शहरं
Join us  
Trending Stories
1
राजकीय पक्षांचे दार चुकले; मतदार याद्यांचा विषय कक्षेत नाही; राजकीय प्रतिनिधींना आयोगाचे उत्तर
2
भारत-पाकच्या खेळाडूंमध्ये ‘हाय फाइव्ह’; हॉकी संघाने सामना संपल्यानंतर हस्तांदोलनही केले
3
मुंबई महापालिका निवडणूक मतपत्रिकेवर घेण्याची मागणी; राज, उद्धव ठाकरेंसह शरद पवारांची मागणी
4
बापरे, काय तो वेग...! बुलेट, रॉकेटचा नाही तर चांदीचा; एकाच दिवसात १५,००० ने वाढली 
5
ईडी कारवाई: वसईचे माजी आयुक्त अनिल पवार, गुप्ताची ७१ कोटींची मालमत्ता जप्त
6
पानसरे हत्या; तीन आरोपींना जामीन मंजूर; सर्वच आरोपी आता जामिनावर बाहेर
7
माओवादी चळवळीने हात टेकले; ‘भूपती’सह ६० जणांची शरणागती
8
इंधन भेसळ प्रकरणात जामीन देताना गंभीरतेने विचार गरजेचा; मुंबई उच्च न्यायालयाचे स्पष्ट मत, एकाचा जामीन फेटाळला
9
कोल्डरिफसह तीन विषारी सिरप वापरू नका, जिवाला असलेला धोका टाळा
10
धारदार शस्त्राने गळा चिरून तरुणाची हत्या; इतर मद्यपींनी पाहिले अन् तिकडे धाव घेतली...
11
सलमान, शाहरूखला पाहण्यास गाठली मुंबई; अनाथ मुलाचा उपाशीपोटी तब्बल २५ तासांचा प्रवास
12
एमबीबीएस प्रवेशासाठी १५२ विद्यार्थ्यांकडून चुकीची कागदपत्रे सादर; सीईटी सेलची नोटीस
13
रणजी करंडक स्पर्धेमध्ये छाप पाडण्यासाठी युवा खेळाडू सज्ज; ऋषभ पंतच्या पुनरागमनावर नजर 
14
भारताने केलेे २-० ने ‘क्लीन स्वीप’; दुसऱ्या कसोटीत वेस्ट इंडिजवर ७ गडी राखून मात
15
तो बापाच्या वशिल्यावर टीम इंडियात आलेला नाही, असं का म्हणाले गंभीर? जाणून घ्या त्यामागचं कनेक्शन
16
मनसेचा मविआमध्ये समावेश होणार की नाही? प्रस्तावाबाबत हर्षवर्धन सपकाळ यांनी स्पष्टच सांगितलं  
17
जैसलमेरमध्ये धावत्या बसला भीषण अचानक आग; १०-१२ जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची भिती
18
घायवळला मोक्का लावला, रोहित पवारांनी तो उठवला; सभापती राम शिंदे यांचा गौप्यस्फोट
19
BJP Candidate list: भाजपने १० विद्यमान आमदारांची तिकिटं कापली, ५ जण आहेत माजी मंत्री; पहिल्या यादीमध्ये कोण?
20
३१ व्या मजल्यावरून पडला, चप्पल, मोबाईल सापडले २४ व्या मजल्यावर, तरुणाच्या मृत्यूचं गुढ वाढलं   

मोदी लाटेच्या प्रभावाने विरोधक निष्प्रभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2019 00:23 IST

पालघरच्या सूर्या कॉलनीतील पुरवठा विभागाच्या गोदाम क्र मांक २ मध्ये सकाळी ८ वाजता पोलिसांच्या कडक बंदोबस्तात मतमोजणीला सुरुवात झाली.

पालघर: पुन्हा एकदा देशात मोदी लाटेच्या प्रभावाने विरोधक निष्प्रभ ठरले असतांना पालघर लोकसभेच्या निवडणुकीतही शिवसेना महायुतीच्या राजेंद्र गावितांनी बहुजन विकास आघाडीच्या बळीराम जाधव यांचा जवळपास एक लाखाच्या प्रचंड मताधिक्यांंनी दणदणीत पराभव केला. तर तिसऱ्या नंबर वर नोटा ने बाजी मारून अन्य १० उमेदवारां पेक्षा जास्त मते घेतली. या निवडणुकीत अन्य १० उमेदवारांचे मताधिक्य पाहता त्याचे डिपॉझिट जप्त होणार आहे.

पालघरच्या सूर्या कॉलनीतील पुरवठा विभागाच्या गोदाम क्र मांक २ मध्ये सकाळी ८ वाजता पोलिसांच्या कडक बंदोबस्तात मतमोजणीला सुरुवात झाली. पहिल्या फेरीत सेनेच्या राजेंद्र गावितांनी बहुजन विकास आघाडीच्या बळीराम जाधव ह्यांच्यावर ५४३ मतांनी आघाडी घेतली.मात्र त्या नंतरच्या सलग ३ फेº्यांपर्यंत बविआ च्या जाधव यांनी ३ हजर ४९० मतांची आघाडी घेतल्याने बविआ च्या गटात आनंदाचे वातावरण होते. त्या नंतरच्या ४ फेºयात पुन्हा गावितांनी बविआ ने घेतलेली आघाडी कमी करून ३ हजार ४४० मतांची आघाडी घेतली. पुन्हा ९ आणि १० व्या फेरीत बविआच्या जाधव यांनी गवितांनी घेतलेली आघाडी तोडून १ हजार ५४७ मतांची आघाडी घेण्यात यश मिळविले. एकमेकावर वरचढ होण्याची १० व्या फेरीपर्यंत चाललेली खेळी अखेर गावितांनी संपुष्टात आणून अखेरच्या फेरी पर्यंत त्यांनी घेतलेली आघाडी वाढवितच नेऊन ८९१४२ मतांनी विजय संपादन केला. त्यामुळे १० व्या फेरी पर्यंत दोघांमध्ये विजयासाठी चाललेली चुरस पुढे संपुष्टात येत फक्त विजयी आकडा जाहीर होण्या पर्यंत मर्यादित राहिली.दहा जणांना १५ हजाराचा टप्पा ओलांडता आला नाहीगावित आणि जाधव या दोन उमेदवारांमध्ये चाललेल्या लढतीत एकही अन्य उमेदवाराचा प्रभाव दिसून आला नाही. बुलेट ट्रेन, एक्सप्रेस वे, वाढवण बंदर, सीआरझेड मधील बदल, शिपिंग कॉरिडॉर आदी स्थानिकांना उध्वस्त करणाºया प्रकल्प असल्याचे सांगत दंड थोपटून निवडणुकीत उडी घेतलेल्या व अपक्ष निवडणूक लढविणाºया दत्ताराम करबट यांना चिल्लर मते मिळाली. वंचित आघाडी चे उमेदवार सुरेश पाडवी, बहुजन मुक्ती पार्टीचे संजय कोहकेरा, मार्किस्ट लेननिस्ट पार्टी आॅफ इंडिया चे शंकर बदादे या उमेदवारांना १५ हजाराचा टप्पा ही पार करता आला नाही. त्यामुळे अन्य १० उमेदवारांचे डिपॉझिट जप्त होणार आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीpalghar-pcपालघर