शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

हुतात्मा वंदनेसाठी आज पालघर उत्स्फूर्त बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2018 02:47 IST

इंग्रजांविरोधातील चलेजाव चळवळीत सहभागी झालेल्या व हौतात्म्य प्राप्त झालेल्या तालुक्यातील ५ हुतात्म्यांना मंगळवारी (१४ आॅगस्ट) श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी तालुक्यातून मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित राहणार आहेत.

- हितेंन नाईकपालघर : इंग्रजांविरोधातील चलेजाव चळवळीत सहभागी झालेल्या व हौतात्म्य प्राप्त झालेल्या तालुक्यातील ५ हुतात्म्यांना मंगळवारी (१४ आॅगस्ट) श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी तालुक्यातून मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित राहणार असून संपूर्ण पालघर शहरातील व्यवहार उत्स्फूर्तपणे बंद ठेवले जाणार आहेत.७ आॅगस्ट १९४२ रोजी मुंबईत भरलेल्या काँग्रेसच्या महाअधिवेशनात इंग्रजांविरोधातील चलेजाव चळवळीला सुरु वात करण्यात आली. देशभरातून ‘करेंगे या मरेंग’ ह्या निर्धाराने जिल्ह्यातील देशबांधव मोठ्या संख्येने तिच्यात सहभागी झाले होते. पालघर मध्येही १४ आॅगस्ट रोजी कचेरीवर मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. त्यात सहभागी होण्यासाठी तालुक्यातील सातपाटी, शिरगाव, धनसार, अल्याळी, खारेकुरण, मुरबे, नवापूर, पामटेम्भी, पोफरण, आलेवाडी, उनभाट, आदी भागातून हजारो देशभक्त सहभागी झाले होते.देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्याच्या उत्स्फूर्त प्रेरणेने भारावलेले हे स्वयंसेवक इंग्रजांनो चालते व्हा, अशा घोषणा देत कचेरीच्या दिशेने हळूहळू कूच करीत होते.मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त असल्याने वातावरण तंग होते. अशावेळी इंग्रजांनी मोर्चा वर लाठीमार करायला सुरुवात केली. त्यामुळे नांदगावच्या सेवादलाचे प्रमुख गोविंद गणेश ठाकूर ह्यांनी वंदे मातरमची घोषणा देत तिरंगा फडकवीत कचेरीवर चाल केली. ह्यावेळी इंग्रज अधिकाऱ्याने जवळून केलेल्या गोळीबारात ह्या १७ वर्षीय देशभक्ताला हौतात्म्य प्राप्त झाले. हया दरम्यान सातपाटीचे काशीनाथभाई पागधरे, पालघरचे राम प्रसाद तेवारी, मुरब्याचे रामचंद्र चुरी, तर सालवडचे सुकुर मोरे ह्यां ५ देशभक्तांनाही हौतात्म्य प्राप्त झाल.ह्या ५ ही हुतात्म्यांना १४ आॅगस्ट १९४४ पासून १४ आॅगस्ट रोजी दुपारी १२ वाजता हुतात्मा स्मारक ते हुतात्मा स्तंभा पर्यंत मूक मिरवणूक काढली जाते. १२ वाजून ३९ मिनिटांनी शालेय विद्यार्थ्यांकडून देशभक्तीपर गीत गाऊन श्रद्धांजली अर्पण करण्यात येते. 

टॅग्स :palgharपालघरnewsबातम्या