शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

पालघर एसटी डेपोला २१० कोटींचा तोटा

By admin | Updated: December 7, 2015 00:52 IST

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळच्या पालघर आगारातंर्गत चालणाऱ्या एसटी सेवेचा आर्थिक कणाच खाजगी रिक्षा, काळी पिवळी सेवेने मोडला असून या आगाराकडून होणाऱ्या दररोजच्या ६८० फेऱ्यांतून दोन

हितेन नाईक,  पालघरमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळच्या पालघर आगारातंर्गत चालणाऱ्या एसटी सेवेचा आर्थिक कणाच खाजगी रिक्षा, काळी पिवळी सेवेने मोडला असून या आगाराकडून होणाऱ्या दररोजच्या ६८० फेऱ्यांतून दोन लाखांचा तोटा सहन करावा लागत आहे. त्यामुळे त्यांचा आर्थिक डोलारा उळमळू लागला असून जुनाट, नादुरुस्त बसेसमधून प्रवाशाना असुरक्षितपणे प्रवास करावा लागत ो आहे. तसेच अन्य सुविधाही मिळत नाहीत, परिणामी प्रवाशीही हळूहळू खाजगी सेवेकडे वळू लागला आहे.स्वातंत्र्य प्राप्तीनंतर १ आॅगस्ट १९४८ ला राज्यात महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी सेवेला राज्यात सुरुवात झाल्यानंतर १ जून १९५२ ला पालघरमध्ये प्रथम आगार सुरू झाले. पालघर - चिंचणी, पालघर - वाडा, पालघर - मनोर या तीन मार्गावर एसटी सुरु झाल्याने या मार्गावरील खाजगी सेवेच्या गाड्या बंद पडल्या. प्रवाशानीही एसटी सेवेला भरभरुन प्रतिसाद दिल्याने पश्चिम रेल्वेनेही पालघर रेल्वे स्टेशन समोरील जागा स्थानकासाठी दिली. मात्र गेल्या काही वर्षांपासून काळी-पिवळी व सहा आसनी रिक्षांचे आक्रमण एसटीच्या जीवावर उठले आहेत.एसटी सेवा पुरविताना ६० टक्के पेक्षा कमी भारमान (उत्पन्न) असेल तर ती फेरी बंद केली जाते. परंतु ग्रामीण भागातील प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून ‘‘प्रवाशांच्या सेवेसाठी या आमच्या बी्रदवाक्याची जपवणूक करण्याचा प्रयत्न आम्ही करीत आहोत.- व्ही. एस. भंडारे, पालघर आगार व्यवस्थापक