शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
2
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
3
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
4
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
5
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
6
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
7
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
8
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
9
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
10
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
11
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
12
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
13
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
14
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
15
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
16
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
17
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
18
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
19
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
20
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी

पालघर आगाराला बाप्पा पावला :  ४३ लाख उत्पन्न, २४५ विशेष बसेस सोडण्याचा प्रयत्न यशस्वी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2017 05:42 IST

यंदा कोकणात गौरी-गणपतीच्या सणासाठी जाणाºया चाकरमान्यांसाठी २४५ विशेष बसेस सोडण्याच्या उपक्रमातून राज्य परिवहन महामंडळाच्या पालघर विभागाला ४३ लाख ५१ हजार ५७६ रु पयांचे जादा उत्पन्न मिळाले.

- हितेंन नाईक पालघर : यंदा कोकणात गौरी-गणपतीच्या सणासाठी जाणाºया चाकरमान्यांसाठी २४५ विशेष बसेस सोडण्याच्या उपक्रमातून राज्य परिवहन महामंडळाच्या पालघर विभागाला ४३ लाख ५१ हजार ५७६ रु पयांचे जादा उत्पन्न मिळाले. विशेष म्हणजे कुठलाही अपघात व प्रवाशांची गैरसोय न होता हा उपक्रम निर्विघ्नपणे पार पाडण्यात एसटी विभाग यशस्वी झाला.पालघर विभागाने जिल्ह्यातून कोकणात जाणा-या चाकरमान्यांच्या सोयीसाठी एसटीची चोख व्यवस्था केली होती. सर्वसामान्यांची जीवन वाहिनी म्हणून ओळखल्या जाणाºया एसटीने आपली ओळख व प्रवाश्याशी असलेले नाते अधिक दृढ करतांना या नियोजनाला कुठेही गालबोट लागणार नाही याची अधिक दक्षता घेतली. या विभागाचे प्रमुख अजित गायकवाड व त्यांच्या सहका-यांनी अगदी नियोजनबद्ध पद्धतीने आणि उत्साहवर्धक वातावरणात पालघर, डहाणू, वसई, जव्हार डेपोतून सोडलेल्या २४५ बसेस द्वारे १ लाख ४३ हजार १६९ किलोमीटरचा प्रवास सुखरुप पार पाडण्याची विशेष दक्षता घेतली. व ‘बहुजन हिताय बहुजन सुखाय’ हे ध्येयवाक्य कृतीत उतरविले.अशी बजावली आगारनिहाय कामगिरींचाकरमान्यांनी केलेल्या मागणी नुसार २१ आॅगस्ट पासूनच अर्नाळा आजारातून पहिली एसटी कोकणा कडे रवाना करून या उपक्रमाचा प्रारंभ झाला. पालघर आगारातून २३ एसटींनी १६ हजार ४६ किमीचा प्रवास करून ४ लाख ६० हजार ४३७ रु पये, सफाळे आगारातून ६ बसेस द्वारे ४ हजार ६३१ किमी प्रवासातून १ लाख ५ हजार ५६९ रु पये, वसई आगारातून ३९ बसेस द्वारे २७ हजार २३३ किमी प्रवासातून ७ लाख ८३ हजार ३ रुपये,अर्नाळा आगारातून ८८ बसेस द्वारे ३५ हजार १४९ किमी प्रवासातून सर्वाधिक ८ लाख ७८ हजार ६७८ रुपये, नालासोपारा आगारातून २७ बसेस द्वारे १४ हजार ४१८ किमी प्रवासातून ४ लाख ८२ हजार ९२३ रु पये,डहाणू आगारातून १४ बसेस द्वारे १३ हजार ४२ किमी च्या प्रवासातून 2 लाख ९९ हजार ७८१ रु पये,जव्हार आगारातून २२ बसेस च्या फेºया द्वारे १६ हजार ३७२ किमी प्रवासातून ६ लाख ३० हजार ७०१ रुपये तर बोईसर आगारातून २६ बसेस फेºया द्वारे १६ हजार २७९ किमी प्रवासातून ६ लाख १० हजार ४८४ रु पये अश्या एकूण २४५ बस फेºया द्वारे १ लाख ४३ हजार १६९ किलोमीटरचा प्रवास निर्विघनपणे पार पाडीत राज्य परिवहन महामंडळाच्या पालघर विभागाने एकूण ४३ लाख ५१ हजार ५७६ हजाराचे उत्पन्नाचे उिद्दष्ट (६४.८९ टक्के भारमान) निर्विघ्नपणे पार केल्याची माहिती सहाय्यक वाहतूक अधीक्षक अंकुश सागर ह्यांनी लोकमत ला दिली.