शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

डीएडचे परीक्षा केंद्र पालघरला

By admin | Updated: May 28, 2016 02:28 IST

डिएड परिक्षेचे केंद्र वसईतून पालघरला अचानक नेण्यात आल्याने मीरा भार्इंदर आणि वसई-विरार परिसरातील विद्यार्थ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करीत गैरसोयीचे ठिकाण टाळून

वसई : डिएड परिक्षेचे केंद्र वसईतून पालघरला अचानक नेण्यात आल्याने मीरा भार्इंदर आणि वसई-विरार परिसरातील विद्यार्थ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करीत गैरसोयीचे ठिकाण टाळून मुळच्या ठिकाणीच परीक्षा घेण्यात याव्यात अशी मागणी केली आहे. मीरा-भार्इंदर आणि वसई-विरार परिसरातील सुमारे पाचशे विद्यार्थी डिएडची परीक्षा देणार आहेत. गेल अनेक वर्षांपासून ही परीक्षा वसईतील पापडी येथील सेंट एलॉयशियस डिएड कॉलेजमध्ये होत असे. परंतु यावर्षी डिएडच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेचे केंद्र पालघर येथील सोनोपंत दांडेकर कॉलेज येथे ठेवण्यात आले आहे. वसई तालुक्यातील तसेच भार्इंदरच्या विद्यार्थ्यांना पालघर येथे ये-जा करणे त्रासदायक आहे. तेथे जाण्यासाठी रेल्वे गाडया मर्यादीत आहेत. ट्रेनच्या फेऱ्यासुद्धा खूप कमी आहेत. अलिकडे ट्रेन सर्विस बऱ्याच वेळा अनियमीत असते. शिवाय वसई खेडयापाडयातील विद्यार्थींनींना अप डाऊन करणे अत्यंत त्रासाचे आहे. विद्यार्थी परीक्षा केंद्रावर वेळेवर पोहोचावे, त्यांचा ताण कमी व्हावा म्हणून त्यांच्या परीक्षेचे केंद्र वसई येथील सेंट एलॉशियस डि.एड. कॉलेज येथेच ठेवण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)वसई शहर काँग्रेस कमिटी अध्यक्ष वसई शहर काँग्रेस कमिटी अध्यक्ष मायकल फुटर्याडो यांनी शिक्षण संचालक, पुणे यांच्याकडे यासंबंधी तक्रार केली. तसेच दूरध्वनीवरून संपर्क साधून परीक्षा केंद्र बदलाविषयी चौकशी केली असता ठाणे व पालघर येथील शिक्षणाधिकाऱ्यांनी केंद्र बदलाचा निर्णय घेतला असल्याचे शिक्षण संचालकांनी सांगितलचे फुर्ट्याडो म्हणाले. विद्यार्थ्यांना असणारा परीक्षेचा तणाव त्यातून परीक्षा केंद्रावर वेळेवर पोहोचण्याची भिती, गाडयांच्या अनियमित फेऱ्या यांची कल्पना असूनही विद्यार्थ्यांच्या दृष्टीने अयोग्य असलेला निर्णय घेणाऱ्या शिक्षण अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणीही फुर्ट्याडो यांनी शिक्षण संचालकांकडे मागणी केली आहे.