शहरं
Join us  
Trending Stories
1
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
2
Top Marathi News LIVE Updates: आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज संध्याकाळी अंत्यसंस्कार
3
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
4
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
5
वेतनवाढीच्या मागणीवरून कामगार आक्रमक; वाहनांची तोडफोड आणि दगडफेक, नोएडातील घटना!
6
ट्रम्प यांच्या धमकीनंतर शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स १४०० अंकांनी आपटला; निफ्टी २४ हजारांच्या खाली
7
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या १००हून अधिक रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीची नोटीस जारी
8
SBI Home Loan: स्टेट बँकेतून ५० लाख रुपयांचं होम लोन घ्यायचंय; पाहा किती असावी लागेल सॅलरी?
9
IPL 2026: भर मैदानात टिम डेव्हिडची ‘दादागिरी’! पंचांच्या हातून चेंडू हिसकावला अन्...; पाहा नेमकं काय घडलं?
10
वेगाचा बादशाह जेव्हा स्वराभिषेकात न्हाऊन निघाला, ब्रेट लीने आशा भोसले यांच्यासोबत गायले होते गाणे
11
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
12
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
13
Accident: लग्नाहून परतताना मृत्यूनं कवटाळलं, हापूड जिल्ह्यात वऱ्हाड्यांच्या बसला भीषण अपघात, ६ जण ठार!
14
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
15
निरोपाची वेळ आली..! आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार होणार, दुपारी तीन वाजेपर्यंत अंत्यदर्शन
16
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
17
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
18
उरले उरात काही 'आवाज' चांदण्यांचे, आशा भोसले यांचे निधन, आज होणार अंत्यसंस्कार
19
विदर्भात पारा ५ अंशांनी वाढला; अकोला जिल्हा सर्वाधिक ‘हॉट’, थंड हवेचे ठिकाण बुलढाणाही तापले; ८ दिवस राहणार तडाखा
20
MI vs RCB : विकेट गमावल्यावर Virat Kohli ला राग अनावर! हेल्मेट-ग्लोव्हज फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

आमचे गुरुजी सायकलवाले; विद्यार्थी व पालकांमध्ये कुतूहल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2019 23:02 IST

साधेपणा व पर्यावरणविषयक गुरुजींचा संदेश

अनिरुद्ध पाटीलबोर्डी : आमचे सायकलवाले गुरुजी, ते सायकलनेच शाळेत येतात. या विद्यार्थ्यांच्या वाक्यांनी पालकवर्गातच नव्हे तर गावातील वस्तीत हा कुतुहलाचा विषय बनला आहे. घोलवड गावच्या टोकेपाडा या जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील योगेश यशवंत जगताप हे शिक्षक नव्यानेच या शाळेत रुजू झाले आहेत. या काळात कार्यालयापर्यंतचा प्रवास सायकलने करण्याचे कालबाह्य झाले असताना त्यांच्या सायकलवारीची चर्चा रंगत आहे.

जगताप गुरुजी हे मूळचे जळगाव जिल्ह्याच्या यावल तालुक्यातील आहेत. दहा वर्षांपूर्वी ते डहाणू तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या कैनाड केंद्रातील खरपडपाडा या प्राथमिक शाळेत रुजू झाले. या दुर्गम आदिवासी पाड्यावरील पालकांची आर्थिक स्थिती पाहून ते कमालीचे अस्वस्थ झाले. येथील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भविष्य घडविण्याकरिता त्यांच्या भोवतालच्या परिस्थितीशी नाळ जोडणे आवश्यक आहे. म्हणूनच साधे राहणे आवश्यक असल्याचे जगताप गुरुजींनी हेरले. पेहरावापासून ते भाषेपर्यंत सर्वच साधे असावे याकडे त्यांनी विशेष लक्ष दिले. हा भाग डोंगराळ आणि गरिबीमुळे पालकांकडे सायकली शिवाय अन्य साधनांचा अभाव होता. एखाद दुसरी दुचाकी पाड्यावर पाहायला मिळायची. तेव्हापासून गुरुजींनी डहाणूतील घर ते शाळा आणि पुन्हा परतीचा असा सुमारे २२ कि.मी.चा प्रवास तब्बल दहा वर्ष सायकलने केला. त्यांना तिन्ही ऋतूंचा अडथळा कधी आला नाहीच. त्यामुळे काही अवधीतच ते विद्यार्थिप्रिय तर झालेच. गुरुजी आपल्यातीलच वाटल्याने आदिवासी पालकही त्यांच्याशी आपुलकीने संवाद साधू लागले. विद्यार्थ्यांची पटसंख्या आणि बौद्धिक गुणवत्ता वाढण्याची किमया सायकलने साधल्याचे लक्षात आल्यानंतर २०१९ या शैक्षणिक वर्षात त्यांची टोकेपाडा शाळेत बदली झाल्यावरही हा नेम चुकलेला नाही. उलटपक्षी त्यांच्या आगमनाने शाळा आणि परिसरात चर्चा सुरू झाली आहे.

डहाणू बोर्डी प्रमुख राज्य मार्गालगत ही शाळा असून त्यांच्या घरापासून १२ कि.मी.वर आहे. येथे दिवसभर वाहनांची वर्दळ शिवाय शाळेसमोरच एसटीचा बस थांबा. एवढेच नव्हे तर जवळच घोलवड हे पश्चिम रेल्वे स्थानक आहे. या शाळेतील प्रमुख शिक्षक दीपक देसले स्वत:चे वाहन घेऊन डहाणूहून शाळेत येतात. त्यांनीही गुरुजींना सोबत शाळेपर्यंतचा प्रवास विनामूल्य करण्याची ऑफर दिली. मात्र त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता सायकल प्रवासाचे प्रयोजन सांगितल्याने गुरुजीही प्रभावित झाले. जगताप गुरुजींचे इंग्रजी विषयावर प्रभुत्व असून अल्पावधीतच त्यांनी विद्यार्थ्यांना आपलेसे केले.

‘‘ गरिबीतून शिक्षण घेतले, त्यामुळे साधेपणाने वागण्याची सवय अंगवळणी लागलेली. विद्यार्थ्यांना हे वागणं आवडल्याने त्यांनी आपलंसं केलं असून त्यांच्या व्यक्तिमत्त्वात सकारात्मक बदल जाणवतो. शारीरिक तंदुरुस्तीसह पर्यावरण व आर्थिक बचत ही त्रिसूत्री साधली जाते.’’-योगेश जगताप (टोकेपाडा शाळेतील शिक्षक)

टॅग्स :Teacherशिक्षक