शहरं
Join us  
Trending Stories
1
Ganesh Kale: मानेत, छातीत व पोटात घुसल्या गोळ्या, पळण्याआधीच चौघांनी गणेशला संपवले; आरोपींची नावे काय?
2
Phaltan Doctor Death: डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणाचा IPS तेजस्विनी सातपुते करणार तपास, एसआयटी स्थापन
3
Ganesh Kale Pune: आधी चार गोळ्या झाडल्या, नंतर डोक्यात कोयत्याने वार; काळेच्या हत्येचा पोलिसांनी सांगितला थरार
4
Satara: फलटणमध्ये आणखी एका तरुणीने संपवले आयुष्य, आंचलच्या मृत्युसाठी आईवडिलच ठरले कारण
5
अमेरिका 'या' देशावर स्ट्राईक करण्याच्या तयारीत, ट्रम्प यांनी दिला आदेश?; रिपोर्टमधून खुलासा
6
चीनसोबत मिळून रशियानं दिला भारताला दगा?; ताजिकिस्तानात रचलं षडयंत्र, वाचा इनसाईड स्टोरी
7
परदेशातील भारताचा एकमेव सैन्य तळ हटवावा लागला, २ वर्षांनी मोठा खुलासा; किती मोठा झटका?
8
Pune Crime: पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार
9
आजचा मोर्चा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून देणारा; शरद पवारांनी जागवल्या आठवणी
10
IND vs SA: वनडेत द. आफ्रिकेच्या पोरींचा भारतासमोर नाही चालत जोर; पण वर्ल्डकपमध्ये समोर येतात तेव्हा...
11
"बदतमीजों का...!"; राहुल गांधींसंदर्भात आचार्य प्रमोद कृष्णम यांचं वादग्रस्त विधान, RSS संदर्भातही बोलले
12
"मल्लिकार्जून खरगेंनी इतिहासातून धडा घ्यावा", आरएसएसचे दत्तात्रय होसबळे काँग्रेसच्या अध्यक्षांवर भडकले
13
चीनचा एक निर्णय अन् जागतिक बाजारात सोन्याच्या दराचं गणित बदलणार; भारतावर काय परिणाम होणार?
14
निवडणूक आयोगाकडे माझ्या नावाने अर्ज गेला, मोबाईल नंबर...; उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट
15
‘आपण काय मेसेज करत आहात? हे व्हॉट्सअ‍ॅपला ठाऊक...’, इलॉन मस्‍क यांचा गंभीर आरोप, केली मोठी घोषणा
16
"दिल्लीचे नामांतर 'इंद्रप्रस्थ' करा"; केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना भाजप खासदाराचे पत्र, पांडवांचा उल्लेख
17
११ कोटींची लॉटरी जिंकली, पण माणूस कुठे गेला? कोट्याधीश विजेत्याला शोधण्यासाठी कंपनीच घेतेय कष्ट
18
Tulasi Vivah Mangalashtak: तुलसी विवाहात 'ही' मंगलाष्टके आवर्जून म्हणा; मिळेल कन्यादानाचे पुण्य!
19
"वडिलांच्या निधनानंतर ६ महिन्यात संभाजी महाराज लेझीम खेळतील का?", 'छावा'मधल्या 'त्या' दृश्यावर स्पष्टच बोलले दिग्पाल लांजेकर
20
बिहारमध्ये कुणाचं सरकार, भाजपाला किती जागा मिळणार?; समोर आला ताजा सर्व्हे, वाचा

पालघर लोकसभा पोटनिवडणूक : शिवसेनेचा उमेदवार आज शक्तीप्रदर्शनाने भरणार अर्ज?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2018 06:24 IST

शिवसेने कडून श्री निवास वणगांची उमेदवारी जाहीर होण्याची शक्यता पाहता ^काटे की टक्कर देण्यासाठी भाजप ने आज राज्यमंत्री रवींद्र चव्हाणा च्या अध्यक्षते खाली पालघर मध्ये बैठक आयोजित केली.

- हितेन नाईकपालघर - शिवसेने कडून श्री निवास वणगांची उमेदवारी जाहीर होण्याची शक्यता पाहता ^काटे की टक्कर देण्यासाठी भाजप ने आज राज्यमंत्री रवींद्र चव्हाणा च्या अध्यक्षते खाली पालघर मध्ये बैठक आयोजित केली. जिल्ह्यातील बूथ वाइज नियुक्त्या जाहीर करून निवडणुकीस सज्ज राहण्याचे आदेश ह्यावेळी सर्वाना देण्यात आले. तर दुसरी कडे सेनेनेही दोन ठिकाणी बैठका घेत मंगळवारी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी मोठ्या संख्येने पालघर ला जमण्याचे जाहीर केले आहेभाजप ची १२ मंडळे असून आज पालघरच्या विठ्ठल रखुमाई मंदिर सभागृहात झालेल्या बैठकीत सर्वांना जबाबदारीचे वाटप करण्यात आले. राज्यमंत्री चव्हाण, कोकण विभाग संघटक मंत्री सतीश दौंड, जिल्हापरिषद अध्यक्ष विजय खरपडे, आमदार पास्कल धनारे, प्रदेश सदस्य बाबजी काठोळे, डहाणू चे नगराध्यक्ष भरत राजपूत, सभापती अशोक वडे, आदी पदाधिकारी ह्यावेळी उपस्थित होते.जिल्हापरिषद व पंचायत समतिी सदस्यांनाही निवडणुकीची जबाबदारी वाटप करून देण्यात आली. व त्यांनी आपला प्रभाग सोडू नये अश्या सूचनाही देण्यात आली. ज्या गट किंवा प्रभागात भाजप चा सदस्य नाही तेथे त्या भागातील प्रमुख पदाधिकार्यावर जबाबदारी सोपविण्यात आली.दिवंगत खासदार चिंतामण वनगाच्या अकाली मृत्यू नंतर त्यांचा मुलगा श्रीनिवास ह्यानाचा भाजप कडून तिकीट देण्याचे पक्के ठरले असताना त्यांनी शिवसेनेत जाण्याची घाई केली असे चव्हाणांनी सांगितले.भाजप पक्षाला नुकसान होईल असे कुठलेही पाऊल वनगा कुटुंबीय उचलणार नाहीत असा ठाम विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला होता.मात्र माझे सर्व निर्णय आता उद्धव ठाकरेंच्या हाती आहेत असे श्रीनिवास वनगा नी जाहीर केले होते. उद्या (मंगळ वारी) सकाळी ११ वाजता श्रीनिवास वनगा ह्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी व सेनेची ताकद दाखिवण्यासाठी गाव-पाड्यातून कार्यकर्ते आणण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्या पाशर््वभूमीवर सेना पदाधिकाऱ्यांच्या पालघर आणि बोईसर येथे दुपारी बैठका पार पडल्या.३मे ते १० मे पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा कालावधी असून ११ मे ला छाननी, १४ मे ला उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत निवडणूक विभागाने जाहीर केली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यास २ दिवस शिल्लक राहिले असून २३ लोकांनी एकूण ४४ उमेदवारी अर्ज घेतले आहेत. मात्र एकही पक्षाने उमेदवारी अर्ज दाखल केला नसल्याचे निवडणूक निर्णय अधिकार्यांनी सांगितले. आज शिवसेनेच्या वतीने श्रीनिवास वनगांच्या उमेदवारीची घोषणा होईल, अशी अपेक्षा होती. परंतु सेनेने वेट अ‍ॅण्ड वॉच पवित्रा दिवसभर घेतल्याने व आपला उमेदवार मंगळवारी अर्ज भरणार आहे. त्यासाठी सर्व ताकदीनिशी पालघरला या एवढाच फतवा जारी केल्याने इतर पक्षांनीही उमेदवारांची घोषणा केली नाही.सर्वच पक्षांचे पहले आप, पहले आपकाँग्रेस चे माजी राज्यमंत्री राजेंद्र गवितांनी भाजप मध्ये प्रवेश केला असून पोट निवडणुकीत ते भाजप कडून निवडणूक लढविणार अश्या बातम्या सोशल मीडियावर झळकत आहेत.मात्र ह्या वावड्या असून गावित हे काँग्रेस अध्यक्ष अशोक चव्हाण सोबत टिळक भवनात उपस्थित आहेत.त्यामुळे अश्या अफवांवर कुणी विश्वास ठेवू नये असे जिल्हाध्यक्ष केदार काळे ह्यांनी जाहीर केले आहे.लोकमतशी बोलतांना काँग्रेस जिल्हाध्यक्ष केंदार काळे म्हणाले की, काँग्रेसच्या उमेदवाराच्या नावाची घोषणा ही हायकमांड करते ती महाराष्टÑाचे पक्षप्रभारी अशोक गेहलोत आणि प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण हे करतील किंवा त्यांच्या स्वाक्षरीने तसे पत्रक निघेल, त्यामुळे आम्ही कोणतीही घाई करणार नाही तर भाजपाच्या सर्वच नेत्यांचे फोन नॉट रिचेबल होते.

टॅग्स :Electionनिवडणूकpalgharपालघरlok sabhaलोकसभा