शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

पालघरची अ‍ॅकॅडमी मोदींनी गुजरातला पळविली

By admin | Updated: February 9, 2016 02:20 IST

सफाळे जवळील खार्डी येथील उभारण्यात येणाऱ्या कोस्टल पोलीस अ‍ॅकॅडमीसाठी आघाडी सरकारने केंद्र सरकारला विनामोबदला जमीन दिली. या अ‍ॅकॅडमीच्या स्थापनेमुळे परिसरात

पालघर : सफाळे जवळील खार्डी येथील उभारण्यात येणाऱ्या कोस्टल पोलीस अ‍ॅकॅडमीसाठी आघाडी सरकारने केंद्र सरकारला विनामोबदला जमीन दिली. या अ‍ॅकॅडमीच्या स्थापनेमुळे परिसरात विकासाचे जाळे निर्माण होणार असतांना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ही अ‍ॅकॅडमी आपल्या गुजरात राज्यात पळविली. यावेळीही आपले मुख्यमंत्री मात्र बघ्याची भूमिका घेत बसले, असा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पालघर येथील पत्रकार परिषदेत केला.पालघर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसचे उमेदवार राजेंद्र गावित यांच्या प्रचार सभेसाठी आज माजी मुख्यमंत्री चव्हाण पालघर येथे आले होते. त्यावेळी केंद्रीय निरीक्षक बालाबच्चन, आ. भाई जगताप, राजेंद्र गावित, केदार काळे, जिल्हाध्यक्ष मनिष गणोरे, राष्ट्रवादीचे अनील गावड, इ. मान्यवर उपस्थित होते.पालघर जिल्हा निर्मिती ही खर्चीक बाब असताना व मोठा विरोध असताना माझे सहकारी माजी राज्यमंत्री राजेंद्र गावितांनी आदिवासी बहुल जिल्ह्याचा विकास होईल व अनेक विकासाच्या संधी निर्माण होतील हे मला त्यांनी पटवून दिले. त्यामुळे पालघर जिल्हा निर्मिती हा माझ्या कारकिर्दीतला एक महत्वाचा निर्णय असल्याचे चव्हाण यांनी सांगितले. आघाडी सरकारच्या दरम्यान राज्यात भीषण दुष्काळ पडला असताना १० लाख जनावरांसाठी चारा छावण्यांची उभारणी करून, पाण्याचे नियोजन केले. परंतु आताचे सरकार गंभीर नसल्याचेही त्यांनी सांगितले. सरकार खंबीर नाही हे अधिकारी आमचे ऐकत नाहीत या मुख्यमंत्र्यांच्या विधानावरून दिसून येत असून त्यांचा सहकारी पक्ष शिवसेना सत्तेत किती दिवस राहील याबाबतही चव्हाणांनी संशय व्यक्त केला.

पालघर जिल्ह्यातील आदिवासी बहुल ग्रामीण भागातील कुपोषणाचे प्रमाण कमी करण्याच्या दृष्टीने आघाडी सरकारने राजमाता जिजाऊ योजना, ग्रामबाल विकास केंद्रे इ. सुरू केली. मात्र आताच्या सरकारने त्या योजना बंद केल्या आहेत. आघाडी सरकारने नरेगा सारखी गरीबांच्या फायद्याची योजना सुरू केली. मात्र आल्या आल्या मोदींच्या सरकारने या योजनेवर टीका केली. परंतु कालांतराने ही योजना महत्वपूर्ण असल्याचे दिसून आल्यानंतर आता ती चालू ठेवणे आवश्यक असल्याचा साक्षात्कार सरकारला झाल्याचेही चव्हाणांनी यावेळी सांगितले. यावेळी पालघर जिल्ह्याच्या विकासासाठी नेहमीच प्रयत्नशील राहणाऱ्या गावितांना पुन्हा निवडून आणण्याची संधी मतदारांना मिळालेली असून या संधीचे सोने करावे, असेही शेवटी त्यांनी सांगितले.