शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पालघरसाठी पुरवठा अधिकारीच नाहीत

By admin | Updated: August 28, 2015 00:10 IST

पालघर जिल्ह्णाच्या पुरवठा विभागासाठी राज्यशासनाकडून अधिकारी व कर्मचाऱ्यांची पदे मंजूर व त्यावर नियुक्त्या होऊनही ठाणे जिल्हा कार्यालयातून त्यांना पदमुक्त करण्यास टाळाटाळ

- हितेन नाईक,  पालघरपालघर जिल्ह्णाच्या पुरवठा विभागासाठी राज्यशासनाकडून अधिकारी व कर्मचाऱ्यांची पदे मंजूर व त्यावर नियुक्त्या होऊनही ठाणे जिल्हा कार्यालयातून त्यांना पदमुक्त करण्यास टाळाटाळ केली जात असल्याने पालघर जिल्ह्णातील धान्यवितरण व्यवस्था कोलमडून पडली आहे. याचा फायदा घेऊन काळ्याबाजारात धान्याची खुलेआम विक्री केली जात आहे.ठाणे जिल्ह्णात पुरवठा विभागात एकूण ५५ पदे मंजूर असून त्यातील पालघर जिल्ह्णासाठी दोन लेखापर्यवेक्षक, एक साखर वाटप अधिकारी, एक लघु टंकलेखक, आठ अव्वल कारकून, दहा कोठार अधिकारी, आठ लिपीक, शिपाई पाच, चार सफाई कामगार इ. अशी एकूण ३४ पदे जिल्ह्यासाठी मंजूर करण्यात आली आहेत. परंतु आजही पालघर जिल्हापुरवठा अधिकारी कार्यालय, एक जिल्हापुरवठा अधिकारी व वाहन चालक या दोनच पदे मंजूर करण्यात आली असून ३-४ उधारीच्या कर्मचाऱ्यावर जिल्हापुरवठा कार्यालयाचा कारभार सध्या सुरू आहे. राज्यशासनाच्या आदेशाला ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून केराची टोपली दाखविली जात असून ठाणे कार्यालयाने एकाही अधिकारी, कर्मचाऱ्याला पालघर कार्यालयात रुजू होण्यासाठी मुक्त केले नसल्याने पालघर जिल्ह्णात सुरू असलेला धान्याचा काळाबाजार रोखण्यात प्रभारी जिल्हापुरवठा अधिकाऱ्यांना यश येत नाही. आज पालकमंत्री विष्णू सवरा यांचा वचकही कमी होत असल्याचे दिसत असल्याने पालघर जिल्हाधिकारी कार्यालयातील अनेक पदे रिक्त राहत आहेत. जिल्ह्यात केंद्र व राज्यशासनाच्या वतीने दारिद्र्य रेषेखालील ग्राहकांसाठी प्राधान्य योजनेअंतर्गत तलासरी तालुक्यातील ६३ हजार ७६४ कुटुंबाना १ हजार ९८१ क्विंटल तांदूळ व १ हजार ३२० क्विंटल गहू, जव्हार तालुक्यात ४ हजार ७९१ कुटूंबाना १ हजार ४८८ क्विंटल तांदूळ व ९९२ क्विंटल गहू, मोखाडा तालुक्यात ३३ हजार ८२८ कुटुंबाना १ हजार ५१ क्विंटल तांदूळ व ७०१ क्विंटल गहू, विक्रमगड तालुक्यातील ३६ हजार ३२० कुटुंबांना १ हजार १२८ क्विंटल तांदूळ व १ हजार ८२४ क्विंटल गव्हाचे वाटप होते. परंतु त्यातले लाभर्थ्यांपर्यंत किती पोहचते?शहरी भागापैकी पालघर तालुक्यातील ३ लाख ३६ हजार ५६० कुटुंबासाठी १० हजार ४५४ क्विंटल तांदुळ व ६ हजार ९६८ क्विंटल गहू, वसई तालुक्यातील ५ लाख ७५ हजार ५६ कुटुंबासाठी १७ हजार ८६१ क्विंटल तांदुळ, व ११ हजार ९०६ क्विंटल गहु तर डहाणूतील १ लाख ९३ हजार ५४३ कुटुंबासाठी ६ हजार ११ क्विंटल तांदुळ व ४ हजार ७ क्विंटल धान्याचे वाटप करण्यात येते. जिल्ह्णात एकूण १३ लाख ७५ हजार ५४ कुटुंबाना ४२ हजार ७१० क्विंटल तांदुळ व ९ हजार ७८० क्विंटल गहू प्रत्येक महिन्यात वाटप करण्यात येत आहे.४० टक्के धान्य हे काळ्याबाजारात विक्रीसाठी पाठवले जात असून हे रोखण्यात अपुरे कर्मचारी, अधिकारी यांमुळे जिल्हा पुरवठा कार्यालय अयशस्वी होत आहे. अपुऱ्या मनुष्य बळामुळे ही परिस्थिती असल्याचे जिल्हापुरवठा अधिकारी उमेश बिरारी यांनी सांगितले.