शहरं
Join us  
Trending Stories
1
ड्रग्ज-दहशतवादाची साखळी घातक, विकासाचे जुने मॉडेल बदलायची गरज; PM नरेंद्र मोदींचं प्रतिपादन
2
भाजपा नेत्यानं जिथं कानशिलात लगावली, तिथेच अपमानाचा वचपा काढण्यासाठी शिंदेसेनेचा जल्लोष
3
भाजपचे नेतेच पसरवत आहेत राज्यात भाषिक प्रांतवादाचे विष; उद्धव ठाकरे यांची टीका
4
शिंदेसेनेकडून ४० संपर्कप्रमुखांची नियुक्ती; निवडणुकीपर्यंत जिल्ह्यातच थांबण्याचे आदेश
5
कुजबुज! आनंद दिघेंच्या मुशीत तयार झालेली शिवसेना ठाण्यात भाजपासमोर नांगी टाकते का? चर्चा सुरू
6
'नॉमिनी' ही मालमत्तेची केवळ 'कायदेशीर विश्वस्त'; मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा
7
पुणे पोलिसांची मध्य प्रदेशात धडक कारवाई; शस्त्रसाठ्यांचे अड्डे उद्ध्वस्त, ५० भट्टया नष्ट
8
एकनाथ शिंदेंच्या बहिणीने साथ सोडली, अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश; भावाकडून प्रतिसादच मिळेना...
9
हिडमाच्या मृत्यूनंतर नक्षलवादी मोहिमेला मोठा धक्का; 37 नक्षलवाद्यांचे एकाचवेळी आत्मसमर्पण...
10
मुंबई, पुण्यापेक्षा नागपुरात अधिक प्रदूषण ! एक्यूआय इंडेक्सने स्पष्ट, नागरिकांनो ही काळजी घ्या
11
आम्ही नितीश सरकारला पाठिंबा देण्यास तयार आहोत, पण..; असदुद्दीन ओवैसींचे मोठे वक्तव्य
12
हृदयद्रावक! १३ महिन्यांचा मुलगा दूध समजून प्यायला ड्रेन क्लीनर; जीभ भाजली, कायमचा गेला आवाज
13
दिल्ली बॉम्बस्फोटानंतर अचानक पाकिस्तानला जाणारे फोन कॉल्स कमी झाले; तपास यंत्रणाही हैराण
14
खळबळजनक! एक्स्ट्रा मॅरिटल अफेयरसाठी वन अधिकाऱ्याने पत्नीसह २ लेकरांना संपवलं अन्...
15
सेलिब्रेशन! स्मृती मानधनाच्या लग्नापूर्वी वधू-वराचे संघ भिडले; कोण जिंकले, पलाशचे आता काही खरे नाही...
16
G20 मधून जागतिक विकासाच्या मॉडेलवर PM मोदींची टीका; मांडले तीन प्रस्ताव, जाणून घ्या...
17
Video: सोलापूर-हैदराबाद महामार्गावर भीषण अपघात; ३ महिला ठार, तर १२ भाविक गंभीर जखमी
18
महाविकास आघाडीत बिघाडी? मनसेला सोबत घेण्यावरुन संजय राऊतांचा काँग्रेसला टोला
19
माणुसकीच नाही! पत्नीच्या डिलिव्हरीसाठी मागितली सुटी; बॉस म्हणतो, 'वर्क फ्रॉम हॉस्पिटल' कर अन्...
20
भीषण अपघातात प्रसिद्ध पंजाबी गायकाचा मृत्यू, ३७ व्या वर्षीच घेतला जगाचा निरोप, दिली होती अनेक सुपरहिट गाणी
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासी महिलेने गवतापासून बनवल्या शोभेच्या वस्तू; गवत ठरतेय वरदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 00:39 IST

रंजना जोशी यांनी या गवतापासून आकर्षक फेल्ट हॅट, झुंबर, हेअरपिन, टोपल्या, परडी, गुलदस्ते, फुलदाणी आणि मुलांसाठी हातातले कडे बनवले आहेत

रवींद्र साळवेमोखाडा : गवतापासून गृहोपयोगी आणि शोभेच्या वस्तू बनविण्याची उपजत कला मोखाडा तालुक्यातील उधळे गावातील रंजना जोशी या आदिवासी महिलेकडे असून मोहोळ आणि कहांडळ या गवतापासून त्यांनी विविध गृहपयोगी व शोभेच्या वस्तू हस्तकलेतून बनविल्या आहेत. या वस्तू ती स्थानिक ठिकाणी विक्री करून आपल्या कुटुंबाची गुजराण करत आहे.   

उधळे हे शे-सव्वाशे कुटुंबांचे एक छोटेसे आदिवासी गाव आहे. गावाजवळ गारगई नदी वाहते आहे. गाव व लगतच्या जंगलात अनेक प्रकारची झाडे व गवत आहेत. त्यामधीलच मोहोळ व  कहांडळ हे गवत माळरान, डोंगर उतार, शेतीचे बांध यावर उगवलेले असते. पूर्वीपासून फक्त जनावरांना चारा  व घरावर छत म्हणून शाकारण्यासाठी एवढे दोनच उपयोग ग्रामस्थांना माहीत होते.

कहांडळ व मोहोळ गवत जून महिन्यात उगवते आणि नोव्हेंबर ते डिसेंबर महिन्यात परिपक्व होते. परिपक्व झाल्यावर गवताचे पाते वाळते व काड्या पिवळ्या-तांबूस रंगाच्या दिसू लागतात. या गवताचा उपयोग शोभेच्या आणि गृहोपयोगी वस्तू बनविण्याची हस्तकला रंजना जोशी या आदिवासी महिलेने साधली आहे. 

रंजना जोशी यांनी या गवतापासून आकर्षक फेल्ट हॅट, झुंबर, हेअरपिन, टोपल्या, परडी, गुलदस्ते, फुलदाणी आणि मुलांसाठी हातातले कडे बनवले आहेत. या वस्तू अनब्रेकेबल (न तुटणाऱ्या), लवचिक असल्याने त्यांना दीर्घायुष्य आहे. तथापि, या वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध नसल्याने त्यांची हस्तकला आजही जनमानसात पोहोचलेली नाही. स्थानिक ठिकाणी विक्री करून त्या आपल्या कुटुंबाची गुजराण करत आहेत. 

गरज बाजारपेठ उपलब्धतेचीरंजना जोशी यांनी गवतापासून वेगवेगळ्या पद्धतीची कलाकुसर आपल्या हस्तकौशल्याने लोकांसमोर आणली आहे, परंतु त्यांच्या या कलेचे चीज होताना दिसत नाही. कुटीर उद्योग अथवा कौशल्य विकासाच्या माध्यमातून त्यांची ही कला पुढे नेण्याची गरज आहे. त्यांनी बनवलेल्या या वस्तूंना बाजारपेठ मिळण्याची आवश्यकता आहे. त्यायोगे गावाकडील अनेक आदिवासी महिला व सुशिक्षित बेरोजगार तरुणांना उत्पन्नाचे साधन निर्माण होईल. तथापि योग्य ते पाठबळ आणि बाजारपेठ उपलब्ध नसल्याने त्यांची ही कला आजही त्यांच्यापुरतीच मर्यादित राहिली आहे.