शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! भारतात दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला; गुजरातमधून ३ संशयित दहशतवाद्यांना अटक
2
भारतात राहणारे सर्वच हिंदू; मुस्लीम आणि ख्रिश्चन आपल्याच पूर्वजांचे वंशज, काय म्हणाले सरसंघचालक मोहन भागवत
3
एकनाथ शिंदे अन् उद्धव ठाकरेंना भाजपाचा मोठा धक्का; २ मोठ्या नेत्यांचा लवकरच पक्षप्रवेश होणार
4
सोनं की रिअल इस्टेट? गुंतवणुकीसाठी कोणता पर्याय ठरेल जास्त फायदेशीर? तज्ज्ञांनी दिला महत्त्वाचा सल्ला
5
जेल की रिसॉर्ट? ISIS रिक्रूटर आणि सीरियल किलरकडे मोबाईल; अधिकाऱ्यांच्या मदतीने कैद्यांची मजा
6
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
7
प्रदूषणकारी रसायनांचे उत्पादन करणारा कारखाना रत्नागिरीच्या लोटे वसाहतीत
8
हत्येनंतर शीर अन् धड वेगळे केले, सुटकेसमध्ये मृतदेह लपवून फरार; अखेर १६ वर्षांनी आरोपीला अटक
9
महाराष्ट्राच्या १५ हजार एकर महसूल जमिनीसह सीमेवरील १४ गावांवर तेलंगण राज्याचा ताबा !
10
भारताकडे 'रेअर अर्थ'चा ५वा सर्वात मोठा खजिना; तरीही आयातीसाठी चीनवर का अवलंबून? 'ही' आहे खरी अडचण
11
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
12
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
13
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
14
"मला पुढच्या जन्मी गोविंदा पती म्हणून नकोय...", सुनीता अहुजाचं वक्तव्य चर्चेत, म्हणाली- "हा एकच जन्म..."
15
लोक प्रवाशांच्या जीवावर कोण उठले? सँडहर्स्ट रोड अपघाताची चौकशी जीआरपीकडे
16
ट्रॉलरसह आठ मच्छीमारांचे पाकिस्तानकडून अपहरण?
17
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
18
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
19
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
20
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!

पालघर जिल्ह्याला मुसळधारांनी झोडपले

By admin | Updated: June 26, 2016 01:37 IST

पंधरवड्यापासून हुलकावणी देणाऱ्या पावसाने आज संपूर्ण पालघर जिल्ह्याला मुसळधारांनी झोडपून काढले. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. सर्वाधिक पाऊस पालघर तालुक्यात

- लोकमत चमू, पालघर

पंधरवड्यापासून हुलकावणी देणाऱ्या पावसाने आज संपूर्ण पालघर जिल्ह्याला मुसळधारांनी झोडपून काढले. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. सर्वाधिक पाऊस पालघर तालुक्यात १४२.३ मी.मी. झाला. तर जिल्हयात आजच्या तारखेपर्यंत १४०.९ मि. मी. सरासरी पावसाची नोंद झाली आहे. गतवर्षी याच तारखेपर्यंत सरासरी ५९३.८ मि.मी. इतक्या पावसाची नोंद झाली होती. ७ जूनला आगमन होणाऱ्या पावसाने दडी मारल्याने पेरणीसाठी थांबलेल्या शेतकऱ्यांची मोठी कुचंबणा झाली होती. मात्र पाऊस सुरू झाल्याने बळीराजा पेरणीची कामे हाती घेऊ शकला. संततधार कोसळणाऱ्या पावसाने पेरणीच्या कामात काहीसे अडथळे आणले असून पेरणीची कामे खोळंबल्याचे दिसून येते. जिल्हयात पालघरमध्ये सर्वाधिक पाऊस पडला असून त्याच्या खालोखाल वसई व डहाणू तालुक्यात पावासाची नोंद झाली आहे. या उलट वाडा, जव्हार, विक्रमगड, तलासरी या पाणीटंचाई ग्रस्त व आदिवासी तालुक्यात मात्र पावसाचे प्रमाण कमी आहे.गेल्या तीन दिवसापासून पाऊस पडत असून मनोर परिसरात पेरणीच्या कामाला वेगात सुरूवात केली आहे. पावासामुळे शेतकरी समाधानी झाल्याचे चित्र दिसत आहे. नांगरणी, पेरणी, शेतात पाणी साचविण्यासाठी खंड बांधणे घोंगडी ईरले तयार करणे अशी विविध काम जोमात सुरू केली आहेत. तर रोजगार सुरू झाल्याने शेतमजूरही आता खूष झाले आहेत. विक्रमगडमध्ये दमदार पावसाची सुरुवातगेल्या दोन आठवड्यापासून गायब झालेल्या पावसाने विक्रमगड व परिसरात दोन दिवसांपासून दमदार हजेरी लावली आहे़ त्यामुळे पेरणीच्या कामाला वेग आला आहे. दडी मारलेल्या पावसाची सुरुवात होतांच शेतकऱ्यांची लगबग सुरु झाली. शेती हा येथील मुख्य व्यवसाय असल्याने भात बियाणे, खते घेण्यासाठी विक्रमगड येथील त्याच्या दुकानात खरेदीसाठी गर्दी वाढत आहे़ मात्र यंदाही सर्वच वस्तूंचे भाव वाढल्याने त्याचा परिणाम या वस्तूंचे भाव वाढण्यातही झाला आहे. त्यामुळे भातबियाणे, खते खरेदी करीतांना शेतकरी चिंताक्रांत झाला आहे. मात्र जी वस्तू लागणार आहे ती खरेदी तर करावीच लागते. त्यांच्या खरेदीला मात्र पर्याय नाही, असे काही शेतकरी बोलुन दाखवित होते.जव्हारमध्ये संततधारजव्हार येथे शुक्रवारपासून पावसाने धो-धो बरसण्यास सुरूवात केली आहे. येणार, येणार म्हणून प्रतिक्षेत असलेल्या पावसाने जून अखेरीस आपल्या पदार्पणातच शहरामध्ये सर्वत्र दाणादाण उडविली. संततधार एवढी जोरात होती की, सर्वत्र जलमयता होती. शेतीची कामे सुरू झालेली आहेत. तसेच जव्हार तालुक्यातील धबधबे ही सुरू झालेले आहेत.पालघर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात येथील आदिवासी बांधव भात, नागली, वरई, ज्वारी, बाजरी या मुख्य पिकांची लागवड करतात, आणि त्यांचे जीवनच या पावसाळ्यात लागवड केलेल्या भात आणि नागली पिकांवर अवलंबून आहे, ८० % आदिवासी बांधवांकडे मोजकी जमीन असल्यामुळे पिकलेले पीक ते वर्षभरासाठी आपल्या कुटुंबाकरीता ठेवतात. उर्वरीत २० टक्के आदिवासी बांधवांकडे मुबलक जमीन असल्यामुळे त्यांच्याकडे जास्त पिक निघते, त्यामुळे ते त्याची विक्री एकाधिकार खरेदी योजनेमार्फत किंवा बाजारात विक्री करतात. त्यांची शेती पावसावर अवलंबून असतो, त्यामुळे बळीराजाला आस असते ती पावसाची. बोईसरमध्ये चिखलणीसंपूर्ण तालुक्यात शुक्रवारी सायंकाळपासूनच पावसाने मुसळधार हजेरी लावली असून परवा पर्यंत जे शेतकरी आकाशाकडे टक लावून होते त्यांनी शेतीच्या कामांना सुरुवात केली आहे. नांगरणी अगोदरच झाली होती मात्र जोरदार पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी चिखलणीला सुरुवात केली आहे. तारापूरच्या मुरंबेभागात शेतकऱ्यांनी चिखलणीसाठी बैलाजोडी शेतात उतरविल्याचे चित्र पहायला मिळत होते.सततच्या पावसामुळे मनोरचे जनजीवन विस्कळीतमनोर : सकाळ पासून मुसळधार पडत असलेल्या पावसामुळे मनोर परिसरात जनजीवन विस्कळीत झाले असून मनोर पालघर रस्त्यावर असलेल्या वाघोबा मंदिराच्या शेजारी असलेल्या दुकानावर झाड पडल्याने नुकसान झाले आहे. पावसामुळे शेतकरी मात्र समाधानी आहेत. गेल्या दोन दिवसांपासून सतत पाऊस पडत असल्याने ग्रामीण भागातील नदी, नाले, शेती भरले असून जनजीवन विस्कळीत झाले आहे तर दुकानदारांची माल वाचविण्यासाठी धावपळ उडाली आहे. तसेच रस्त्यावर पाणी सचल्याने पादचाऱ्याना मार्ग काढणे अवघड झाले आहे.निसर्गरम्य जव्हारमध्ये गारवापालघर जिल्ह्यातील सुप्रसिध्द थंड हवेचे ठिकाण म्हणून जव्हारचा खास उल्लेख करण्यात येतो. निसर्गाचे वरदान लाभलेल्या या गावाची अनेक वैशिष्टे आहेत. भूतपूर्व संस्थानाची पार्श्वभूमी या गावाला लाभलेली आहे. इंग्रजांनी त्यांच्या राजवटीत खास विकसीत केलेली थंड हवेची ठिकाणे आहेत, त्यात जव्हारचा समावेश नव्हता. असे असूनही त्याची ख्याती सर्वत्र पसरली आहेत. जव्हार शहर हे समुद्रसपाटी पासून २००० फूट उंचीवर असल्याने येथे किती ही पाऊस पडला तरी त्याचे पाणी वाहून जाते. त्यामुळे येथील रस्ते व परिसर पावसाळ्यात स्वच्छ असतात. पावसाळा सुरू झाल्यामुळे चांगला गारवा निर्माण झाला असून पर्यटकांची गर्दीही वाढत आहे. जव्हार तालुक्याच्या आजूबाजूला दाभोसा धबधबा, काळमांडवीसारखे धबधबे असल्यामुळे येथे दरवर्षी पाऊस सुरू झाल्यावर पर्यटकांची गर्दी होते.पहिल्याच पावसात नालासोपारा जलमयकाल रात्रीपासून कोसळत असलेल्या पावसाने नालासोपारा शहर जलमय केले. रेल्वे उड्डाणपूलाखालून जाणारा आणि सेंट्रल पार्क मुख्य रस्ता पाण्याखाली गेल्याने काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. तर अनेक दुकानांमध्ये पाणी शिरले होते. नवघर एसटी स्टँडमध्ये पाणी साचून राहिल्याने प्रवाशांचे हाल झाले होते. तर पश्चिम पट्टयात काही रस्त्यांवर पाणी तुंबले होते. एकंदरीत पावसाच्या तडाख्याने वसई विरार पालिकेचा नालेसफाईचा दावा फेल गेला.गेल दोन दिवसांपासून हजेरी लावलेल्या पावसाने काल रात्रभर जोरदार तडाखा दिला. नालासोपारा पूर्वेकडील तीनही मुख्य रस्ते पाण्याखाली गेले होते. आचोळे रस्ता, हावे रस्ता आणि सेंट्रल पार्क रस्ता या चारही मुख्य रस्त्यांवर दुपारपर्यंत गुडघाभर पाणी तुंबून राहिले होते. सेंन्ट्रलपार्क, तुळींज, टाकीपाडा रोड, नगिनदासपाडा, संतोषभुवन, बिलालपाडा, मोरेगाव, आचोळे गाव या ठिकाणी रेल्वे स्थानकातून जाण्यासाठी तीन मुख्य रस्ते आहेत. याच रस्त्यांवर गुडघाभर पाणी साचल्याने वाहनधारकांना आणि नागरिकांना जीवघेणी कसरत करीत जावे लागत होते. तुळींज डोंगरावरून येणारे पाणी वाहून जाण्यासाठी मोठे नाले आणि गटारे नसल्याने हे तीनही मुख्य रस्ते दरवर्षी पाण्याखाली जातात. तुळींज पोलिस ठाण्यासमोरील गटारीचा स्लॅब तुटला आहे. त्याठिकाणी पाणी जाण्यासाठी मार्गच शिल्लक राहिला नाही. तुळींज पोलीस ठाण्याची इमारत मुख्य रस्त्यालगत असलेल्या गटारावर बांधलेली आहे. पालिकेने गेल्याच महिन्यात पोलीस ठाण्याला नोटीसही बजावली होती. नेमक्या याच परिसरात आज गुडघाभर पाणी साचल्याने काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. सेंन्ट्रलपार्क रस्त्यावर गुडघाभर पाणी साचून राहिले असून रस्त्यालगत असलेल्या गटाराच्या स्लॅबला तडे गेल्याने पाणी वाहून जाण्याचा मार्ग बंद झाला आहे. त्यामुळे गटाराचे काम निकृष्ट असल्याचे उघड झाले. नवघर एसटी स्टँड पुन्हा पाण्याखाली गेल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत. संध्याकाळर्पंत गुडघाभर पाणी तुंबून राहिले होते. त्यामुळे वाहतूकीवर परिणाम होत होता. वसई पश्चिम पट्ट्यातील अनेक भागात पाणी साचून राहिल्याने लोकांची गैरसोय झाली होती. एकंदरीत पहिल्याच पावसाने वसई विरार पालिकेच्या नालेसफाईच्या कामाचा पुरता फज्जा उडाल्याचे दिसून आले.