शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्यास अपायकारक पाण्याची खुलेआम विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2020 01:03 IST

वसई-विरार शहरात खुलेआमपणे आरोग्यास अपायकारक अशुद्ध पिण्याच्या पाण्याची विक्री केली जात असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे.

नालासोपारा : वसई-विरार शहरात खुलेआमपणे आरोग्यास अपायकारक अशुद्ध पिण्याच्या पाण्याची विक्री केली जात असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. वसई-विरार शहरातील नागरिकांच्या आरोग्याशी खेळ सुरू असल्याने पिण्याचे दूषित पाणी विक्री करणाऱ्या शहरातील ५१ व्यावसायिकांवर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने तुळींज पोलीस ठाण्यात मंगळवारी तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर पाणी विक्रेते आणि व्यावसायिकांमध्ये मोठी खळबळ माजली आहे.साथीच्या विविध आजारांपासून रक्षण व्हावे यासाठी वसई-विरार शहरातील सुमारे ७० टक्क्यांहून अधिक लोक दैनंदिन पिण्याच्या वापरासाठी पाणी खरेदी करतात, मात्र आपण पीत असलेले हे पाणी नेमके कसे आहे? याबाबत नागरिकांना फुसटशी कल्पना देखील नसते. नागरिक विकत घेऊन पीत असलेले हे पाणी आरोग्यास घातक असल्याची माहिती नुकतीच समोर आली आहे.पिण्याच्या पाण्याची विक्री करणाºया अनेक बोगस कंपन्या वसई-विरार शहरात ठिकठिकाणी बस्तान मांडून बसल्या आहेत. विनापरवानगी बेकायदेशीरपणे या कंपन्या शहरातील नागरिकांना बिनदिक्तपणे अशुद्ध आणि पिण्यास अपायकारक पाणी विकून महिन्याकाठी लाखो रु पयांची कमाई करीत आहेत.महानगरपालिकेच्या ‘ब’ प्रभाग समितीमधील पिण्याच्या पाण्याचे नमुने मुख्य अणुजीवशास्त्र, जिल्हा आरोग्य प्रयोग शाळा, ठाणे यांच्यामार्फत तपासले गेले असता सदरचे पाणी हे पिण्यासाठी अपायकारक असल्याचा अभिप्राय देण्यात आला आहेत.महापालिका प्रशासनाकडून या पाणी विक्रेत्यांना व्यवसाय बंद करण्याच्या नोटिसा बजावण्यात आल्या असल्या तरीही या बोगस कंपन्यांनी महापालिकेच्या आदेशाला न जुमानता पाणी विक्र ीचा व्यवसाय चालूच ठेवला आहे. महानगरपालिकेच्या केवळ एकाच प्रभागात इतक्या मोठ्या प्रमाणात बोगस कंपन्या आहेत, तर इतर प्रभागांत काय अवस्था असेल, असा सवालही सामान्य नागरिकांनी उपस्थित केला आहे. अशुद्ध पिण्याचे पाणी राजरोसपणे विकले जात असल्याबद्दल नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.>गुन्हे दाखल झालेले पाणीविक्र ी व्यावसायिकशिवकुमार चौहान, रविकांत उपाध्याय, औरंगजेब, मोहंमद हयान, अशोक गुप्ता, मोबिन अन्सारी, मोनू सोनी, दिलीप सिंग, तयब अली, चंदन श्रीवास्तव, मनीष मिश्रा, दाऊद शेख, अमित सिद्दिकी, धर्मेंद्र यादव, सुरजी गुप्ता, सनी गुप्ता, विनय गुप्ता, दिनेश पारधी, मोहंमद रुस्तम, जगदीश पाटील, मुजीब खान, रामचंद्र यादव, अवधेश गुप्ता, रोशन कुमावत, महेश सोळंखी, विजय शहा, मोहंमद कासीम, अब्दुल गनी मोहंमद, हरिश्वर सोनी, शमीम खान, मोहंमद सहानी, दिलीप पांडे, मोहंमद शाबीर, रामचंद्र रभी, मोहंमद आयुब, शिव मिश्रा, अभिलाष गोस्वामी, मुशर्रफ खान, संतोष शिंदे, तरन्नुम शेख, आरिफ शेख, पन्नालाल गुप्ता, राजेश कश्यप, दिलीप सिंग, मोहंमद शाहीन, कल्पेश जैन, मोहंमद इस्लाम, अजित तुंबडा, कविता सोनवणे, अभिषेक गुप्ता आणि हरिलाल गुप्ता.>नालासोपारा पूर्व परिसरात ५१ व्यावसायिकांकडून पिण्यास अयोग्य पाण्याची विक्री केली जात असल्याची व नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होऊन आजार होण्याचा संभव असल्याची तक्रार दाखल झाली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.- नीलेश जाधव, वरिष्ठ आरोग्य निरीक्षक,‘ब’ प्रभाग, वसई-विरार शहर महानगरपालिका.