शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

पोेलीस, महापालिकेविरोधात आदिवासींचा मोर्चा

By admin | Updated: February 4, 2017 02:49 IST

खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याची हकालपट्टी करण्यात यावी आणि पालिका कर्मचाऱ्याने केलेले अनधिकृत बांधकाम तात्काळ दुर करण्यात यावे

वसई : खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याची हकालपट्टी करण्यात यावी आणि पालिका कर्मचाऱ्याने केलेले अनधिकृत बांधकाम तात्काळ दुर करण्यात यावे, या मागणीसाठी आदिवासी एकता परिषदेने प्रचंड मोर्चा काढला होता.नालासोपारा पश्चिमेकडील गास-ब्रम्हा डोंगरी येथे महापालिकेतील कर्मचारी अशोक केशव बोस आणि केशव जीवा बोस यांनी अनधिकृत शेड उभारली आहे. या शेडमुळे शेजारी राहणाऱ्या चिमणी गोविंद झिंबल यांना नाहक विविध त्रासाल सामोरे जावे लागत आहे. या शेडवरून चिमणीबार्इंच्या घरात उंदीर शिरुन अन्नधान्य आणि कपड्यांची नासधुस करतात. तसेच या उंदराच्या मागे विषारी सापही घरात शिरत असल्यामुळे त्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे ही अनधिकृत शेड तात्काळ दुर करण्यात यावी,अशी मागणी आदिवासी एकता परिषदेने महापालिकेकडे केली होती. मात्र, ही शेड उभारणारा अशोक बोस हा पालिका कर्मचारी असल्यामुळे त्याला पाठीशी घालण्याचे काम सहाय्यक आयुक्त प्रकाश जाधव यांनी केले. त्यामुळे संतप्त झालेल्या आदिवासी बांधवांनी मोर्चाचा इशारा दिला होता.त्यावर तोडगा काढण्यासाठी नालासोपारा पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक रवींद्र बडगुजर यांनी सहाय्यक आयुक्त जाधव आणि आदिवासी एकता परिषदेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली होती.परिषदेचे अध्यक्ष दत्ता सांबरे, उपाध्यक्ष वंदना जाधव,सचिव प्रकाश जाधव यांच्यासह दहा-पंधरा कार्यकर्ते या बैठकिला उपस्थित होते. या बैठकित तोडगा काढण्याऐवजी बडगुजर यांनी आम्हालाच धमकी दिली.जास्त बोललात तर गुन्हा दाखल करून तुम्हाला आत टाकू,पोलीसांशी अरेरावी केली असा गुन्हा दाखल करून तुम्हाला अतिरेकी ठरवु.अशी धमकी बडगुजर यांनी आम्हाला दिली.असे एकता परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. बडगुजर यांच्या धमकीमुळे मोर्चा काढण्याची इच्छा अधिक तीव्र करून आज आम्ही मोर्चा काढला.महापालिका कर्मचाऱ्याचे अतिक्रमण, त्याला पाठीशी घालणारे सहाय्यक आयुक्त प्रकाश जाधव आणि खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देणारे बडगुजर यांना तात्काळ दूर करावे,अशी मागणी या मोर्च्याद्वारे करण्यात आली. सुमारे सहाशे-सातशे आदिवासी बांधव या मोर्च्यात सहभागी झाले होते. त्यात महिलांचा सहभाग जास्त होता. दरम्यान, वरील अतिक्रमण उद्या काढण्यात येईल.असे लेखी आश्वासन महापालिकेने दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. (प्रतिनिधी)