शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

पालघर जिल्ह्याला हवी कृषी उत्पन्न बाजार समिती, स्वतंत्र बाजारपेठ नाही  

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2020 01:19 IST

स्वतंत्र पालघर जिल्हा निर्माण झाला त्याला पाच वर्षे उलटून गेली तरी अद्यापही या जिल्ह्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समिती स्थापन झालेली नाही.

विक्रमगड : स्वतंत्र पालघर जिल्हा निर्माण झाला त्याला पाच वर्षे उलटून गेली तरी अद्यापही या जिल्ह्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समिती स्थापन झालेली नाही. जिल्ह्यात शेतकऱ्यांची संख्या मोठी असून त्यांचे उत्पन्नाचे दुसरे कोणतेही साधन नाही. त्यामुळे या परिसरात शेती करणाºया शेतकऱ्यांना शेतात पिकवलेला माल स्वत:च मुंबई, ठाणे, भिवंडी तसेच वापी या शहरांमध्ये जाऊन विकावा लागतो. या शेतकºयांसाठी जिल्ह्यात मध्यवर्ती ठिकाणी कृषी उत्पन्न बाजार समितीची सोय उपलब्ध व्हावी, अशी अपेक्षा स्थानिक शेतकरी व्यक्त करीत आहेत.पालघर जिल्ह्यातील विक्रमगड, मोखाडा, जव्हार, वाडा तसेच इतर तालुक्यांतही मोठ्या प्रमाणात भाजीपाल्याचे उत्पन्न घेतले जात आहे. परंतु आपल्या शेतात पिकवलेला भाजीपाला विक्री करण्यासाठी अशी स्वतंत्र बाजारपेठ उपलब्ध नसल्यामुळे शेतकºयांना आपला माल स्वत:च विकावा लागत आहे. मुंबई, ठाणे, भिवंडी तसेच वापी येथील व्यापाºयांना हा माल द्यावा लागतो. परंतु या व्यापाºयांकडून त्यांना योग्य भाव मिळत नाही.जिल्ह्यातील विक्रमगडसह इतर तालुक्यांमध्ये अनेक खेड्यापाड्यांत सध्या मोठ्या प्रमाणात गवार, चवळी, मुळा, भेंडी, मेथी अशा प्रकारचा भाजीपाला तयार होतो. हा भाजीपाल्यासाठी थेट बाजारपेठ उपलब्ध नाही. या भागातील शेतकºयांच्या शेतात तयार होणारा भाजीपाला दररोज शेतकरी विक्रीसाठी घेऊन जात असतात. त्यामुळे त्यांचा अर्धा-अधिक वेळ हा भाजीपाला विक्रीसाठी बाजारातच जातो. त्यामुळे शेतात काम करण्यासाठी त्यांना पुरेसा वेळही मिळत नाही. या भागातील बहुतांश शेतकरी हे अशिक्षित, आदिवासी आहेत. त्यांना बाजारातील दलाल तसेच व्यापाºयांच्या ठकवणुकीला सामोरे जावे लागते. शेतकरी आपला माल बाजारात घेऊन गेला की, त्याला तो माल परत नेता येत नाही. कोणत्याही परिस्थितीत त्याला बाजारात तो माल खपवावाच लागतो. त्याची ही मजबुरी लक्षात घेऊन व्यापारी आणि दलाल भाव पाडून त्याच्याकडून माल खरेदी करतात. कष्ट करून, घाम गाळून आपल्या शेतात पिकवलेले सोने त्याला अशा रीतीने कवडीमोल भावाने विकावे लागते. मात्र परिस्थितीसमोर गांजलेल्या शेतकºयांना या परिस्थितीला शरण जाण्याशिवाय अन्य पर्याय नसतो.जिल्ह्यात कृषी उत्पन्न बाजार समितीसारखी बाजारपेठ उपलब्ध होत नसल्यामुळे आम्हाला आमचा माल नाइलाजाने व्यापाºयांना द्यावा लागतो. आमच्यासमोर दुसरा कोणताही पर्याय उपलब्ध नाही. यामुळे आमची फारच हैराणी होत आहे. भाव तोडून माल द्यावा लागत असल्याने तो परवडत नाही. यासाठी मध्यवर्ती ठिकाणी बाजारपेठ उपलब्ध होणे गरजेचे आहे. त्यामुळे माल देता येईल व भावही मिळेल.- राजाराम ढोणे, शेतकरी, विक्रमगड

टॅग्स :APMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीpalgharपालघर