शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
4
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
5
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
6
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
7
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
8
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
9
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
10
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
11
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
12
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
13
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
14
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
15
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
16
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
17
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
18
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
19
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
20
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

नायगाव खाडीपुलाच्या कामाला आला वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2019 22:36 IST

पाऊस थांबल्याने कामाला सुरुवात; जानेवारी २०२० मध्ये पूल खुला होणार?

वसई : वसई तालुक्यातील नायगाव पूर्वेकडील सोपारा खाडीवरील नवीन पादचारी पुलाच्या उतार मार्गाचे रखडलेले काम लवकरच पूर्ण होण्याची चिन्हे आहेत. पाऊस थांबल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाने आता हे काम पुन्हा एकदा सुरू केले आहे. तब्बल पाच वर्षे हे काम रखडले आहे. त्यामुळे येथील स्थानिकांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन हे काम पुन्हा सुरू झाले आहे.या नायगाव पुलाचे काम डिसेंबर २०१९ पर्यंत पूर्ण करण्याचा बांधकाम विभागाचा मानस असून नवीन वर्षाच्या सुरुवातीला, जानेवारी २०२० मध्ये हा पूल नागरिकांसाठी खुला करण्यात येणार असल्याचा दावाच सार्वजनिक बांधकाम विभागाने केला आहे.अधिक माहितीनुसार, नायगाव पूर्वेला सोपारा खाडी असून येथील सर्वच नागरिक नायगाव स्टेशनवर जाण्यासाठी या सोपारा खाडीवरील जुन्या लोखंडी पत्री पुलाचा वापर करतात. मात्र हा पूल अतिशय धोकादायक असल्याने नायगाव पूर्वेकडील भागात नागरिकांना ये-जा करण्यासाठी नवीन पादचारी पूल तयार करण्यात येत आहे. येथून दररोज हजारोंच्या संख्येने प्रवासी जातात. मात्र, हा पूलही अर्धवट अवस्थेतच नागरिकांसाठी खुला करण्यात आला आहे. या नवीन पुलाच्या उतार मार्गाचे काम अद्याप अपूर्ण असल्याने पूर्वेस राहणाऱ्या नागरिकांना विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे. हे लक्षात घेऊन सार्वजनिक बांधकाम विभागाने हे काम युद्धपातळीवर हाती घेतल्याचे चित्र आहे. काम वेळेत पूर्ण झाल्यास नागरिकांचा त्रास निश्चितच वाचणार आहे.४ वर्षात ४ वेळा टेंडर२०१४ ते २०१८ या चार वर्षांच्या काळात या नायगाव पुलासाठी एकूण चार वेळा निविदा (टेंडर) काढण्यात आली. तर या पुलाच्या कामासाठी सा.बां. विभागाकडून ५ कोटी २० लाख रुपये इतका निधी मंजूर करण्यात आला होता. तर अतिरिक्त खर्चाचा भार वसई - विरार महानगरपालिकेने घेतला. पुलाच्या कामासाठी अतिरिक्त खर्च येत असल्याने वसई - विरार मनपाने देखील मदतीचा हात पुढे केला आणि यासाठी पीडब्ल्यूडी विभागाला १ कोटी १ लाख ७४ हजार इतका निधी मंजूर केला.ढिसाळ कारभारामुळे पूल ३ वर्षे रखडला२०१४ मध्ये नवीन पुलाच्या कामाची निविदा काढून त्याला मंजुरी देण्यात आली. त्यानंतर हे काम २०१६ मध्ये पूर्ण होईल, असे सांगण्यात आले होते. मात्र, ठेकेदाराच्या ढिसाळ कारभारामुळे या पुलाचे काम तीन वर्षे उलटूनही पूर्ण होऊ शकलेले नाही.