शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्यावरील भंगार, बेवारस वाहने हटवण्याचा आदेश कागदावरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 23:38 IST

अंमलबजावणी झाली नाही; नागरिकांसह वाहनचालक त्रस्त

पारोळ : वसई-विरार शहर महापालिकेने मध्यंतरी काढलेल्या भंगार, बेवारस वाहने हटविण्याच्या आदेशाला पालिका प्रशासनानेच धाब्यावर बसविले आहे. आयुक्तांनी दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी करणे संयुक्तिक असताना महापालिका अधिकाऱ्यांनी हा आदेशच धाब्यावर बसविला आहे. रस्त्याच्या कडेला असलेली भंगार, बेवारस वाहने हटविण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून कोणतीच हालचाल हाेत नसल्यामुळे नागरिकांना वाहनचालकांना त्याचा त्रास सोसावा लागत आहे.१५ डिसेंबर २०२० रोजी वसई-विरार शहर महापालिकेने शहरातील भंगार, बेवारस वाहने हटविण्यासंदर्भात आदेश पारित केला आहे. मात्र, या आदेशाची अद्याप अंमलबजावणीच झालेली नाही. त्यामुळे महापालिका क्षेत्रात मोठ्या प्रमाणात बेवारस, भंगार आणि अपघातग्रस्त वाहने रस्ताेरस्ती उभी आहेत. या वाहनांमुळे वाहनचालकांना वाहने चालविताना तारेवरची कसरत करावी लागते. तसेच, नागरिकांना पादचाऱ्यांनाही त्यांचा अडथळा होत असल्याचे दिसत आहे. शहरातील दैनंदिन स्वच्छतेलाही अडथळा निर्माण होत आहे. महापालिकेच्या ही बाब निदर्शनास आल्यानंतर ती हटवण्यासंदर्भातचे आदेश महापालिका आयुक्त गंगाथरन डी. यांनी पारित केले होते. महापालिका प्रशासनाने दिलेल्या आदेशात भंगार, बेवारस, अपघातग्रस्त वाहने व सामान जप्त करण्याची प्रक्रिया महापालिकेमार्फत करण्यात येणार असल्याचे म्हटले होते.या आदेशानुसार महापालिकेकडून या वाहनांवर अथवा सामानावर २४ तासांत ते हटविण्याबाबतची नोटीस चिकटवण्यात येईल, असे म्हटले हाेते. तसेच जप्तीची कारवाई केल्यापासून प्रतिदिन २०० रुपयांचा दंड व वाहने हटविण्याचा खर्च वसूल करण्यात येणार असल्याचे म्हटले हाेते. मात्र, त्याची अद्याप अंमलबजावणीच झालेली नाही.प्रभाग समितीच्या सहाय्यक आयुक्तांना या संदर्भातील सर्व अधिकार दिलेले आहेत. त्यांच्या आदेशानुसार त्या त्या विभागाचे अतिक्रमण कर्मचारी त्यांना नेमुन दिलेल्या भागातून बेवारस वाहने टोइंग करून प्रभाग समिती आवारात जमा करतात. या बेवारस वाहनांची संख्या किती आहे; याची माहिती त्या त्या प्रभागातून घेऊन आपल्याला माहिती दिली जाईल.गणेश पाटील, जनसंपर्क अधिकारी, वसई-विरार महापालिका