शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

वसई-विरार महापालिका हद्दीत डेंग्यूच्या रुग्णांची संख्या घटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 01:40 IST

दोन वर्षांत आढळले फक्त १६ रुग्ण; कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साफसफाई अन् घेतलेली काळजी परिणामकारक

- मंगेश कराळेनालासोपारा : वसई-विरार महापालिकेच्या हद्दीत २०१९ आणि २०२० या दोन वर्षांच्या काळात फक्त १६ डेंग्यूचे रुग्ण आढळले आहेत. २०१७ मध्ये ७५ आणि २०१८ मध्ये ३३ रुग्ण आढळले होते. याचाच अर्थ गेल्या दोन वर्षांत डेंग्यूच्या रुग्णांची संख्या कमी झाली आहे. २०२० मध्ये तर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साफसफाई आणि घेतलेली काळजी यामुळे ही रुग्णसंख्या कमी झाली असल्याचे बोलले जात आहे.डेंग्यू या जीवघेण्या आजाराच्या रुग्णांची संख्या कमी झाल्याने सामान्य नागरिकांनी आनंद व्यक्त केला आहे. मनपाचे जनसंपर्क अधिकारी गणेश पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, २०२० साली कोरोना महामारीमुळे सर्व प्रभागात साफसफाईवर विशेष लक्ष दिले होते. तसेच सामान्य नागरिकांमध्येही कोरोनाबाबत जागरूक होते. लोकांच्या सतर्कतेमुळे डेंग्यूच्या रुग्णांमध्ये कमतरता आली आहे. शहरातील झोपडपट्टी परिसरात औषध फवारणी, धूर फवारणी एप्रिल महिन्यापासून कायमस्वरूपी सुरू आहे. मनपाकडून दरवर्षी डेंग्यूबाबत घरोघरी जाऊन सर्व्हे केला जातो. तसेच घरांची तपासणीसुद्धा केली जाते. डेंग्‍यू तापाची लक्षणे ही इतर विषाणूजन्‍य गंभीर तापाच्‍या लक्षणांसारखीच असतात. उदा. अचानक चढणारा ताप, डोकेदुखी, अंगदुखी, सांधेदुखी व डोळ्यांच्‍या मागे दुखणे इ. रक्‍तस्रावित डेंग्‍यू ताप हा डेंग्‍यू तापाची अवस्‍था आहे. याची सुरुवात तीव्र तापाने होते व डोकेदुखी, भूक मंदावणे, मळमळणे व पोटदुखी ही लक्षणे असतात. याची लक्षणे साध्‍या डेंग्‍यू तापासारखी असतात व क्‍वचित त्‍वचेवर पुरळ दिसून येतात. नाकातून, हिरड्यातून व गुदद्वारातून रक्‍तस्राव ही लक्षणे कमी प्रमाणात आढळून येतात.    - डॉ. संदीप सरताळे, नालासोपाराकोरोना काळात मनपाकडून संतोष भवन, झोपडपट्टी परिसरात औषध फवारणी आणि धूरफवारणी नेहमी केली जात होती व अद्यापही सुरू आहे. तसेच नाल्यांमध्ये, गटारांमध्ये कीटकनाशके फवारणी करण्यात येत आहे.- मनोज पांडे, स्थानिक रहिवासी, नालासोपारामनपा डेंग्यूच्या रुग्णांबाबत खरे आकडे लपवत असून खोटे आकडे सांगितले जात आहेत. खासगी रुग्णालयात डेंग्यूच्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे.- जीतूभाई पटेल, समाजसेवक, नालासोपारा

टॅग्स :dengueडेंग्यू