शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

पाइपलाइनमुळे भातशेती पडणार ओस

By admin | Updated: July 7, 2017 05:42 IST

घोणसई या गावाच्या हद्दीत रिलायन्स कंपनीने खोदलेल्या चरात पाइपही टाकले नाहीत. व ते चर बुजविलेही नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांना

लोकमत न्यूज नेटवर्कवाडा : घोणसई या गावाच्या हद्दीत रिलायन्स कंपनीने खोदलेल्या चरात पाइपही टाकले नाहीत. व ते चर बुजविलेही नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांना पलीकडच्या शेतात जाण्याचे मार्ग बंद झाल्याने शेती ओस राहणार असून त्यांच्यावर उपासमारीची वेळ येणार आहे. याबाबतचे निवेदन वाड्याच्या प्रांतअधिका-यांना देण्यात आले असून न्यायाची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. घोणसई या गावाच्या हद्दीतून गॅस पाईपलाईन जात असून कंपनीने गेल्या एप्रिल महिन्यात चर खोदले आहेत. त्या चराशेजारीच पाइप ठेवले आहेत. मात्र ते पाइप चरात अद्याप टाकलेले नाहीत. या चरामुळे शेतकऱ्यांचा पलीकडच्या शेतावर जाण्याचा मार्ग बंद झाला आहे. तसेच नैसर्गिक पाण्याचा प्रवाह बंद झाल्याने काही शेतात प्रचंड पाणी तर काही शेतात पाण्याचा थेंबही राहणार नसल्याची शक्यता शेतकऱ्यांनी व्यक्त केली. भात लागवडीची कामे सुरू केली आहेत. मात्र शेतावर जायला रस्ताच नसल्याने ती करता येत नाही. रिलायन्स कंपनीच्या हलगर्जीपणामुळे शेतकऱ्यांची शेती ओस राहून त्यांच्यावर उपासमारीची वेळ येण्याची भीती निवेदनात शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. आम्ही गरीब शेतकरी असून शेतीशिवाय आमचे उत्पनाचे दुसरे कोणतेही साधन नाही. त्यामुळे आमच्या वर उपासमारीची वेळ येणार असल्याची भीती निवेदनात नमूद केली आहे. आम्हाला न्याय न मिळाल्यास आमरण उपोषणाचा इशारा निवेदनात दिला आहे. त्यावर पांडुरंग पाटील, अशोक घोरकणे, प्रकाश पाटील, अंकुश घोरकणे या शेतक-यांच्या स्वाक्ष-या आहेत. यासंदर्भात रिलायन्स गॅस कंपनीचे अधिकारी बाला सुब्रमण्यम यांच्याशी संपर्क साधला असता एक दोन दिवसात शेतकऱ्यांसाठी रस्ता तयार करून दिला जाईल अशी माहिती त्यांनी दिली.