शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

पालघरची आरोग्य यंत्रणा झाली सतर्क

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2021 01:46 IST

जिल्ह्यातील नवजात शिशू विभागाचे फायर ऑडिट पूर्ण : वीज व्यवस्थेची होणार तपासणी

हितेन नाईकपालघर : भंडारा येथील १० नवजात शिशूंच्या दुर्दैवी मृत्यूनंतर राज्यातील आरोग्य यंत्रणा सतर्क झाली असून जिल्ह्यातील ३ उपजिल्हा रुग्णालयांची तपासणी तातडीने करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. दरम्यान, या तीनही रुग्णालयांतील प्रसूती आणि नवजात शिशु विभागातील फायर ऑडिट झाले असले तरी इलेक्ट्रिक व्यवस्थेबाबतची तपासणी करण्यात येणार आहे. 

भंडारा येथील अत्यंत भयंकर आणि हृदय हेलावून टाकणाऱ्या घटनेनंतर संपूर्ण राज्यात या व्यवस्थेच्या तपासणीचे ‘मॉक ड्रिल’ घेण्याबाबत आरोग्य विभागाकडून सर्व जिल्हा शल्यचिकित्सकांना सक्त सूचना देण्यात आल्या आहेत. पालघर जिल्ह्यात जव्हार, डहाणू आणि कासा अशी तीन उपजिल्हा रुग्णालये असून जव्हार येथे नवजात शिशु विभाग (चाईल्ड केअर सेंटर) कार्यरत आहे. अत्यंत तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली प्रसूती आणि नवजात शिशू विभाग कार्यरत असून या तिन्ही उपजिल्हा रुग्णालयाचे फायर ऑडिट झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल थोरात यांनी दै. ‘लोकमत’ला दिली.

जिल्ह्यातील या रुग्णालयांमध्ये अग्निरोधक व्यवस्थेसाठी फायर एक्स्टिंगशन व्यवस्थाही ठेवण्यात आलेली आहे. भंडारा येथील घटनेच्या पार्श्वभूमीवर शनिवारी राज्याच्या आरोग्य विभागाचे आयुक्त रामास्वामी यांनी राज्यातील सर्व जिल्हा शल्यचिकित्सकांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधून मार्गदर्शनपर सूचना दिल्या आहेत. भंडारा येथील दुर्दैवी घटनेनंतर राज्यातील सर्व जिल्हा रुग्णालय,उपजिल्हा रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र आदी विभागाचे फायर ऑडिट, इलेक्ट्रिक व्यवस्था याबाबत तपासणी करण्याच्या सूचना वरिष्ठ पातळीवरून देण्यात आल्या आहेत. इलेक्ट्रिक वायरिंगपासून सर्व बाबींची तपासणी करून पुन्हा अशी दुर्दैवी घटना घडणार नाही, याची दक्षता घेण्यासाठीचे ‘मॉक ड्रिल’ घेण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. 

टॅग्स :Vasai Virarवसई विरार