शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

वाड्यात भातखरेदीचा उडाला बोजवारा, बळीराजाची लूट सुरूच

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2020 00:58 IST

वाडा तालुक्यात सुरू असलेल्या भातखरेदी केंद्रांना महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळाच्या उदासीन कारभाराची घूस लागल्याने भातखरेदीचा पुरता बोजवारा उडाला आहे.

वाडा : तालुक्यात सुरू असलेल्या भातखरेदी केंद्रांना महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळाच्या उदासीन कारभाराची घूस लागल्याने भातखरेदीचा पुरता बोजवारा उडाला आहे. त्यामुळे पोटापाण्यासाठी दुसरा पर्याय नसल्याने शेतकरी मातीमोल किमतीत खासगी व्यापाऱ्यांना भात विकू लागल्याने व्यापाऱ्यांचं मात्र चांगभलं होत आहे.आदिवासी विकास महामंडळाकडे कर्मचाऱ्यांच्या अनेक जागा रिक्त असल्याने आदिवासी सेवा सहकारी सोसायट्या व सेवा सहकारी संस्थेमार्फत भातखरेदी केंद्र चालविली जात असत. मात्र, आता सेवा सहकारी संस्थेकडची केंद्र बंद करण्यात आली आहेत. तालुक्यात आदिवासी सेवा सहकारी सोसायट्यांची पोशेरी, खानिवली, परळी, कळंभा, गारगांव, खैरे-आंबिवली या ठिकाणची केंद्रे सुरू आहेत, परंतु या भातखरेदी केंद्र चालकांकडून भात भरण्यासाठी लागणारी पोती शेतकऱ्यांना जुनी देऊन केंद्र चालक नवीन पोत्यांचे पैसे घेतात, असा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.तालुक्यातील बहुसंख्य केंद्र चालकांनी मोटार बसविल्याने तेथे भाताच्या दाण्यांचा तुकडा पडतो. त्यामुळे तो भात घेतला जात नाही व केंद्रावर आणलेले भात शेतकरी पुन्हा परत घेऊन घरी जाऊ शकत नाही. याच संधीचा फायदा हे केंद्र चालक अगदी कमी दराने शेतकऱ्यांकडून खासगीत भातखरेदी करतात. काही केंद्र चालक मापात फसवणूक करतात, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. भातखरेदी केंद्रांवर शासनाचे नियम धाब्यावर बसवून भाताची प्रतवारी ठरविली जात असल्याने तालुक्यात शेतकऱ्यांची लूट सुरू आहे.वाडा तालुक्याला भाताचे कोठार म्हणून संबोधले जाते. येथे भातपिकाचे क्षेत्रही अन्य तालुक्यांपेक्षा अधिक आहे. त्यामुळे तालुक्यात जास्तीतजास्त भातखरेदी केंद्र उघडणे अपेक्षित असताना मोजकीच केंद्र उघडल्याने अनेक शेतकऱ्यांचा भात विक्री झालेला नाही. तालुक्यातील महसुली गावांची संख्या १५० हून अधिक असताना ठरावीक भातखरेदी केंद्र सुरू केल्याने, या केंद्रावर भात घेऊन जाण्यासाठी शेतकऱ्यांना २० ते २५ किमी अंतराचा प्रवास करून जावे लागते, शिवाय आदिवासी सेवा सहकारी सोसायट्यांच्या नावावर गोडावूनधारकच ही केंद्र चालवत असल्याने त्यांच्यावर प्रशासनाचा अंकुश राहिलेला  नाही. आदिवासी विकास महामंडळाची खरेदी ही योग्य आहे, परंतु कर्मचाऱ्यांच्या अभावामुळे आदिवासी सेवा सहकारी संस्थेमार्फत चालू असलेली भातखरेदी ही शेतकऱ्यांना मारक आहे.- कांतीलाल म्हसकरभात उत्पादक शेतकरी, सोनाळे या संदर्भात आदिवासी विकास महामंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी विजय पवार यांच्याशी दूरध्वनीवरून वारंवार संपर्क साधला असता, त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

टॅग्स :agricultureशेतीVasai Virarवसई विरार