शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

पालघर पत्रकारांवरील गुन्ह्याबाबत सोमवारी बैठक; गृहराज्यमंत्री दीपक केसरकर, पोलीस अधिकारी यांची उपस्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2018 00:02 IST

पालघर पोलीस स्टेशन मध्ये वृत्तांकन करण्यासाठी गेलेल्या दोन पत्रकारांवर खोटे गुन्हे दाखल केल्या चे प्रकरण विधान परिषदेत गाजले. सभापती रामराजे निंबाळकर यांनी याबाबत सोमवारी नागपूर येथे बैठक बोलाविली असून गृहराज्यमंत्री दीपक केसरकर आणि ज्येष्ठ पोलीस अधिकारी व पालघरमधील ज्येष्ठ पत्रकार यांना या बैठकीचे निमंत्रण दिले आहे.

पालघर : पालघर पोलीस स्टेशन मध्ये वृत्तांकन करण्यासाठी गेलेल्या दोन पत्रकारांवर खोटे गुन्हे दाखल केल्या चे प्रकरण विधान परिषदेत गाजले. सभापती रामराजे निंबाळकर यांनी याबाबत सोमवारी नागपूर येथे बैठक बोलाविली असून गृहराज्यमंत्री दीपक केसरकर आणि ज्येष्ठ पोलीस अधिकारी व पालघरमधील ज्येष्ठ पत्रकार यांना या बैठकीचे निमंत्रण दिले आहे.शुक्रवारी पालघर जिल्हा पत्रकार समन्वयक समितीच्यावतीने पालघर पोलीस स्टेशन समोर एकजुटीचे दर्शन घडवून आम्ही वृत्तांकन करण्यासाठी आलोय आम्हाला अटक करा अशा घोषणा देत आंदोलन केले.जिल्ह्यातील जेष्ठ पत्रकार राम परमार आणि हुसेन खान हे दोन पत्रकार २१ जून रोजी वाघोबा खिंडीत झालेल्या दरोड्या प्रकरणात पोलिसांनी महत्प्रयासाने अटक केलेल्या आरोपीचे छायाचित्रण करून पोलिसांच्या धाडसाचे वृत्त प्रकाशित करण्यासाठी गेले असताना वादग्रस्त कामिगरी साठी प्रसिद्धी पावलेल्या तौफिक सय्यद ह्या उपनिरीक्षकाने पत्रकारांशी हुज्जत घातली. तर ह्या प्रकरणाची कुठलीही सखोल चौकशी न करता पोनि.किरण कबाडी ह्यांनी पोलीस अधीक्षकांच्या आदेशानुसार या दोन्ही पत्रकारावर गुन्हे दाखल केले होते. या प्रकरणात पोलीस स्टेशन परिसरात लावण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील रेकॉर्डिंग सर्वांसमोर सादर करावे, असे आव्हानच पत्रकार संघटनांनी पोलिसांना दिले होते.मात्र ह्या सीसीटीव्ही च्या रेकॉर्डिंगची हार्ड डिस्क खराब झाल्याचे पोलीस अधीक्षक मंजुनाथ सिंगे ह्यांनी पत्रकारांना सांगितले होते. तर आज(शुक्र वारी) समन्वय समितीच्या सोबत झालेल्या बैठकीत पो नि. कबाडी ह्यांनी मात्र आॅगस्ट २०१७ पासूनच पालघर पोलीस स्टेशनचे सीसीटीव्ही बंद असल्याची माहिती पोलीस अधिक्षकांसमोर दिली. सीसीटीव्ही संदर्भातील लपवाछपवी उघड झाल्यामुळे पत्रकार हुसेन यांच्यावर त्यांनी तौफिक सय्यद ह्या पोलीस अधिकाºयांची कॉलर पकडल्याचा आरोप ठेवून गुन्हा दाखल केला. यामुळे संशयाचे ढग निर्माण झाले आहेत. पत्रकार हुसेन ह्यांनी सय्यद ह्यांची कॉलर पकडल्याचे सीसीटीव्हीत आढळून आल्या नंतरच आम्ही गुन्हा दाखल केल्याचा सुरुवातीचा पालघर पोलिसांचा दावा ह्यामुळे फोल ठरणार आहे.जिल्ह्यातील पालघर जिल्हा पत्रकार संघ,दि प्रेस क्लब आॅफ वसई विरार, मराठी पत्रकार परिषद (पालघर जिल्हा),वसई-विरार महानगर पत्रकार संघ, क्राईम रिपोर्टर वेल्फेअर असोसिएशनच्या पत्रकारांची जिल्हा पत्रकार समन्वय समिती स्थापन करण्यात आल्या नंतर शुक्रवारी सकाळी ११ वाजता पालघर च्या हुतात्मा स्तंभा जवळ पत्रकारांनी आंदोलनाला सुरुवात केली.वृत्तांकन करण्यासाठी गेलेल्या दोन्ही पत्रकारांना शासकीय कामात अडथळा आणल्याचा बनाव करून अटक करण्यात आली, तर मग आम्हालाही अटक करा, अशा घोषणा देत शेकडो पत्रकारांनी पालघर पोलीस स्टेशनचा परिसर दणाणून सोडला. यावेळी कबाडी, सय्यद ह्यांच्या सह अन्य दोन पोलिसांना निलंबित करावे, जिल्हा पोलिस अधीक्षक सिंगे ह्यांची तात्काळ बदली करावी, कलम ३५३ ची नवीन तरतूद रद्द करावी, या दोन पत्रकारांवरील खोटे गुन्हे मागे घ्यावेत अशा मागण्या ह्यावेळी करण्यात आल्या.श्रमजीवी संघटनेचे अध्यक्ष विवेक पंडित, भाजप चे उपाध्यक्ष प्रशांत पाटील,बार असोसिएशन वसई,कष्टकरी संघटना,आदिवासी दलित सेना आदींनी उपस्थित राहून ह्या आंदोलनाला पाठिंबा दर्शविला.कलम ३५३ मधील नवीन तरतुदी प्रमाणे सर्वसामान्य लोक तलाठी,ग्रामसेवक,सरकारी दवाखाने तसेच विविध विभागात आपल्या प्रलंबित असलेल्या कामाबाबत आग्रही भूमिका स्वीकारून त्यांच्या विरोधात भूमिका घेतल्यास शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल केला जाणार आहे. ह्या गुन्ह्यात लगेच जमीन मिळत नसल्याने सर्वसामान्यांनाही आता तुरु ंगात बसावे लागणार आहे.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार