शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

पालघर विधानसभा मतदारसंघ राकाँला हवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2018 23:45 IST

येत्या निवडणुकीच्या जागा वाटपात पालघर विधानसभा मतदार संघ काँग्रेसकडून खेचून घेण्याबाबत जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आग्रही झाली

पालघर : येत्या निवडणुकीच्या जागा वाटपात पालघर विधानसभा मतदार संघ काँग्रेसकडून खेचून घेण्याबाबत जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आग्रही झाली असून कुठल्याही परिस्थितीत ही जागा लढविण्याचे पालघरमध्ये झालेल्या बैठकीत एकमताने ठरविण्यात आले.पालघर तालुका राष्ट्रवादी कॉगेस पार्टीच्या प्रमुख कार्यकर्त्यांची सभा रविवारी बंधन रिसॉर्ट, अल्याळी येथे नवनिर्वाचित अध्यक्ष संजय पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. या सभेस जिल्हा उपाध्यक्ष सुभाष पाटील, महिला आघाडी अध्यक्ष निलम राऊत, शहराध्यक्ष विरेंद्र पाटील, विरोधी पक्ष नेता मकरंद पाटील, युवक अध्यक्ष रोहन पाटील - अध्यक्ष पालघर जिल्हा युवक, नगरसेवक प्रितम राऊत आणि तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.पालघर विधानसभेच्या २०१९ च्या निवडणुकीत पालघर विधानसभा निवडणूक राष्ट्रवादीचा उमेदवाराने लढवण्याची इच्छा व्यक्त करून शरद पवारांकडे तशी मागणीही केल्याचे आमदार आनंद ठाकूर यांनी सांगितले. प्रदेश राष्ट्रवादीच्या मार्गदर्शना नुसार प्रत्येक गावोगावी बूथ कमिटी तयार करून कार्यकर्त्याच्या नेमणूका करीत पक्ष बांधणीवर तालुकाध्यक्ष संजय पाटील यांनी भर दिला आहे.>पालिकेतही सत्ता येईलपालघरात काँग्रेस पेक्षा राष्ट्रवादीची वाढती ताकद पाहता २०१९ च्या निवडणुकीच्या काँग्रेस-राष्ट्रवादीच्या जागा वाटपात पालघर मतदारसंघ राष्ट्रवादीलाच मिळायला हवा असा कार्यकर्त्यांचा आग्रह ही वाढू लागल्याचे जिल्हाध्यक्ष सुनील भुसारा यांनी नमूद केले.पालघर नगरपरिषदेवरील सत्ता काबीज करण्याचा प्रयत्न थोडक्यात हुकल्याने या निवडणुकीत नागरपरिषदेवर राष्ट्रवादीची सत्ता असेल असा आशावाद जिल्हा सरचिटणीस अनिल गावड यांनी व्यक्त केला.