शहरं
Join us  
Trending Stories
1
मोहम्मद युनूस यांची मोठी घोषणा, अखेर तारीख ठरली; बांगलादेशात कधी होणार निवडणूक? 
2
आधी चूक केली अन् आता घुमजाव...POK गमावण्याची धडकी मनात बसली; पाकिस्तान सरकारचा खुलासा
3
मनसेसोबतच्या युतीवर उद्धव ठाकरेंचं विधान; देवेंद्र फडणवीसांनी ३ शब्दातच भाष्य केले
4
गाझात पारले-जीचा ६० रुपयांचा बिस्कीट पुडा २३५० ला; बापाने काळजाच्या तुकड्याला आणून दिला...
5
धावत्या ट्रेनमध्ये दरोडेखोराशी झटापट, पत्नीचं पर्स वाचवण्याच्या प्रयत्नात मुंबईतील डॉक्टरनं हात गमावला!
6
जी ७ शिखर संमेलनाचं भारताला निमंत्रण; कॅनडाच्या पंतप्रधानांचा नरेंद्र मोदींना फोन
7
मोठा धक्का! ओला इलेक्ट्रीकमध्ये ह्युंदाई, कियाने २५०० कोटी गुंतविलेले; वैतागून सर्व शेअर ७०० कोटींना विकले... 
8
मशीन गन, बुलेटप्रूफ जॅकेट अन्...काश्मीरला जाणाऱ्या 'वंदे भारत' एक्सप्रेसमध्ये चोख सुरक्षा व्यवस्था
9
KL राहुलची कडक बॅटिंग, पण Chris Woakes समोर यशस्वीसह करुण नायरनं टाकली नांगी
10
"मी राजसाहेबांशी साथ सोडणार नाही, पण..."; मनसे नेते वैभव खेडेकर यांचा खुलासा
11
'माझं तर डिमोशन झालं...!'; वंदे भारतला हिरवा झेंडा दाखवण्याच्या कार्यक्रमात ओमर अब्दुल्लांनी संधी साधली, केली मोठी मागणी
12
आधी अंगावर धाऊन गेली, मग कॉलर पकडून...; लोकलमध्ये महिलेकडून दिव्यांग प्रवाशाला मारहाण
13
Pooja Bagul: धुळ्याच्या पूजाला संपविण्यासाठी मांत्रिकाला प्रेयसी प्रज्ञाने दिले होते ५००००, तर कपिलने पाच लाख
14
स्टारलिंक भारतात आल्यास खरेच मोठी क्रांती घडणार? जाणून घ्या मस्क यांची कंपनी फायद्याची की तोट्याची...
15
कधी स्वप्नातही या गोष्टीचा विचार केला नव्हता! शुबमन गिलनं व्यक्त केली मनातील भावना
16
इस्रायलवर पुन्हा हल्ला करण्याच्या तयारीत इराण? 'या' देशासोबत केली 800 बॅलिस्टिक मिसाइल्सची डील!
17
Thane: वाहनधारकांसाठी महत्त्वाची बातमी, ठाणे- घोडबंदर स्लिप रोड दोन दिवस वाहतुकीसाठी बंद!
18
पाकिस्तानी हवाई दलाची ताकद वाढवण्यासाठी चीनची पडद्यामागून मोठी खेळी; भारतासाठी नवं आव्हान?
19
जे इंग्रजांनाही जमले नाही, ते पंतप्रधान मोदींनी करुन दाखवले; ओमर अब्दुल्लांकडून स्तुतीसुमने
20
Astro Tips: ज्योतिष शास्त्रानुसार शनिवारी हनुमान मंदिरात गुप्तपणे का केले जाते काडेपेटीचे दान? 

पंचायत समितीच्या नऊ खातेप्रमुखांना नोटिसा

By admin | Updated: February 5, 2017 02:19 IST

लेखा परिक्षण अहवालातील प्रलंबित मुद्यांची पूर्तता न केल्याप्रकरणी वसई पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांनी नऊ खातेप्रमुखांना नोटीसा बजावल्या आहेत. याबाबतीत त्वरीत

वसई : लेखा परिक्षण अहवालातील प्रलंबित मुद्यांची पूर्तता न केल्याप्रकरणी वसई पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांनी नऊ खातेप्रमुखांना नोटीसा बजावल्या आहेत. याबाबतीत त्वरीत कार्यवाही झाली नाही तर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, अशी तंबीही खातेप्रमुखांना देण्यात आलेली आहे.स्थानिक निधी लेखा, पंचायत राज समिती आणि महालेखाकार यांच्या अहवालात वसई पंचायत समितीच्या विविध खात्यांंना खुलासा मागवण्यात आलेला आहे. मात्र, त्याबाबतीत संंबंधितांकडून योग्य ती कार्यवाही न झाल्याने लेखापरिक्षण अहवालातील त्रुटी प्रलंबित राहिल्या आहेत. त्याप्रकरणी जिल्हा परिषदेकडून पंचायत समितीकडे खुलासा मागण्यात आला आहे. याप्रकरणाची गंभीर दखल वसई पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी शीतल पुंड यांनी घेऊन नऊ खातेप्रमुखांना नोटीसा बजावल्या आहेत. पालघर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी निधी चौधरी यांनी पंचायत समितीला पत्र पाठवून लेखापरिक्षण प्रलंबित मुद्यांची पूर्तता न केल्याबदद्ल तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे. लेखा परिक्षण मुद्यांची पूर्तता करण्यासाठी मान्सून कार्यक्रमांतर्गत दिलेले उद्दिष्ट साध्य न केल्यामुळे जिल्ह्याच्या रँकींगवर परिणाम झाल्याने चौधरी यांनी संबंधितांना खडसावले आहे. याप्रकरणी वारंवार सूचित करूनही जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलेले आहे, अशी माझी धारणा झालेली आहे. त्यामुळे आपण महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) १९७९ अन्वये कर्तव्यात कसूर केलेली आहे. सबब आपणाविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करण्याचा प्रस्ताव शासनाकडे का पाठविण्यात येऊ नये. याबाबतीत आपल्या कामकाजाची नोंद आपल्या गोपनीय अहवालात का घेण्यात येऊ नये याचा खुलासा करावा. तो समाधानकारक नसल्यास शिस्तभंगविषयक कारवाई प्रस्तावित करण्यात येईल, याची नोंद घ्यावी, असा इशारा पुंड यांनी खातेप्रमुखांना दिला आहे. (प्रतिनिधी)