग्रामपंचायत निवडणुकींचा कार्यक्रम लवकरच जाहीर होण्याची शक्यता असल्याने पुढे येऊ घातलेल्या निवडणुकीसाठी ही ग्रामपंचायत निवडणूक जिंकणे महत्त्वाचे ठरणार आहे.