शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

भाताचे पैसे दोन महिने रखडले

By admin | Updated: February 8, 2016 02:28 IST

वाडा तालुक्यात सुरू असलेल्या भात खरेदी केंद्रांना आदिवासी विकास महामंडळाकडून वेळीच पैसा उपलब्ध होत नसल्याने दोन महिन्यापेक्षा अधिक काळ लोटला तरी भात विक्रीचे पैसे शेतकऱ्यांना मिळालेले नाहीत.

वाडा : वाडा तालुक्यात सुरू असलेल्या भात खरेदी केंद्रांना आदिवासी विकास महामंडळाकडून वेळीच पैसा उपलब्ध होत नसल्याने दोन महिन्यापेक्षा अधिक काळ लोटला तरी भात विक्रीचे पैसे शेतकऱ्यांना मिळालेले नाहीत. या मुळे शेतकऱ्यात महामंडळा विरूध्द प्रचंड संताप आहे.महाराष्ट्र सहकारी आदिवासी विकास महामंडळाकडून तालुक्यात भात खरेदी केंद्र सुरू करण्यात आली आहेत. यात खानिवली, गोऱ्हे, परळी, पोशेरी, तिळगांव , खैरे आंबिवली या केंद्रांचा समावेश आहे. या केंद्रावरील अनेक बाबींबाबत शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत. तरीही शेतकरी आर्थिक अडचणीमुळे दुरदुरून भात विक्रीसाठी केंद्रावर आणतात. मात्र भात विक्रीनंतर लगेच शेतकऱ्यांना पैसे दिले जात नाहीत असे डाकिवली येथील शेतकरी चंद्रकांत पाटील या शेतकऱ्यांने सांगितले. दोन महिन्यापेक्षा अधिक काळ लोटला तरी भात विक्रीचे पैसे दिलेले नाहीत. पैशासाठी चौकशा व अनेक खेटे शेतकऱ्यांना मारावे लागतात. या महामंडळाच्या अनागोंदी कारभारा विरोधात शेतकऱ्यांत प्रचंड संताप आहे.या बाबत सहकारी बँकेत चौकशी केली असता असे समजले की, आदिवासी महामंडळ उपप्रादेशिक कार्यालय मोखाडा यांनी शेतकऱ्यांसाठी आलेल्या पैशाची हुंडी पांच दिवसाच्या आत बँकेतून वटविली पाहीजे. पाच दिवसापेक्षा जास्त दिवस न वटविता ठेवली तर त्यावर दंड आकारला जातो. व दंडाची रक्कम भरल्यानंतरच बँक पुढील हुंडी पास करते. अशी दंडाची लाखो रूपयाची रक्कम बँकेत भरलेली नसल्याने बँकेला हुंडी तास करण्यात अडचण असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. महामंडळ व सहकारी सोसायट्यात सदरचा दंड भरण्याबाबत तू तू मै मै सुरू असल्याने शेतकऱ्यांचे मरण झाले आहे.महामंडळाच्या मोखाडा उपप्रादेशिक कार्यालयाकडून या दंड व्याजाची रक्कम नाशिक येथून मागवून ती बँकेत अदा करणे जरूरीचे होते.मात्र ही बाब अजून झालेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना पैसे मिळालेले नाहीत. असे बँकेकडून समजलेआठ दिवसात शेतकऱ्यांना भात विक्रीचे पैसे मिळाळे नाहीत तर शेतकरी आंदोलन छेडतील असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.