शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

पिंजाळ नदीवरील पाली बंधाऱ्याला गळतीचा फटका; पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2020 23:17 IST

भाजीपाला लागवड केलेला शेतकरी चिंतातुर

वाडा : तालुक्यातील पिंजाळ नदीवरील पाली येथे असलेल्या कोल्हापुरी बंधाºयाला मोठ्या प्रमाणात गळती लागली असून बंधाºयातील पाणी मोठ्या प्रमाणात वाया जात आहे. काही दिवसातच हा बंधारा कोरडा पडण्याची भीती आहे. याचा फटका आजुबाजूच्या गावातील नळयोजना आणि भाजीपाला लावलेल्या शेतकऱ्यांना बसणार आहे.

वाडा आणि विक्रमगड तालुक्यातून वाहणाºया पिंजाळ नदीवर अनेक ठिकाणी बंधारे बांधले आहेत. काही ठिकाणी जुने झालेले बंधारे तर काही ठिकाणी निकृष्ट बांधकामामुळे हे बंधारे निकामी झाले आहेत. याचा फटका अनेक गावांना आणि शेतकºयांना बसत असून पिण्याच्या पाण्याचा आणि शेतीसाठी लागणाºया पाण्याचा प्रश्न निर्माण होत आहे.

पिंजाळ नदीवरील पाली येथील बंधाºयाच्या पाण्याचा अनेक गावांना पाणीपुरवठा केला जातो. तसेच या पाण्याच्या आधारे मोठ्या प्रमाणात शेतकºयांनी भाजीपाला लागवड केली आहे. मात्र, बंधाºयाला लागलेल्या गळतीमुळे बंधाºयातील पाणी काही दिवसांतच पूर्णपणे खाली होणार आहे. अजूनही पावसाळा येण्यासाठी पाच महिने बाकी आहेत. जर बंधाºयाची गळती थांबली नाही, तर बंधारा पूर्ण कोरडा पडून पाण्याअभावी लावलेला भाजीपाला जळून जाणार असून शेतकºयांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे. आधीच संकटात असलेला बळीराजा पुन्हा संकटात सापडणार आहे. त्यामुळे प्रशासनाने आणि लघू पाटबंधारे विभागाने त्वरित लक्ष देऊन या बंधाºयाची दुरूस्ती करून होणारी पाण्याची गळती थांबवण्याची मागणी शेतकरी आणि नागरिक करत आहेत. पाली येथील पिंजाळ नदीवर असलेल्या कोल्हापुरी बंधाºयाला २८ दरवाजे असून ते पावसाळ्यानंतर लोखंडी प्लेट टाकून बंद केले जातात. मात्र, या सर्व दरवाज्यांमधून मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती राहते. या प्लेट रबराने बंद करावयाच्या असतात.पिंजाळ नदीवरील पाली येथील बंधाºयाच्या पाण्यावर मोठ्या प्रमाणात भाजीपाला लागवड केली आहे. मात्र बंधाºयाला लागलेल्या गळतीमुळे या बंधाºयातील पाणी पूर्णपणे खाली होणार आहे. या गळतीमुळे काही दिवसांतच बंधारा कोरडा पडेल. त्यामुळे आम्हा शेतकºयांसाठी पाण्याचे मोठे संकट निर्माण होणार आहे. प्रशासनाने लवकरात लवकर ही गळती थांबवावी आणि आम्हा शेतकºयांना दिलासा द्यावा. - सागर सालकर, शेतकरीया बंधाºयाचे गेट चांगल्या प्रकारे बसविण्यात आले होते. मात्र वाळूमाफिया हे बंद केलेले गेट उघडत असल्याने पाणी वाया जात आहे. याबाबत आम्ही तहसीलदार आणि पोलीस कार्यालयात लेखी पत्र दिले आहे. तसेच बंधाºयाच्या दुरूस्तीचे काम काढण्यात आले आहे. मात्र, ठेकेदाराने ते काम केलेले नाही. यंदा हे दुरुस्तीचे काम केले जाईल. - एम.आर.पाटील, लघु पाटबंधारे विभाग