शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

पालघर : ग्रा.पं. निवडणूकीत शिवसेनेची सरशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2018 02:08 IST

तालुक्यातील माहीम, सरावली ग्रामपंचायतीवर सेनेने भगवा फडकावला असून या, खैरेपाडा ग्रामपंचायतीत ग्रामविकास आघाडीने बाजी मारली आहे.

पालघर : तालुक्यातील माहीम, सरावली ग्रामपंचायतीवर सेनेने भगवा फडकावला असून या, खैरेपाडा ग्रामपंचायतीत ग्रामविकास आघाडीने बाजी मारली आहे. तर बिनविरोध निवडून आलेल्या शिलटे ग्रामपंचायतीत सरपंचासह बहुजन विकास आघाडीचे सर्व उमेदवार निवडून आहेत.माहीम ग्रामपंचायतीवर मागील अनेक वर्षांपासून सेनेच्या असलेल्या सत्तेला राखीव भूखंडाची विक्री, जल प्रदूषण, बेकायदेशीर अतिक्र मणांकडे केलेली डोळेझाक आदी कारणांमुळे मतदारांनी सुरुंग लावून इतर पक्षांनी बनविलेल्या परिवर्तन पॅनलला मोठ्या मताधिक्याने निवडून दिले होते. मात्र जल प्रदूषणाची वाढती व्याप्ती, अतिक्रमणांवरचा अंकुश नसणे, कारखानदारांकडून होणारी करवसुली आदी प्रकरणात परिवर्तन पॅनलकडून कोणतेही सकारात्मक बदल झाल्याचे मतदारांना आढळून आले नाहीत.परिणामी नवनिर्वाचित शिवसेना जिल्हा प्रमुख राजेश शहा, माजी सरपंच विकास मोरे आदींच्या विकासाच्या प्रचारावर वडराई वगळता माहीम, रेवाळे, हरणवाडी आदी प्रभागातील मतदारांनी पुन्हा आपला विश्वास व्यक्त करून पंचायत समितीचे माजी सभापती दीपक करबट यांना मतदारांनी निवडून दिले. माहीम ग्रामपंचायतीतील १२ जागांपैकी १२ सदस्यपदाच्या जागा जिंकून सेनेने आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे.तर परिवर्तन पॅनलला ५ जागांवर समाधान मानावे लागले आहे. सरावली ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी शिवसेनेच्या महिला उमेदवार लक्ष्मी चांदणे यांच्यासह १२ सदस्य निवडून आले येथेही सेनेने भगवा फडकविला तर ग्रामविकास आघाडीला ३ तर शिवसाई पॅनलला २ जागा मिळाल्याखैरेपाडा ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी शिवसेना-भूमिसेना-शिवशक्ती पुरस्कृत ग्रामविकास आघाडीच्या महिला उमेदवार भावना धोडी या सरपंचपदासाठी निवडून आल्या असून १७ पैकी १५ जागांवर वर्चस्व प्रस्थापित केले आहे तर भाजपाला १ जागेवर समाधान मानावे लागले बजरंग दलाने मात्र १ जागा जिकून तालुक्यातील राजकीय क्षेत्रात शिरकाव केला आहे.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतShiv Senaशिवसेना