शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

कोणत्याही क्षणी पालघरची पोटनिवडणूक?

By admin | Updated: October 24, 2015 00:26 IST

पालघर पोटनिवडणूक कोणत्याही क्षणी जाहीर होण्याची दाट शक्यता आहे. एक-दोन दिवसांत आयोगातर्फे आचारसंहिता जारी केली जाईल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

- दीपक मोहिते,  वसईपालघर पोटनिवडणूक कोणत्याही क्षणी जाहीर होण्याची दाट शक्यता आहे. एक-दोन दिवसांत आयोगातर्फे आचारसंहिता जारी केली जाईल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. ही जागा रिक्त होऊन ६ महिन्यांचा कालावधी उलटून गेला आहे. मात्र, उच्च न्यायालयात याचिका दाखल असल्यामुळे ही निवडणूक पुढे ढकलण्यात आली. आता या मार्गातील सर्व अडथळे दूर झाल्यामुळे लवकरच पोटनिवडणूक जाहीर होईल, असा अंदाज आहे.पालघर पोटनिवडणूक कधी लागते, याकडे सर्व पक्षांचे लक्ष लागले आहे. काँग्रेस, सेना आणि बहुजन विकास आघाडी हे प्रमुख पक्ष या वेळी एकमेकांसमोर उभे ठाकतील, असा अंदाज आहे. परंतु, राज्यात सेना-भाजपातील शीतयुद्धामुळे ही पोटनिवडणूक भाजपही लढवू शकतो. स्थानिक पातळीवरही भाजप-सेनेचे नाते विळ्याभोपळ्याचे आहे. त्यामुळे भाजपा या विधानसभा क्षेत्रात आपली ताकद आजमावेल, अशी शक्यता आहे. दुसरीकडे काँग्रेस व राष्ट्रवादीमध्येही गेली अनेक वर्षे धुसफूस सुरू आहे. राष्ट्रवादीच्या एका ज्येष्ठ नेत्याने या मतदारसंघात आपला उमेदवार उभा करण्याच्या दृष्टीने स्थानिक नेत्यांशी व पदाधिकाऱ्यांशी चर्चा केल्याचे समजते. बहुजन विकास आघाडीनेही ही पोटनिवडणूक प्रतिष्ठेची केली असून त्या दृष्टीने जोरदार प्रयत्न चालवले आहेत. बहुजन विकास आघाडीचा उमेदवार रिंगणात उतरला तर काँग्रेसच्या उमेदवाराला प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. सेनेची उमेदवारी माजी आमदारांच्या मुलाला दिल्यास सहानुभूतीचा फायदा सेनेला मिळू शकतो. पालघर काँग्रेसमधील अंतर्गत धुमश्चक्री व सेनेचे आव्हान अशा दोन आघाड्यांवर काँग्रेसच्या उमेदवाराला झुंज द्यावी लागणार आहे. अशा या लढतीमध्ये बहुजन विकास आघाडी किती मते मिळवते, यावर सेना व काँग्रेसच्या उमेदवारांचे भवितव्य अवलंबून आहे.