शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
2
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
3
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
4
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
5
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
6
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
7
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
8
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
9
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
10
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
11
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
12
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
13
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
14
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
15
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
16
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव
17
ऑस्ट्रेलियन क्रिकेटर स्टंपमध्ये माईक असतो ते विसरला; रागाच्या भरात नको ते बोलून फसला!
18
रस्त्यांच्या दुरवस्थेवर सुमीत राघवनचा संताप, गडकरी-फडणवीसांना 'हे' तंत्रज्ञान वापरण्याचा सल्ला
19
"माझ्या पत्नीला स्वत:कडे ठेवतो अन् त्याची बायको माझ्याकडे पाठवतो..."; युवकाची अजब कहाणी, पोलीस हैराण
20
GST कपातीनंतर Alto, Swift, Dzire आणि WagonR किती रुपयांना मिळेल? जाणून घ्या...

चांगल्या पावसामुळे भातशेती बहरतेय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2017 03:02 IST

यंदा पाऊस वेळेवर आणि पुरेसा पडल्याने या तालुक्यातील भातशेती चांगलीच बहरली आहे.

राहुल वाडेकर ।लोकमत न्यूज नेटवर्कविक्रमगड : यंदा पाऊस वेळेवर आणि पुरेसा पडल्याने या तालुक्यातील भातशेती चांगलीच बहरली आहे. गेल्या दोन चार वर्षापासून होत असलेल्या अनियमित पावसामुळे येथील शेतक-यांना भातपिकाचे उत्पादन घेणे जिकरीचे होत होते. परंतु यंदा मात्र विक्रमगड तालुक्यात भातशेतीसाठी आवश्यक असा पाउस झाल्याने व होत असल्याने सर्वत्र शेती हिरव्यागार भातरोपांनी बहरुन गेली आहे़ गेले काही दिवस उसंत घेणारा वरुण राजा श्रावणामध्ये देखील अधून मधून पावसाच्या सरी व उबदार उन देत आहे, जास्त पाउस नाही व जास्त उघडीप देखील नाही जणूकाही उन-पावसाचा खेळच चालू असल्यासारखे वातावरण सध्या अनुभवास मिळत आहे़ ते भातशेतीला अत्यंत पोषक ठरते आहे कारण यापुढे काही दिवसांत भाताला पोटरी येउन कणसे तयार होण्याचा काळ सुरु होणार आहे़ सध्या भातशेतीचा कालावधी हा पोटरीचा आहे़ भाताच्ंया रोपांना फुले येत आहेत़ या वातावरणामुळे सध्या भातशेतीबरोबरच तूर, माळरानावरील चिबुड, टोपलीतील डांगर, गावरान काकडी, परसातील भाजीपाला या दुय्यम पिकांनाही चांगला बहर आला आहे़ त्यामुळे सध्या बाजारात गावठी काकडी, शिरोळी, कंटोली, मका, वांगी, भेंंडी आदी भाजीपाला विक्रीस येत आहे़विकमगड तालुक्यात एकूण ८६ गावपाडयांत ७५५७ हेक्टर क्षेत्रामध्ये मोठया स्वरुपात भात पिक घेतले जाते़ त्यासाठी सुधारीत भात वाणांमध्ये अती हळव्या गटात कर्जत -१८४, रत्नागीरी-२४, हळव्या गटात रत्ना, रत्नागीरी-1, रत्नागीरी-७११, कर्जत-३, कर्जत-४, कर्जत-७, एमटीयू-१०१०, रत्नागीरी-५, निमगरवा गट- जया, पालघर-१, कर्जत-५ एमटीयू-१००१, कर्जत-६, एचएमटीसोना, पुसा बासमती-१, इंद्रायणी,गरवा गट कर्जत-२, कर्जत-८, सुवर्णा(एमटीयू-७०२९),मसूरी, सांबा मसूरी (बीपीटी-५२०४), श्रीराम, संकरीत वाण पूसा आरएच-१०, संकरित मंगला, संकरित कल्याणी, संकरित सहयाद्री-२,३,४, याप्रमाणे सुधारीत भात बियाणांची लागवड शेतक-यांनी केली आहे़ वातारण स्वच्छ असल्याने भातशेती बहरली आहे़दरम्यान या भागात निंदणीच्या (बेणणी) कामांनी चांगला वेग धरला आहे़ बहर आलेली पिके पाहून बळीराजा आनंदला आहे़ याबाबत ओंदे येथील शेतकरी बबन दामोदर पाटील यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी सांगीतले की, असेच पोषक वातावरण किमान अनंत चतुर्दशी पर्यंत राहिल्यास मोठे नगदी पीक हाती लागण्याची शक्यता आहे. पावसाने अधिक उघडीप दिल्यास हळवे पिक हातातून जाण्याची भीतीही त्यांनी व्यक्त केली़ आतापर्यंत विक्रमगड सर्कल २३६४ मि़ मी. तर तलवाडा सर्कल २२४३ मि़ मी. पावसाची नोंद झाली आहे.