शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

गंजाड आरोग्य केंद्रात फक्त एकच डॉक्टर

By admin | Updated: February 12, 2017 03:05 IST

डहाणू तालुक्यातील गंजाड प्राथमिक आरोग्य केंद्रात एकच डॉक्टरांना दोन वर्षांपासून सतरा आदिवासी गावांच्या आरोग्यसेवेचा कार्यभार सांभाळावा लागत आहे.

कासा : डहाणू तालुक्यातील गंजाड प्राथमिक आरोग्य केंद्रात एकच डॉक्टरांना दोन वर्षांपासून सतरा आदिवासी गावांच्या आरोग्यसेवेचा कार्यभार सांभाळावा लागत आहे.या आरोग्य केंद्रात गंजाड, नवनाथ, गणेशबाग, सोमनाथ, देवगाव, माणिपूर, रायतळी, चांदवड, चरी, कोटळी, जामशेत, पारसवाडी, वसंतवाडी, गोरवाडी, आंबेसरी, नागझरी, बोंडगाव अशा आदिवासी लोकवस्ती असलेल्या १७ गावांचा समावेश होतो. तसेच या आरोग्य केंद्रात ४२ अंगणवाड्या, २५ मिनी अंगणवाड्या, २८ जि.प. शाळा, ४ आश्रमशाळा , ७ आरोग्य उपकेंद्र समाविष्ट आहेत तर ४५ हजार ३४३, लोकसंख्येचा आरोग्याचा भार त्याला सांभाळावा लागतो. दोन डॉक्टर मंजूर असतांना दोन वर्षांपासून डॉ. दीपाश्री पिळोदकर या एकच डॉक्टर आहेत.या आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी १, आरोग्यसेविका २, आरोग्य सहायक १ व शिपाई १, अशी एकूण पाच पदे रिक्त आहेत. मात्र, याबाबत आरोग्य अधिकाऱ्यांकडे चौकशी केली असता डॉक्टरांची दोन्ही पदे भरली असून डॉ. राठोड यांची ठाणे येथे प्रतिनियुक्ती केली गेली असल्याचे सांगितले. त्यामुळे नागझरी पथकाच्या डॉ.धनगर मीना बऱ्याचवेळा आपले काम सोडून गंजाड आरोग्य केंद्रात रुग्णांच्या सेवेसाठी जातात. दरम्यान या केंद्रातील गावे ही दऱ्याखोऱ्यात असून काही २० ते २५ किमी अंतरावर आहेत. दिवसभर व रात्रीसुद्धा येथे सतत रुग्ण उपचारासाठी येतात. प्रसूती व बालकांची संख्याही जास्त आहे. आदिवासी पाड्यांवर साथीचे रोग, सर्पदंश अशा रुग्णांवर उपचार करीत असतांना कुपोषणासारख्या समस्याही भेडसावत असताना दोन डॉक्टरांची गरज असतांना दुसऱ्या डॉक्टरांची प्रतिनियुक्ती शहराकडे केली गेली असल्याने आदिवासी भागातील आरोग्य सेवेवर परिणाम होत आहे. त्यामुळे अडचणीच्या वेळेस व गंभीर परिस्थितीत रुग्णांना डहाणू, कासा येथील सरकारी किंवा खाजगी दवाखान्यात जावे लागते.गंजाड प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचारी निवास्थानाचीही दुरावस्था झाली आहे. १० वर्षापासून त्यांची दरूस्तीच केलेली नसून खिडक्या, दरवाजे व काही इमारतींचे पत्रे तुटले आहेत. तसेच आरोग्य केंद्राचे बांधकाम ३० वर्षापूर्वी केल्याने जागाही अपुरी आहे. (वार्ताहर)