शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

पालघर किनारपट्टीलगत संशयास्पद बोट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2019 05:48 IST

श्रीलंकेत सीरिअल बॉम्ब स्फोट घडवून आणणाऱ्या दहशतवाद्यांना आश्रय देणारी बोट, सध्या पालघर किनारपट्टीलगतच्या समुद्रात वावरत असल्याची माहिती तटरक्षक दलाने दिल्याने किना-यावरील पोलिसांसह सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली आहे.

पालघर : श्रीलंकेत सीरिअल बॉम्ब स्फोट घडवून आणणाऱ्या दहशतवाद्यांना आश्रय देणारी बोट, सध्या पालघर किनारपट्टीलगतच्या समुद्रात वावरत असल्याची माहिती तटरक्षक दलाने दिल्याने किना-यावरील पोलिसांसह सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली आहे. अन्नधान्य आणि इंधनाचा मोठा साठा असलेली ही बोट अरबी समुद्रात निदर्शनास आल्याने किनारपट्टीवरील सर्वांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.अप्पर पोलीस अधीक्षक योगेश चव्हाण यांनी सोमवारी पोलीस अधीक्षक कार्यालयात इंटेलिजन्स ब्युरो, सीआयडी, गुन्हे अन्वेषण विभाग, दहशतवादी विरोधी पथक, कोस्टगार्ड, महाराष्ट्र मेरीटाइम बोर्ड, मत्स्यव्यवसाय विभाग, सर्व सागरी पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी, मच्छीमार संस्थांचे प्रतिनिधी यांच्या संयुक्त बैठकीचे आयोजन केले होते. महाराष्ट्र पोलिसांना किनाºयापासून १२ नॉटिकलपर्यंतच्या समुद्रातील भागात लक्ष ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. सागरी पोलिसांनी आपल्याजवळील चार स्पीडबोटींद्वारे पेट्रोलिंगला जावे, असा आदेश देऊन जनतेत जागृती करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावेत, असे अप्पर पोलीस अधीक्षक योगेश चव्हाण यांनी सांगितले. संरक्षण यंत्रणेने दिलेल्या इशाºयानंतर पालघर पोलीसही सतर्क झाले आहेत. किनारपट्टीवरील संशयास्पद हालचाली टिपून त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी पोलिसांनी गस्त वाढविली आहे. पोलिसांनी अशा संशयित कारवाया रोखण्यासाठी मोठी यंत्रणा उभारली असली, तरी अपुरे मनुष्यबळ आणि मर्यादित साधनसामुग्री यामुळे पोलिसांना काही मर्यादा येत आहेत.>समुद्रात हाय अलर्ट घोषित करण्यात आला आहे. दक्षिण केरळमध्ये पेट्रोलिंग सुरू असून, राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने अधिक माहिती देऊ शकत नाही.- कमांडन्ट विनिष कृष्णन, चीफ पीआरओ कोस्ट गार्ड मुंबई.