शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

अधिकारी, ठेकेदारांविरोधात गुन्हा

By admin | Updated: June 5, 2016 02:44 IST

वसई रोडरेल्वे स्टेशनमध्ये गटाराचा स्लॅब कोसळून झालेल्या दुर्घटनेविरोधात सामाजिक कार्यकर्त्याने पुढाकार घेऊन फिर्याद दिल्यानंतर माणिकपूर पोलीस ठाण्यात नगरपालिकेच्या तत्कालीन

वसई : वसई रोडरेल्वे स्टेशनमध्ये गटाराचा स्लॅब कोसळून झालेल्या दुर्घटनेविरोधात सामाजिक कार्यकर्त्याने पुढाकार घेऊन फिर्याद दिल्यानंतर माणिकपूर पोलीस ठाण्यात नगरपालिकेच्या तत्कालीन अधिकारी, ठेकेदार यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गणेश शिंदे तपास करत आहेत.३१ मेला सकाळी साडेआठच्या सुमारास फलाट क्र. १ कडे जाणाऱ्या गटारावरील स्लॅब अचानकपणे तुटून २० ते २५ लोक या गटारात पडले होते. गर्दीच्या वेळी झालेल्या या अपघातात जीवित हानी झालेली नसलीतरी यामध्ये भार्इंदर येथील जिगीश गंगाधर नायर व अन्य १० ते १५ पुरुष व महिला गंभीर व किरकोळ जखमी झालेले आहेत. याबाबत पालिकेने स्वयंस्फूर्तीने दोषी व जबाबदार व्यक्तींवर गुन्हे दाखल करण्याची आवश्यकता होती. मात्र सामाजिक भान ठेवून अशोक वर्मा या सामाजिक कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला. दरम्यान अशोक वर्मा यांनी फिर्यादीत म्हटल्याप्रमाणे गटार बांधण्यासाठी वापरण्यात आलेले साहित्य निकृष्ट प्रतीचे असल्याचे प्रथमदर्शी दिसून आले आहे. या गटारावर दुचाक्या पार्किंग करण्यात येत असून त्याच मार्गावरून पादचारी ये-जा करीत आहेत. (प्रतिनिधी)अखेर समजासेवकानेच घेतला पुढाकारया गटारीची देखभाल करणारे, तिचे बांधकाम करणारे अथवा या गटारीवरील रोडचा पादचाऱ्यांनी येण्या-जाण्यासाठी वापर करू नये’, असे कोणतेही बोर्ड वसई-विरार महानगरपालिकेच्या संबंधित अधिकारी, इंजिनिअर, कंत्राटदार अथवा त्या गटाराची देखभाल करीत असलेल्या संबंधित जबाबदार व्यक्तींनी लावलेले नाही. या गटाराचे काम करतांना त्यासाठी वापरण्यात आलेला पैसा हा जनतेचा असून संबंधितांनी तिचे निकृष्ट बांधकाम करून जनतेची फसवणूक करून त्यात भ्रष्टाचार झाल्याचे दिसत आहे, असे तक्रारीत म्हटले आहे.