शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
2
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
3
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
4
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
7
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
8
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
9
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
10
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
11
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
12
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
13
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
14
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
15
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
16
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
17
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
18
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
19
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
20
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
Daily Top 2Weekly Top 5

डांबरयुक्त तवंगाने मासेमारी व्यवसायावर परिणाम, किनारा काळवंडला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2019 00:14 IST

किनारी भागात काळपट रंगाचा डांबराचा तवंग पसरल्याने किनारा विद्रुपीकरणासह मासेमारीवर त्याचा परिणाम होतो आहे.

- अनिरु द्ध पाटीलडहाणू/बोर्डी - तालुक्यातील किनारी भागात काळपट रंगाचा डांबराचा तवंग पसरल्याने किनारा विद्रुपीकरणासह मासेमारीवर त्याचा परिणाम होतो आहे. दरम्यान, वाढत्या समुद्री प्रदूषणाचा मच्छिमार, व्यवसायिक आणि ग्राहक या साखळीला फटका बसत आहे तर पर्यटन व्यवसायावरही त्याचा परिणाम जाणवत आहे.१ जून ते ३१ जुलै ही शासकीय मासेमारी बंदी नुकतीच उठली आहे. शिवाय आॅगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मुसळधार पाऊस आणि जोराच्या वाऱ्यामुळे मच्छीमारी नौका समुद्रात गेल्या नाहीत. तर किनाºयालगत पारंपरिक मासेमारीला प्राधान्य देण्यात येत आहे. मात्र लाटांसह काळपट रंगाचा डांबराचा तवंग किनारा आणि काही नॉटिकल क्षेत्रात पसरल्याने मासेमारी जाळी प्रभावित होऊन मासे गावण्याची संख्या घटल्याचे मच्छीमारांचे म्हणणे आहे. तर त्वचेला या तवंगाचा स्पर्श होऊन दुष्परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे.पूर्वीही या काळात हा तवंग पाण्यावर पसरायचा मात्र त्याचे प्रमाण कमी होते. मात्र, गेल्या काही वर्षांपासून प्रदूषणामुळे त्यात वाढ झाली असून माशांची संख्याही घटल्याने किनाºयालगत मासेमारी करणाऱ्यांना त्याच्या झळा बसत आहेत. तर काहीवेळा माशांना तेलकट वास येत असल्याचे दिसून येते. त्यामुळे मच्छीमार, मासे विक्री करणारे व्यावसायिक आणि खवय्ये या साखळीवर त्याचा परिणाम होत आहे. यामुळे औद्योगिक कारखान्यातील फिल्टर न केलेले रसायनयुक्त पाणी, प्लास्टिक पॉलिथिनचा कचरा समुद्रात टाकण्याविरुद्ध नियमांची कठोर अंमलबजावणीची आवश्यकता आहे. तर पाण्यातील दूषित घटकांचे प्रमाण कमी करून समुद्री पर्यावरणाला पोषक वातावरण निर्माण करण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाºया कांदळवनाचे क्षेत्र किनारी भागात वाढविणे अत्यावश्यक आहे.काळपट तवंग मासेमारी साहित्य आणि मच्छिमारांच्या शरीराला लागल्याने नुकसान होते. किनारा विद्रुपीकरणामुळे पर्यटक चौपाट्यांकडे पाठ फिरवत असून व्यवसायावर परिणाम होतो. पाण्यातील रसायनयुक्त प्रमाण वाढत राहिल्यास समुद्री पर्यावरण धोक्यात येण्याची शक्यता तज्ञांकडून व्यक्त होत आहे.औद्योगिकरणामुळे समुद्र प्रदूषित झाल्याने हे थांबले पाहिजे. जीवसृष्टीला वाचवण्यासाठी तत्काळ पाऊल उचलणे गरजेचे आहे.- अ‍ॅड. गिरीश राऊत, पर्यावरणतज्ज्ञ

टॅग्स :Vasai Virarवसई विरार