शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

पापडखिंडच्या पाण्याची चोरी, टँकरद्वारे खुलेआम पाण्याचा अपहार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2018 02:34 IST

महापालिकेच्या मालकीच्या पापडखिंड धरण परिसरात तब्बल दहा ते पंधरा बोअरवेल मारून टँकरने दिवसरात्र मोठ्या प्रमाणावर पाणी उपसा केला जात आहे. त्यामुळे धरणातील पाण्याचा साठा झपाट्याने कमी होऊ लागल्याने विरारकरांची तहान भागवणारे पापडखिंड धरण येत्या महिन्याभरातच आटण्याच्या मार्गावर आहे.

- शशी करपेवसई : महापालिकेच्या मालकीच्या पापडखिंड धरण परिसरात तब्बल दहा ते पंधरा बोअरवेल मारून टँकरने दिवसरात्र मोठ्या प्रमाणावर पाणी उपसा केला जात आहे. त्यामुळे धरणातील पाण्याचा साठा झपाट्याने कमी होऊ लागल्याने विरारकरांची तहान भागवणारे पापडखिंड धरण येत्या महिन्याभरातच आटण्याच्या मार्गावर आहे.विरार येथे एक एमएलडी क्षमतेचे पापडखिंड धरण आहे. छटपूजा, गुरे-ढोरे धुणे, आत्महत्या याप्रकारांमुळे धरण वादात सापडले असतानाच आता धरणाला लागून असलेल्या खाजगी जागेत दहा ते पंधरा बोअरवेल मारून एका दादाने प्रचंड पाणी उपसा सुुरु केला आहे. या बोअरवेलने पाणी उपसून एका मोठ्या हौदात साठवले जाते. त्या हौदातून टँकरमध्ये भरून विरार परिसरात पाणी विकले जात आहे. याठिकाणी दिवस रात्र बोअरिंगव्दारे पाणी उपसा सुुरु असल्याने धरणातील पाणी साठा झपाट्याने कमी होऊ लागला आहे. त्यामुळे येत्या महिन्याभरातच धरण आटण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे यंदा पाणी टंचाईत भर पडण्याची भिती व्यक्त करण्यात येते.धरणाच्या सुरक्षेसाठी आळीपाळीने दोन-दोन असे तीन पाळीत सहा सुरक्षा रक्षक असल्याचे आयुक्तांनी पत्रकारांना सांगितले होते. प्रत्यक्षात मात्र धरणाच्या सुरक्षेसाठी एकही सुरक्षा रक्षक त्याठिकाणी नेमला नसल्याचे दिसत आहे. आठवड्यातून एखाद दिवस एखादा सुरक्षा रक्षक पाठवून खोटी बिले काढून ठेकेदार महापालिकेची फसवणुक करीत असल्याचा नागरीकांचा आरोप आहे. पाणी चोरणारा दादा सत्ताधारी वसई विकास आघाडीशी संबंधित असल्यानेच त्याच्यावर कारवाई केली जात नसल्याचा आरोप स्थानिक नागरीक करीत आहेत.या चोर दादाला कुणाचे पाठबळधरणाच्या कॅचमेट भागात काही स्थानिक लोकांच्या जमिनी आहेत. त्याठिकाणी एका दादाने बोअररिंग मारून पाणी विकण्याचा सपाटा लावला आहे. पाणी उपशासाठी महावितरणकडून वीज ही घेण्यात आलेले आहे.धक्कादायक बाब म्हणजे धरणाला लागूनच महापालिकेचे तरणतलाव आणि गोडाऊन आहे. त्याठिकाणी सुरक्षा रक्षक असतात. तरीही धरणाच्या पात्रातून पलिकडे जाऊन टँकर पाणी घेऊन विकायला जात असतात. तरीही त्यांच्यावर कारवाई केली जात नाही.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार