शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मासेमारीच्या परवानगीबाबत जिल्ह्यातील मच्छीमारांमध्ये नाराजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2020 02:28 IST

२० एप्रिलला काढण्यात आलेले आदेश मागे घ्यावेत, अन्यथा लॉकडाउननंतर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीचे अध्यक्ष दामोदर तांडेल यांनी दिला आहे.

हितेन नाईकपालघर : आदर्श कार्यप्रणालीच्या गोंडस नावाखाली ४३ जाचक अटींसह मत्स्यव्यवसाय विभागाचे प्रधान सचिव अनुप कुमार व मत्स्यव्यवसाय आयुक्त राजीव जाधव यांनी मासेमारीला घाईघाईने परवानगी दिल्याबाबत संशय व्यक्त केला जात आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मासेमारी केंद्रावर आरोग्यतपासणी केंद्रासह अन्य कुठल्याही तत्सम उपाययोजना आखल्या नसताना ट्रॉलर्सधारकांच्या फायद्यासाठी मासेमारी सुरू करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप करीत २० एप्रिलला काढण्यात आलेले आदेश मागे घ्यावेत, अन्यथा लॉकडाउननंतर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीचे अध्यक्ष दामोदर तांडेल यांनी दिला आहे.समुद्रात अंडीधारी माशांसह पापलेटच्या लहान पिलांची बेसुमार मासेमारी रोखून मत्स्योत्पादन वाढावे, यासाठी पालघर जिल्ह्यासह गुजरात राज्यातील बहुतांशी मच्छीमारांनी ३१ मेपर्यंत मासेमारीला न जाण्याचा निर्णय घेतला असून त्याची अंमलबजावणी सुरू केली आहे. आता मासेमारी सुरू केल्यास अंडीधारी मासे आणि लहान पिलांची मोठ्या प्रमाणात कत्तल (मासेमारी) होण्याची भीती आहेत. परिणामी, मत्स्योत्पादन मोठ्या प्रमाणावर घटेल, तर दुसरीकडे समुद्रात मासेमारीसाठी गेलो तर पकडण्यात येणारे मासे खरेदी करण्यासाठी निर्यातदार व्यापारी इच्छुक नसल्याची माहिती सहकारी संस्थांकडून दिली जात आहे.मासे खरेदी-विक्रीची सर्वात मोठी बाजारपेठ असलेले मुंबईतील क्रॉफर्ड मा$र्केट, भाऊचा धक्का आदी भाग कोरोनाच्या संसर्गाने रेड झोनमध्ये मोडत असल्याने सध्या बंद आहे. त्याच बरोबरीने नायगाव, सातपाटी, वसई, उत्तन येथील खरेदी-विक्रीच्या बाजारपेठाही बंद पडल्या आहेत. त्यामुळे मासेमारी करून आणलेल्या हजारो टन माशांची खरेदी-विक्री करण्याची कुठलीही व्यवस्था शासनपातळीवरून केली नसल्याने मासेमारी न करणे, हे सर्वांच्या हिताचे असल्याचे मत परंपरागत मच्छीमारांकडून व्यक्त होत आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत बाधितांची तसेच मृतांची आकडेवारी वाढत असताना आणि खरेदी-विक्रीदरम्यान मोठ्या प्रमाणात गर्दी होणार असल्याने मासेमारीसाठी घाईघाईने परवानगीचे आदेश काढण्याचा हेतू काय? असा प्रश्न तांडेल यांनी उपस्थित केला आहे.जिल्ह्यात सातपाटी, मुरबे, डहाणू, वडराई, दांडी, नवापूर, वसई, अर्नाळा, पाचूबंदर, नायगाव या प्रमुख बंदरांतून मच्छीमारी बोटींना ४३ शर्ती-अटींची पूर्तता केल्यानंतरच मासेमारीला जाण्याची परवानगी देता येईल, असे नमूद केले आहे. संबंधित जिल्हाधिकारी व सहा. आयुक्त मत्स्यव्यवसाय यांनी प्रत्येक बंदरात आरोग्यतपासणी केंद्र उभारावे, मासेमारी नौका बंदरावर अथवा जेट्टीवर नांगरताना नौकेवरील खलाशांनी आरोग्य विभागाच्या तपासणी केंद्राशी संपर्क साधावा, आरोग्य विभागाकडून पूर्णत: तपासणी आणि थर्मल स्कॅनिंग झाल्यानंतर आरोग्य विभाग आणि जिल्हास्तरीय नियंत्रण विभागाच्या परवानगीनंतर खलाशांना बंदरात उतरण्यास व मासेमारीस परवानगी देण्यात येणार आहे.>मासेमारी केंद्रांवर कोणतीही व्यवस्था नाही : मासेमारीपूर्वी ४३ अटींची पूर्तता केल्यानंतरच मासेमारी करण्यास परवानगी देण्यात येईल, असे आदेशात म्हटले असताना जिल्ह्यातील डहाणू, पालघर, वसई व ठाणे जिल्ह्यातील उत्तन या महत्त्वपूर्ण मासेमारी केंद्रांवर जिल्हा प्रशासनाकडून एकही व्यवस्था उभी केली नसल्याचे निदर्शनास आलेले आहे.