शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

कामगारांनीच आता एसटी वाचविण्याच्या लढ्याला बळ द्यावे - विवेक पंडित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2019 23:24 IST

तोट्यात जाण्यास सरकार जबाबदार : वसई आगारात एस टी चा ७१ वा वर्धापन दिन संपन्न

वसई : जोपर्यंत महाराष्ट्रात गोरगरीब जनता आहे, तोपर्यंत एसटीची बससेवा चालू राहिल कारण की, ती राज्याची जीवनवाहिनी आहे. एसटी ही प्रवाशांच्या सेवेसाठी चालते, नफा कमावणे हा उद्देश्य नव्हता. मात्र एसटी महामंडळ तोट्यात जाण्याला सरकारची काही धोरणेच जबाबदार आहेत. अशी टिका विवेक पंडीत यांनी केली.

एसटी तर्फे ज्या वेगवेगळ्या सवलती दिल्या जातात त्याचा परतावा शासनाकडून मिळत नसल्याने व कंत्राटदार धार्जिण्या धोरणामुळे एस टी तोट्यात गेली असल्याचे उद्गार राज्य आदिवासी विकास आढावा समितीचे अध्यक्ष माजी आम. विवेक पंडित ह्यांनी शनिवारी वसई येथे एस टी कामगार संघटनेतर्फे आयोजित एसटी च्या ७१ व्या वर्धापनिदन सोहळ्यात बोलताना काढले.

यावेळी पंडित यांना राज्यमंत्री पदाचा दर्जा मिळाल्याबद्दल कविवर्य सायमन मार्टिन व भरत पेंढारी यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. पंडित यांनी विवेचन करतांना सांगितले की, सामान्य माणसाला जगायचे असेल तर खाजगीकरणाविरोधात पेटून उठलेच पाहिजे. एसटी राज्याच्या कानाकोपऱ्यात जात असते. म्हणून कामगारांनीच जनतेचं प्रबोधन करु न एस टी वाचवण्याच्या लढ्याला बळ द्यावे.तसेच सरकारच्या कामगार विरोधी धोरणावर बोलतांना कामगार नेते भरत पेंढारी म्हणाले की, कामगारांना उध्वस्त करुन कुठलेही राज्य प्रगति करू शकत नाही, कष्टकरीच देश घडवत असतात. मात्र दुर्दैवाने सध्याची सरकारी धोरणं कामगार विरोधीच असल्यामुळे सर्वत्र अस्वस्थता आहे.

यावेळी जन आंदोलनाच्या नेत्या कु,डॉमनिका डाबरे, कवी मार्टिन ,भाजपचे दत्ता नर एसटी महामंडळाचे दिलीप मोरे आदींची समयोचित भाषणे झाली. यावेळी सेवानिवृत्तांचा सत्कार करण्यात आला.