शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई अहमदाबाद हायवेवर सूर्याची जुनी जलवाहिनी फुटली; दुरुस्तीसाठी लागणार १२ तास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 12:44 IST

नवीन योजनेतून शहराला पाणीपुरवठा कमी दाबाने राहणार, खानिवडे गावाजवळील टोल नाक्याजवळ घटना

आशिष राणे

वसई- विरार शहर महानगरपालिकेस पाणीपुरवठा करणारी सूर्या धरणाची जुन्या योजनेची जलवाहिनी शनिवार (दि.5 जून ) रोजी सकाळी 10:00 वाजता मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील खानिवडे गावाजवळील टोल नाक्याजवळ फुटली असल्याचे पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने लोकमत ला सांगितले. या बाबतीत अधिक माहिती देताना ,पाणीपुरवठा विभागाने सांगितले की,या जुन्या नादुरुस्त जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे.

विशेष म्हणजे या नादुरुस्त फुटलेल्या जलवाहिनी च्या दुरुस्तीसाठी पुढील 10 ते 12  तास लागणार असल्याची माहिती देखील वसई विरार महापालिका पाणीपुरवठा विभागाच्या नियंत्रकानी लोकमत ला दिली. दरम्यान या जुन्या  जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम सुरू झाल्याने त्यातून होणारा पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहील तर या दरम्यान नवीन योजनेतुन होणारा  पाणीपुरवठा मात्र शहरात  कमी दाबाने चालू राहणार आहे. 

तर या जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम पूर्ण होई पर्यंत वसई -विरारकरांना शनिवारी व रविवारी पाणीपुरवठा हा कमी दाबाने राहील असे ही स्पष्ट केले. तरी वसईतील नागरिकांनी वसई विरार शहर महापालिकेस सहकार्य करावे व पाणी जपून वापरावे असे आवाहन महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने केले आहे.