शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

धोकादायक इमारतींना नोेटिसा; ५०० पेक्षा जास्त इमारती कोसळण्याची भीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2020 01:48 IST

पावसाळ्यापूर्वी महानगरपालिका शहरातील धोकादायक इमारतींची पाहणी करून त्याचा अहवाल दरवर्षी तयार करते.

नालासोपारा : वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या हद्दीतील धोकादायक व अतिधोकादायक इमारतींचा प्रश्न पावसाळ्यापूर्वी ऐरणीवर आला आहे. गेल्या वर्षी महानगरपालिकेने ५८७ इमारती धोकादायक घोषित करून त्यांना नोटिसा धाडल्या होत्या. तर १९८ इमारतींना अतिधोकादायक म्हणून घोषित केले. त्यापैकी काही इमारती तोडण्यात आल्या, पण काही धोकादायक इमारती अद्याप उभ्या असून त्या कधीही पडण्याच्या तयारीत आहे. महानगरपालिकेने प्रभागांतर्गत अशा इमारतींना नोटिसा देण्याचे काम सुरू केलेले आहे.

पावसाळ्यापूर्वी महानगरपालिका शहरातील धोकादायक इमारतींची पाहणी करून त्याचा अहवाल दरवर्षी तयार करते. त्यानुसार धोकादायक इमारतींची वर्गवारी होते. ज्या अतिधोकादायक इमारती असतात, त्या तात्काळ रिकाम्या करायच्या असतात. मात्र, महानगरपालिकेकडे सध्या संक्रमण शिबीर नसल्याने अद्याप एकाही अतिधोकादायक इमारतीतील रहिवाशांना बाहेर काढून त्यांचे अन्यत्र पुनर्वसन केले नसल्याचे सूत्रांकडून कळते.

...तर पावसाळ्यात मोठी दुर्घटना घडण्याची भीती

च्नालासोपारा पूर्वेकडील विभागात मोठ्या प्रमाणात धोकादायक इमारती आहेत. महानगरपालिकेने याकडे लक्ष देऊन कारवाई करावी, अशी नागरिकांची मागणी आहे. नालासोपारामध्ये धोकादायक इमारतींचा काही भाग कोसळण्याच्या अनेक घटना घडल्या आहे.च्येथील टाकी रोड, ओसवाल नगरी, विजयनगर, साईनाथनगर, आत्मवल्लभ सोसायटी, कपोलनगर, संखेश्वरनगर, आचोले रोड या विभागात अनेक धोकादायक इमारती आहेत. याबाबत वेळीच कार्यवाही झाली नाही तर पावसाळ्यात मोठी दुर्घटना होऊन काही

जीवितहानी घडू शकते.

वसई तालुक्यात ५६० पेक्षा जास्त धोकादायक इमारती आहेत. या इमारतींना वेळोवेळी नोटिसा पाठवत असतो. येथील रहिवाशांनी त्यानुसार इमारतीची डागडुजी, मजबुतीकरण करून घ्यायचे असते. इमारत अतिधोकादायक असेल तर रहिवाशांनी ती स्वत:हून रिकामी करायची असते. मनपाची नोटीस मिळूनही लोक त्याकडे कानाडोळा करतात.- रमेश मनाळे, अतिरिक्त आयुक्त, वसई-विरार शहर महानगरपालिका

टॅग्स :Vasai Virarवसई विरार