शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

पालघर जिल्ह्यासाठी १४ नवे डॉक्टर लाभणार

By admin | Updated: February 2, 2017 02:44 IST

जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्यकेंद्रात प्रसूती साठी येणाऱ्या आदिवासी गरीब व दुर्बल महिलांच्या सोनोग्राफीसाठी २७ लाख ४० हजार रु पयांची तरतूद करण्यात आली असून

पालघर : जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्यकेंद्रात प्रसूती साठी येणाऱ्या आदिवासी गरीब व दुर्बल महिलांच्या सोनोग्राफीसाठी २७ लाख ४० हजार रु पयांची तरतूद करण्यात आली असून १४ डॉक्टरांची नियुक्ती प्राथमिक आरोग्य केंद्रात करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अभिजित बांगर ह्यांनी आरोग्य विभागाला दिले आहेत.जिल्ह्यातील आदिवासी बहुल क्षेत्रातील जव्हार, तलासरी, विक्र मगड, मोखाडा, पालघर ह्या तालुक्यात प्रसूती चे प्रमाण मोठे आहे. गरोदर महिलांना किमान एकदातरी सोनोग्राफीची गरज असते. मात्र जिल्ह्यातील अनेक सरकारी रूग्णालयात सोनोग्राफीची व्यवस्था नसल्याने व ती खाजगी केंद्रातून महागडी फी देऊन करून घ्यावी लागते अनेकांना ती करून घेण्यासाठी उसनवारी करून तर वेळ प्रसंगी सावकाराकडुन कर्ज काढण्याची पाळी ओढवते.पालघर जिल्ह्यातील अशा सोनोग्राफी कराव्या लागणाऱा रु ग्णासाठी जिल्ह्याच्या नाविन्यपूर्ण योजनेच्या निधीतून सन २०१६-१७ या वर्षासाठी २७ लाख ४० हजार रु पयांची तरतूद करण्यात आली असून ही योजना १५ फेब्रुवारी पासून जिल्हाभरात कार्यान्वित करण्यात येणार आहे. त्यादृष्टीने प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामीण रु ग्णालयांनी त्यासाठी युद्ध पातळीवर काम करून सोनोग्राफी चा फायदा नागरिक पर्यंत पोहोचिवण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.जिल्ह्यात किमान प्रत्येक ग्रामीण रु ग्णालयात सोनोग्राफीची मशीन उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी करीत असून जिल्ह्यातील महसूल अधिकारी, कर्मचारी तसेच जिल्हा परिषद अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपल्या एक दिवसाच्या पगारातून १० लाखाचा निधी गोळा केला असून त्यातून सोनोग्राफी मशीन खरेदी करून आदिवासी भागात देण्यात येणार असल्याचे बांगर यांनी सांगितलेजिल्ह्यात बोईसर येथे एमआयडीसी, औद्योगिक वसाहत असून पालघर येथे सहकारी औद्योगिक वसाहत तसेच पिडको, बिडको, दिवाण उद्योग नगर, या वसाहती आहेत, त्याच प्रमाणे वाडा, तलासरी, वसई, डहाणू येथे देखील औद्योगिक वसाहती आहेत, या वसाहतीतील कारखान्यांनी आपल्या सीएसआर फंडातून जिल्ह्यतील गरीब महिलांसाठी सोनोग्राफी तसेच एक्सरे मशीन उपलब्ध करून दिल्यास रु ग्णांना त्याचा लाभ मिळवून काही खाजगी वैद्यकीय सेवे कडून होणारी लूट देखील थांबण्यास मदत होणार आहे.दुर्बल घटकासाठी सुरु करण्यात येत असलेली ही योजना सतत चालणारी असून एप्रिल महिन्यात पुन्हा मोठी आर्थिक तरतूद करण्यात येणार असल्याची माहितीही जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. सद्यपरिस्थितीत एखाद्या महिलेने खाजगी सोनोग्राफी सेंटर कडून सोनोग्राफी करून घेतल्यास त्याचे पैसे संबंधित शासकीय रु ग्णालयाने त्या महिलांना परत करण्याचे निर्देश सुद्धा जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. यामुळे आता गर्भाची होणारी वाढ, असल्यास त्यातील व्यंग, अपंगता, कुपोषण या बाबी वेळीच कळणे सोनोग्राफीमुळे शक्य होणार आहे तसेच त्यावर आवश्यक ते इलाज ही शक्य होतील. आजवर आदिवासींच्या आवाक्यात नसलेले हे तंत्र त्यांनालाभदायी ठरेल.(प्रतिनिधी)डॉक्टरांच्या मुलाखती १५ दिवसांत पूर्ण उर्वरित डॉक्टरांच्या मुलाखती घेण्याचे काम येत्या १५ दिवसात पूर्ण करण्यात येईल असे सांगून जिल्हाधिकाऱ्यांनी आरोग्य सेवेचा लाभ प्रत्येक नागरिकाला मिळावा ह्यासाठी सर्व कामे तातडीने व युद्ध पातळीवर करण्याचे निर्देश जिल्हा शल्य चिकित्सक व जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना दिले.जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टराच्या रिक्त जागा भरण्याचे कामाची प्रक्रि या सुरु असून काही डॉक्टरांच्या मुलाखती घेण्यात आल्या.