शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

पालघरच्या प्रारूप मतदारयाद्यांमध्ये घोळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2019 22:41 IST

उच्च न्यायालयात याचिका : नगर परिषदेच्या निवडणुकीची पार्श्वभूमी

- हितेन नाईक

पालघर : पालघर नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी जाहीर झालेल्या प्रारूप मतदार यादीत असलेल्या त्रुटी, प्रभाग निहाय मतदारांची सदोष असलेली संख्या आदी बाबत राज्य निवडणूक आयोगा कडे तक्र ार करूनही त्याची दखल घेतली जात नसल्याने नगरपरिषदेचे शिवसेनेचे नगरसेवक कैलास म्हात्रे यांनी उच्च न्यायालयात धाव घेत याचिका दाखल केली आहे.

पालघर नगर परिषदेच्या अनेक विद्यमान नगरसेवकासह माजी नगरसेवक भावानंद संखे याचे नावच मतदार यादीतून गायब करण्याचा प्रकार एका अज्ञात व्यक्तीने केल्याचे समोर आले होते. या बाबत सायबर क्र ाईम अन्वये गुन्हा दाखल करण्याची लेखी मागणी नगराध्यक्ष उत्तम पिंपळे, नगरसेवक कैलास म्हात्रे यांनी जिल्हाधिकारी, राज्य निवडणूक विभागा कडे केली होती. मात्र त्यांच्या मागणीची दखल घेण्याचे स्वारस्य ना तहसीलदार कार्यालय, निवडणूक विभाग आणि जिल्हाधिकाऱ्यांनाही नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात होते. पालघर नगरपरिषदेची निवडणूक प्रारूप मतदार यादी १४ फेब्रुवारी प्रसिद्ध करणे बंधनकारक असताना ती यादी उशिराने प्रसिद्ध करण्यात आली होती. मात्र, ही यादी राजकीय पक्ष व मतदारांना दोन दिवसानंतर देण्यात आल्याची तक्र ार नगराध्यक्ष उत्तम पिंपळे यांनी जिल्हा निवडणूक अधिकाऱ्या कडे केली होती.

प्रारूप मतदार यादीत अनेक घोळ असून काही प्रभागात १ हजार ४०० मतदार तर अन्य प्रभागात ४ हजारापेक्षा जास्त मतदारांची संख्या असल्याचे दिसून आले आहे. तर प्रभागाची अदलाबदल ही करण्यात आली असून मतदारांना या याद्याची पाहणी करून आक्षेप नोंदविण्यासाठी वेळ वाढवून देण्याची जिल्हाधिकाºया कडे केलेल्या मागणीचाही विचार केला नव्हता.

नगर परिषदेच्या प्रारूप याद्या बनविताना काही लोकांच्या फायद्यासाठी प्रारूप मतदार यादी बनविण्यात आल्याचा आरोप ही नगराध्यक्षानी तक्र ारीत केला होता. त्यामुळे मतदार यादीतील त्रुटी बाबत हरकत घेण्यासाठी १८ फेब्रुवारी पर्यंत दिलेली मुदत पुरेशी नसल्याची मागणीही पिंपळे यांनी करून अनेक चुका, त्रुट्या असलेली यादी प्रसिद्ध करणाºया अधिकाºयावर कारवाईची मागणी ही त्यांनी केली होती. कारण यात अनेक त्रुटी असलेल्या मतदार यादीचा वापर निवडणुकीत झाल्यास त्याचा परिणाम निवडणुकीच्या निकालावर लागून आपल्या जिंकण्यासाठी काही लोकांना हाताशी धरून आपला स्वार्थ साधणाºया लोकांना याचा फायदा होण्याची भीती व्यक्त केली जात होती. या प्रारूप मतदार यादी बाबत अनेक तक्रारी करूनही जिल्हा निवडणूक विभाग दुर्लक्ष करीत असल्याने नगरसेवक कैलास म्हात्रे यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती.बोगसपणाबद्दल नगराध्यक्षांचेच आरोपमासवण आणि सागावे या भागातील अनेक लोकांची नावे पालघरच्या मतदार यादीत बोगसपणे घुसविण्यात आल्याचा दावा नगराध्यक्ष उत्तम पिंपळे यांनी केला असून याची तसूभरही कल्पना ग्रामीण भागातील लोकांना नाही. या गंभीर बाबी घडवून आणण्यात पालघर पूर्वे कडील वेवूर भागातील काही व्यक्ती या बोगस याद्या बनविण्या मागे आहेत.असा संशय त्यांनी व्यक्त केला आहे. नगरपरिषदेच्या बाहेरच्या अनेक लोकांची नावे प्रारूप यादीत बोगसपणे नोंद करणे,विद्यमान नगरसेवकांची नावे गायब करण्याचा प्रयत्न करणे ह्या गंभीर बाबी विरोधात सायबर गुन्हा दाखल करावे ह्या मागणी कडेही जिल्हाधिकार्या कडून गंभीर पणे घेतले जात नसल्याची बाब ही समोर आली आहे. 

बोगस नावे घुसवून कपटाने जिंकून सत्ता मिळविण्याचा प्रयत्न करीत लोकशाहीचा गळा घोटणार्या लोकांची, अधिकार्यांची बिंग बाहेर पडण्यासाठी सायबर गुन्हा दाखल करण्यात यावा.- उत्तम पिंपळे, नगराध्यक्ष, पालघर नगरपरिषद