शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

पालघरच्या दोन कंपन्या बंद

By admin | Updated: June 30, 2017 02:37 IST

अलीकडेच काही दिवसांपूर्वी प्रदूषण नियामक मंडळाने बोईसर एमआयडीसी परिसरातील प्रदूषण करीत असलेल्या कंपन्यांवर

लोकमत न्यूज नेटवर्कपालघर : अलीकडेच काही दिवसांपूर्वी प्रदूषण नियामक मंडळाने बोईसर एमआयडीसी परिसरातील प्रदूषण करीत असलेल्या कंपन्यांवर कारवाईचा बडगा उचलला होता व त्या कंपन्या बंद करण्याचे आदेशही दिले होते. मात्र पालघर मध्येही कंपन्यांमार्फत प्रदूषण सुरु असताना त्यावर कारवाई अपेक्षित होती. प्रदूषण मंडळाने दिलेल्या आदेशानुसार पिडको औद्योगिक वसाहतीतील सेफेक्स फायर सर्व्हिसेस व डिलक्स रिसायकलिंग लि. मी. या दोन कंपन्या तात्काळ बंद करण्याचे आदेश पालघर प्रांताधिकारी विकास गजरे यांनी दिले आहेत.प्रदूषण नियामक मंडळाच्या म्हणण्यानुसार या दोन्ही कंपन्या प्रदूषित वायू सोडत आहे. यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणावर वायू प्रदूषण होत असून त्याच्या उग्र वासामुळे रहिवाशांना श्वासोच्छवासास प्रचंड त्रास जाणवण्याची शक्यता आहे. या कंपन्यांसमोरच जिल्हाधिकारी कार्यालय असल्यामुळे त्यांनी या त्रासाचा अनुभव घेतल्यानंतर प्रदूषण मंडळाकडे तक्रार केली होती. तिच्या अनुषंगाने मंडळाने प्रत्यक्षात पाहणी केली. डिलक्स या कंपनीतून प्रमाणाबाहेर प्रदूषित वायू हवेत सोडला जात असल्याचे तर सेफेक्स कंपनीने हवेतील प्रदूषण नियंत्रित करणारी आवश्यक यंत्रणा बसविलेली नसल्याचे मंडळास आढळून आले. त्यानंतर मंडळाने या दोन्ही कंपन्यांना कारणे दाखवा नोटीस बजावून त्याचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना सादर केला. प्रांताधिकाऱ्यांनी फौजदारी दंड संहिता १९७३ कलम ११३ नुसार दोन्ही कंपन्यांना नोटीस बजावून त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. या सुनावणीत कंपन्यांनी त्यांना घालून दिलेल्या अटी शर्तींचे पालन केलेले नाही तसेच कंपन्याद्वारा होणाऱ््या प्रदूषणामुळे परिसरात राहणाऱ्यांच्या जीवितास व आरोग्यास उपद्रव होण्याची शक्यता असल्याचे प्रांताधिकाऱ्यांनी नमूद करुन या कंपन्या तात्काळ बंद करण्याचे आदेश काल दिले. या कंपन्यांप्रमाणे अशा बऱ्याच प्रदूषणकारी कंपन्या या परिसरात आहेत. त्यामुळे पर्यावरणाची हानी होण्याची शक्यता आहे.